
सोलापूर (करमाळा): सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या भावाच्या रोजच्या दारूच्या व्यसनाला आणि जाचाला कंटाळून एका ३२ वर्षीय बहिणीनेच आपल्या ३८ वर्षीय भावाचा गळा आवळून खून केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी बहीण आणि तिच्या पतीला (भावजी) अटक केली आहे.
नेमकी घटना काय?
मल्हारी पोपट कांबळे (वय ३८) असे मृत भावाचे नाव आहे. १२ एप्रिल रोजी करमाळा तालुक्यातील केम परिसरात मल्हारीचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, शवविच्छेदन अहवालात मल्हारीचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली.
बहिणीने दिली गुन्ह्याची कबुली:
पोलिसांनी संशयावरून मल्हारीची सख्खी बहीण शीतल राजू केंगार (वय ३२) आणि तिचे पती राजेश बापू केंगार (वय ३०) यांची चौकशी केली. सुरुवातीला त्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर शीतलने गुन्ह्याची कबुली दिली.
शीतलने पोलिसांना सांगितले की, तिचा भाऊ मल्हारी याला दारूचे प्रचंड व्यसन होते. तो रोज दारू पिऊन घरी यायचा आणि तिच्याशी भांडण करायचा. "तुम्ही इथून निघून जा" असे म्हणत तो तिला वारंवार मानसिक त्रास द्यायचा. ११ एप्रिल रोजी रात्रीदेखील मल्हारी दारू पिऊन आला आणि त्याने नेहमीप्रमाणे वाद सुरू केला. या रोजच्या त्रासाला वैतागलेल्या शीतलने रागाच्या भरात आपल्या ओढणीने मल्हारीचा गळा आवळला.
पुराव्यांची विल्हेवाट:
मल्हारीचा मृत्यू झाल्यानंतर शीतलचा पती राजेश तिथे आला. त्यानंतर या दोघांनी मिळून पुरावा नष्ट करण्यासाठी मल्हारीचा मृतदेह खांद्यावर घेतला आणि रानातून वाट काढत दत्तात्रय देवकर यांच्या विहिरीच्या परिसरातील एका गंजिच्या आडोशाला टाकून दिला.
करमाळा पोलिसांनी शीतल आणि राजेश या दोघांविरुद्ध हत्येचा (BNS कलम १०३(१)) गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक रणजित माने या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
शहर
- विमल पान मसाला जाहिरात प्रकरण: शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ अडचणीत, राजस्थान न्यायालयाचे समन्स!
- पुणे: लिफ्टमध्ये थुंकल्याचा जाब विचारला अन् महिलेने चाकूने केले वार; पिंपरी-चिंचवड हादरले
- पुणे: ३२ वर्षे पूर्ण, तरीही लग्न जमेना; नैराश्यातून मावळमधील तरुणाचे टोकाचे पाऊल
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
महाराष्ट्र
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- विमल पान मसाला जाहिरात प्रकरण: शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ अडचणीत, राजस्थान न्यायालयाचे समन्स!
- पुणे: लिफ्टमध्ये थुंकल्याचा जाब विचारला अन् महिलेने चाकूने केले वार; पिंपरी-चिंचवड हादरले
- पुणे: ३२ वर्षे पूर्ण, तरीही लग्न जमेना; नैराश्यातून मावळमधील तरुणाचे टोकाचे पाऊल
गुन्हा
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या
- मुंबई: पोलीस दाम्पत्याचा वाद पोहोचला पोलीस ठाण्यात; मानसिक छळ करणाऱ्या पतीविरुद्ध अखेर गुन्हा दाखल!
- बार्शी हादरले! शेअर मार्केटच्या नादात उद्ध्वस्त झाला संसार; १.८० कोटींच्या कर्जापायी मुख्याध्यापकाने पत्नी आणि दोन मुलांचा जीव घेतला; त्यानंतर स्वतःही संपवले आयुष्य.
- पुण्यात 'फेक' कॉल सेंटरचा पर्दाफाश! ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली दररोज शेकडो लोकांची लाखो रुपयांची लूट; टोळी गजाआड.
राजकीय
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
- राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे विलीनीकरण होणार? नाना पटोलेंच्या दिल्ली दौऱ्याने राजकीय वर्तुळात खळबळ; मोठ्या निर्णयाचे संकेत!
इतर
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या
- NEET-UG २०२६ परीक्षेसाठी NTA चा महत्त्वाचा निर्णय; वेळ आणि प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यात दिलासा!
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
- गोरखपूर: माणुसकीला काळीमा! आईच्या तेराव्याच्या खर्चावरून मोठ्या भावाने लहान भावावर झाडल्या गोळ्या; तरुणाचा मृत्यू.
























Subscribe to my channel


