दिल्ली विमानतळावर मोठा वाद! पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना ३ तास रोखून धरले, ५० हजारांचा दंडही ठोठावला

दिल्ली विमानतळावर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना तपासणीच्या नावाखाली तब्बल ३ तास रोखून ठेवण्यात आल्याची आणि निघताना ५० हजार रुपयांचा दंड आकारल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. आम आदमी पार्टीने (AAP) या संपूर्ण प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला असून केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. मात्र, नेमक्या कोणत्या कारणास्तव ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे पॅरिसहून प्रवास करून दिल्ली विमानतळावर परतले होते. पॅरिसमध्ये १७ ते २१ ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 'SIAL Paris 2026' या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय खाद्य प्रदर्शनात (International Food Exhibition) पंजाबच्या विविध उत्पादनांना व उद्योगांना जागतिक स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री भगवंत मान हे एका उच्चस्तरीय पंजाब सरकारी शिष्टमंडळाचे नेतृत्व करून तिथे गेले होते.

या महत्त्वाच्या परदेश दौऱ्यासाठी केंद्र सरकारकडून सुरुवातीला राजकीय परवानगी (Political Clearance) देण्यास नकार देण्यात आला होता. केंद्राच्या या भूमिकेनंतर पंजाब सरकारने थेट पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात (Punjab and Haryana High Court) धाव घेतली. उच्च न्यायालयाने कायदेशीर बाजू तपासत मुख्यमंत्री भगवंत मान यांना फ्रान्सला जाण्याची कायदेशीर परवानगी दिली होती. कोर्टाच्या आदेशानंतरच मान फ्रान्स दौऱ्यावर गेले होते. मात्र, दौरा पूर्ण करून दिल्ली विमानतळावर परतल्यानंतर त्यांच्यासोबत घडलेल्या या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून केंद्र आणि राज्य सरकारमधील संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *