पुणे: दसरा सण आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) स्थापनेच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे पथसंचलन आणि अन्य कार्यक्रमांच्या प्रचारासाठी भाजपच्या वतीने विविध ठिकाणी बॅनर्सबाजी करण्यात आली होती. पुण्यातही केंद्रीय सहकार आणि नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने लावण्यात आलेल्या बॅनर्सवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोशेजारी डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींचे फोटो लावण्यात आले होते. या प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी अत्यंत तीव्र आक्षेप घेत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना थेट शब्दांत मोठा इशारा दिला आहे.
रुपाली ठोंबरे यांचा मुरलीधर मोहोळांवर घणाघात:
या प्रकरणावर संताप व्यक्त करताना राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या की, "खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा मी जाहीर निषेध करते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो हेडगेवार आणि गोळवलकर यांच्यासोबत अशा प्रकारे एकाच पातळीवर लावण्याचा कोणताही अधिकार कोणालाही नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत आणि त्यांचा अशा प्रकारे अवमान करण्याचा किंवा वापरण्याचा अधिकार कोणीही दिलेला नाही. तुम्ही सातत्याने असे प्रकार का करत आहात? जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचा असाच अवमान करत राहिलात, तर आम्ही तुम्हाला अजिबात सोडणार नाही. भाजपच्या प्रतिनिधींमध्ये थोडा जरी मेंदू असेल आणि तुम्ही सुशिक्षित असाल, तर ताी जाणीव ठेवून यापुढे शिवरायांचा अवमान होणार नाही याची सक्त काळजी घ्या. जर अशी काळजी घेतली नाही, तर आम्हाला येत्या काळात अत्यंत आक्रमक मार्गाने उत्तर द्यावे लागेल."
महायुतीमधील अंतर्गत वाद आणि दुजाभावावर रोखठोक भाष्य:
यावेळी बोलताना रुपाली ठोंबरे यांनी महायुतीमधील मित्रपक्षांकडून मिळत असलेल्या दुजाभावावर आणि वागणुकीवर देखील उघडपणे भाष्य केले. त्या म्हणाल्या की, महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामील असल्यापासून भारतीय जनता पक्षाकडून आमच्या पक्षाला आणि नेत्यांना जी दुजाभावाची वागणुकी दिली जात आहे, ती आता लपून राहिलेली नाही. भाजपकडून सातत्याने मिळणाऱ्या या प्रकारच्या वागणुकीबद्दल आम्ही आमचे पक्षश्रेष्ठी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याकडे वेळोवेळी तक्रार केली आहे.
स्थानिक राजकारणाचा संदर्भ देत त्यांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा दाखला दिला. अजित पवार यांनी ज्या व्यक्तीवर तब्बल तेरा वर्षे सलग विश्वास टाकला आणि कारखाना चालवण्यासाठी दिला, तीच व्यक्ती आता वेगळे पॅनल तयार करून उभी राहत आहे आणि अशा बंडखोरांना जर भाजप उघडपणे मदत करत असेल, तर या सर्व गोष्टींना सामोरे जात सुजाण जनतेने त्यांना त्यांची योग्य लायकी दाखवून दिली आहे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. तसेच पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमध्ये मित्रपक्षांना विश्वासात न घेता परस्पर उमेदवार लादण्याच्या पद्धतीवरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शहर
- नागपूर: आंदोलनाचे राजकारण नको, समस्यांवर उपाय शोधा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन!
- मुंबई: अभिनेता इम्रान खानला मोठा दिलासा मिळणार का? देश सोडण्याच्या एफआरआरओच्या नोटिशीविरोधातील याचिकेवर २६ ऑक्टोबर रोजी होणार सुनावणी!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- नाशिक: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ६,५०० आदिवासी बांधव करणार महा गोदा आरती, विश्वविक्रमाची तयारी!
महाराष्ट्र
- बीड: नारायणगडावरील दसरा मेळाव्यात जरांगेंचा ५०० कोटींचा खळबळजनक बॉम्ब; एकनाथ शिंदेंना विचारला थेट सवाल!
- बीड: जातीपातीच्या जिवावर राज्य करू इच्छिणाऱ्या आणि मोठा होऊ पाहणाऱ्या नेत्याला भविष्यात कोणतेही स्थान नसते पंकजा मुंडे यांचा घणाघात
- अकोला: मिरवणुकीसाठी डीजेचे सेटिंग करताना विजेचा शॉक लागून तरुण जागीच ठार, तर ६ जण गंभीर जखमी
- नागपूर: आंदोलनाचे राजकारण नको, समस्यांवर उपाय शोधा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन!
गुन्हा
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: अभिजित दिपकेंना कोर्टाकडून मोठा दिलासा! तिरंगा मोर्चादरम्यान अटकेप्रकरणी जामीन मंजूर, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच होणार सुटका!
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!



























Subscribe to my channel




