नागपूर: समाजातील विविध समस्यांविरोधात आंदोलने उभी राहणे किंवा आवाज उठवणे ही एक स्वाभाविक बाब असू शकते; मात्र, कोणत्याही आंदोलनाचा मूळ उद्देश हा केवळ विरोध दर्शवणे नसून त्या समस्यांवर ठोस आणि शाश्वत उपाय शोधणे हा असला पाहिजे, असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्ष समारोपाच्या निमित्ताने आयोजित विजयादशमी उत्सव तथा शस्त्रपूजन सोहळ्यादरम्यान नागपूरच्या ऐतिहासिक रेशीमबाग मैदानावर ते स्वयंसेवक व उपस्थितांना मार्गदर्शन करत होते.
आंदोलनाचे राजकारणीकरण आणि पाश्चिमात्य शक्तींचे षडयंत्र:
आपल्या भाषणात पुढे बोलताना डॉ. मोहन भागवत यांनी इशारा दिला की, जर एखादे आंदोलन केवळ संकुचित राजकारणाचे साधन बनले किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्ती, समूह, संस्था अथवा विचाराविषयी मनामध्ये शत्रुत्वाची व द्वेषभावना ठेवून ते चालवले गेले, तर त्यामुळे समाजात अनावश्यक दुही निर्माण होते. या सर्व प्रक्रियेमागे देशाच्या विरोधात काम करणाऱ्या पाश्चिमात्य आणि काही आसुरी शक्तींकडून भारताला कमकुवत करण्याचे तसेच देशाला तोडण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू असतात. केवळ राजकीय सत्तेतील 'रेजिम' (शासन प्रणाली किंवा सरकार) बदलल्याने देशापुढील सर्व परिस्थिती बदलत नाही, तर त्यासाठी विचारांची आणि व्यवस्थेची शुद्धता आवश्यक असते, असे मतही त्यांनी यावेळी मांडले.
संयम, सभ्यता आणि लोककल्याण:
सार्वजनिक जीवनात बोलताना, कोणतीही कृती करताना, वागताना आणि परस्परांशी संवाद साधताना सभ्यतेची आणि मर्यादेची कास सोडली पाहिजे. तात्कालिक मतांचा लाभ मिळवणे, स्वस्त लोकप्रियता मिळवण्याची लालसा किंवा कुठल्याही प्रकारचा राजकीय फायदा पदरात पाडून घेण्याचा मोह माणसाच्या विवेकबुद्धीवर आणि सद्भावनेवर कधीही वरचढ ठरू नये, असा मोलाचा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला. समाजातील सर्वच समस्यांचे निराकरण केवळ आंदोलनांतून किंवा रस्त्यावर उतरूनच होईल असे नाही. जर आंदोलन हे केवळ राजकीय हत्यार बनले आणि त्यामागे संपूर्ण व्यवस्था किंवा देशाच्या व्यवस्थेविषयीच अविश्वास निर्माण करण्याचा हेतू असेल, तर त्याचा थेट आणि अप्रत्यक्ष फायदा देशाचे शत्रू असलेल्या व देशाला दुबळे करू इच्छिणाऱ्या देशविरोधी शक्तींनाच होऊ शकतो, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.
मान्यवरांची उपस्थिती आणि गणवेशातील नेते:
या भव्य विजयादशमी सोहळ्याच्या मंचावर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार संजय गुप्ता, संघाचे विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, विदर्भ प्रांत सह संघचालक श्रीधर गाडगे आणि नागपूर महानगर संघचालक राजेश लोया उपस्थित होते. याशिवाय, माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि कॉन्सुल जनरल ऑफ इस्राईल टू मिडवेस्ट इंडिया यानिव रेवाच हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
विशेष म्हणजे, या सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, माजी खासदार अजय संचेती, आमदार परिणय फुके, आमदार कृष्णा खोपडे यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज लोकप्रतिनिधी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषत्वाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार परिणय फुके हे सर्वजण संघाच्या पारंपरिक गणवेशात या सोहळ्यात सहभागी झाले होते, ज्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा पाहायला मिळाली.
वंदे मातरमला कुठलाही विरोध नको:
कार्यक्रमादरम्यान वंदे मातरमच्या मुद्द्यावर बोलताना सरसंघचालक म्हणाले की, 'वंदे मातरम' हे गीत आजही देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेची आणि देशभक्तीची अखंड प्रेरणा देण्यास पूर्णपणे समर्थ आहे. हे गीत अत्यंत स्वाभिमानाने, बुलंद स्वरात आणि पूर्ण स्वरूपात गाण्यात यायला हवे. याबद्दल किंवा याच्या उच्चाराबाबत मनात कोणताही संकोच, दुजाभाव किंवा विरोध असता कामा नये, अशी स्पष्ट आणि रोखठोक भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली.
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




