
Chhatrapati Sambhaji Nagar : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या कंत्राटी कर्मचारी यांना काम बंद आंदोलन महागात पडले आहे. कारण, महापालिकेच्या पाणीपुरवठा, अग्निशमन या अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या विभागासह यांत्रिकी, पशुसंवर्धन विभागातील एकूण 90 कंत्राटी कर्मचारी यांना थेट कामावरून बडतर्फ करण्याचा निर्णय मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी घेतला आहे. नागरिकांना कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता आणि परवानगी न घेताच गैरहजर राहिले, यामुळे मनपाच्या अत्यावश्यक सेवेवर परिणाम झाला असून शहरवासीयांना अनंत अडचणीचा सामना करावा लागला. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्यात आले असल्याची माहिती जी. श्रीकांत यांनी दिली आहे.
एकीकडे दिवाळी सण असतांना अचानक महानगरपालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे याचे परिणाम अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या विभागावर जाणवत आहे. दरम्यान, याची गंभीर दखल मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी घेतली असून, थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमधील 90 कंत्राटी कर्मचारी यांना बडतर्फ करत त्यांना घरी पाठवण्याचे आदेश मनपा प्रशासक यांनी दिले आहे. त्यामुळे महानगरपालिकेत एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हि पहिल्या टप्प्यातील कारवाई असून, यापुढे देखील अशीच कारवाई होण्याची शक्यता आहे.
|
|
कोणत्या विभागातील किती कर्मचाऱ्यांवर कारवाई...
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत एकूण 4 हजार पेक्षा अधिक कर्मचारी असून, यातील 2500 कंत्राटी कर्मचारी आहे. दरम्यान, अशात 123 कायमस्वरूपी कर्मचारी पहिल्या आणि 285 कर्मचारी दुसऱ्या टप्प्यात भरले जाणार आहे. त्यामुळे 500 कर्मचारी कमी करण्याचा निर्णय मनपा घेणार होते. असे असतानाच कंत्राटी कर्मचारी यांच्याकडून काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे मनपा प्रशासक यांनी थेट कारवाई सुरु केली आहे. ज्यात, 90 कंत्राटी कर्मचारी पहिल्या टप्प्यात कमी करण्यात आले आहे. ज्यामध्ये पाणीपुरवठा विभाग 43, अग्निशमन विभाग 27, यांत्रिकी 9 व पशुसंवर्धन विभागातील 11 अशा एकूण 90 कंत्राटी कर्मचाऱ्यांना कमी करण्याचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी आदेश दिले आहे.
यामुळे करण्यात आली कारवाई...
प्रत्येक महिन्यात सेवानिवृत्त होणाऱ्या मनपाच्या कायमस्वरुपी कर्मचाऱ्याची संख्या मोठया प्रमाणात आहे. त्यामुळे मनपाच्या सर्वच विभागात कर्मचाऱ्यांची कमी भासत आहे. हे मनुष्यबळ उपलब्ध करण्याकरिता मनपाने कंत्राटदारामार्फत कंत्राटी कर्मचारी भरती केली आहे. मनपाच्या वेगवेगळ्या विभागात हे कंत्राटी कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. त्यांना किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन दिले जात आहे. असे असून सुद्धा नागरिकांना मुलभूत व अत्यावश्यक सेवा सुविधा पुरविण्याच्या कामात हे कर्मचारी निष्काळजीपणा करीत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याचं प्रशासक जी. श्रीकांत यांनी म्हटले आहे.
'एस्मा'ही लावणार
महानगरपालिकेतील एकाच वेळी 90 कर्मचारी काढण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. तर, महापालिकेतील कायमस्वरूपी किवा कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून शहरातील जनतेला वेठीस धरले जात असेल तर, त्यांना कामावरून काढून टाकणारच, शिवाय त्यांना एस्मा कायदा लावणार असल्याचे देखील प्रशासक जी श्रीकांत यांनी म्हटले आहे.
शहर
- पुणे: सातारा आणि सांगलीत निवडणुका मग पुणे जिल्हा बँकेचीच का पुढे ढकलली? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला संतप्त सवाल
- मुंबई: नवनाथ बन माझा मित्र नाही, तू कोण बोलणारा? आमदार निलेश राणेंचा भाजप प्रवक्त्यावर संताप
- पुणे: पुण्यात पाण्याची नासाडी केल्यास थेट १० हजारांपर्यंत दंड; वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव आणि बांधकामांसाठी पाणी वापरावर कडक निर्बंध
- मुंबई: लाडकी बहीण योजना अपडेट: ई-केवायसी न केलेल्या ८१ लाख महिलांना मिळणार १५०० रुपये? मुख्यमंत्र्यांनी काय दिले आश्वासन?"
महाराष्ट्र
- पुणे: सातारा आणि सांगलीत निवडणुका मग पुणे जिल्हा बँकेचीच का पुढे ढकलली? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला संतप्त सवाल
- सांगली: नदी प्रदूषित करणाऱ्या महापालिका, पालिकांसह कारखान्यांवर थेट गुन्हे दाखल करा; जलसंपदामंत्र्यांचे अत्यंत कडक आदेश
- मुंबई: नवनाथ बन माझा मित्र नाही, तू कोण बोलणारा? आमदार निलेश राणेंचा भाजप प्रवक्त्यावर संताप
- पुणे: पुण्यात पाण्याची नासाडी केल्यास थेट १० हजारांपर्यंत दंड; वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव आणि बांधकामांसाठी पाणी वापरावर कडक निर्बंध
गुन्हा
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: सणासुदीचे दिवस सुरू, व्यापाऱ्यांच्या कमाईवर पाणी नका फेरू; रामलीला मैदानातील आंदोलनावरून दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना भावनिक आवाहन
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
- गोवा: भाजपला पुन्हा सत्तेत आणणे हेच आपले मुख्य लक्ष्य मंत्री विश्वजीत राणे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- बिहार: विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का! पाटणा शिक्षक मतदारसंघात ३ दशकांची वर्चस्वाची परंपरा खंडित करत आरजेडीचा दणदणीत विजय



























Subscribe to my channel




