
Pune : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) त्यांच्या खासगी सचिवांची चौकशी सुरू केली आहे. अजित पवार यांच्या बारामती दौऱ्याची आखणी कोणी केली होती; तसेच या दौऱ्याबाबत आदल्या दिवशी नेमकी काय चर्चा सुरू झाली होती, या दृष्टीने सीआयडीचे अधिकारी खासगी साचिवांकडून माहिती घेत असल्याचे समजते.
सीआयडी चौकशीला सुरुवात
मुंबईहून बारामतीकडे निघालेल्या अजित पवारांच्या विमानाचा बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या विमान अपघाताबद्दल पूर्ण चौकशी होणे बाकी आहे. या अपघात प्रकरणात सरकारने सीआयडी चौकशीची घोषणा केली आहे. त्यानुसार ‘सीआयडी’च्या अधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या खासगी सचिवांची चौकशी सुरू केल्याची माहिती पुढे आली आहे.
|
Mumbai Mayor : भाजपचा धक्का! मुंबई महापौरपदासाठी महायुतीचा उमेदवार जाहीर, अमित साटम यांची मोठी घोषणा |
कोणकोणते प्रश्न विचारले?
अजित पवार यांचे खासगी सचिव अविनाश सोलवट यांच्याकडून सीआयडीने बारामती दौऱ्याची माहिती घेतली. ही चौकशी चार तासांहून अधिक वेळ सुरू होती. त्यांना अजित पवार यांच्या २८ जानेवारीच्या बारामती दौऱ्याचे नियोजन, प्रवासाचे तपशील, २७ जानेवारी रात्रीच्या चर्चा आणि इतर संबंधित माहितीविषयी प्रश्न विचारले गेले. या प्रश्नांच्या उत्तरांमधून अपघाताच्या कारणांसाठी तांत्रिक बिघाड, मानवी चूक किंवा इतर तपशील काही गोष्टी कारणीभूत ठरल्या का, याचा अंदाज बांधण्यासाठी वापर केला जाणार आहे. राज्यातील काही नेत्यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत मोठा संशय व्यक्त केल्याने त्या अनुषंगानेही सीआयडीचे अधिकारी चौकशी करीत असल्याचे समजते.
तीन टप्प्यात तपास
अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास तीन टप्प्यांमध्ये केला जाणार असल्याचे याआधीच जाहीर करण्यात आले आहे. विमानाचा वेग, विमानाची उंची, इंजिनाचे तापमान, हवेचा दाब, पंखांची हालचाल, पायलटमधील संभाषणे अशा अनेक तांत्रिक माहितीचे संकलन पहिल्या टप्प्यात केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात विमानाचे अवशेष प्रयोगशाळेत पाठवून त्याचे विश्लेषण केले जाणार आहे. विमान जमिनीवर आदळल्यानंतर बाहेरील बाजूस नेमका काय परिणाम झाला, विमानाला कधी आणि कशी आग लागली आणि विमानाच्या सांगाड्यासंदर्भातील माहिती मिळू शकणार आहे.
अनेकांना घातपाताचा संशय
दरम्यान, ‘अजित पवार यांचे विमान जमिनीवर लँड होण्यापूर्वीच त्याचा स्फोट झाला,’ असा खळबळजनक दावा बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केला. या घटनेचा तपास करण्याची मागणी त्यांनी केली. त्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन अजितदादांच्या विमानाचा घातपात झाला असावा, असा संशय व्यक्त केला.
सोनवणे म्हणाले, ‘अजित पवारांच्या विमानाचे दोन व्हिडिओ समोर आले आहेत. त्यानुसार विमान जमिनीला टेकण्याआधीच स्फोट झाला. त्यानंतर दुसरा स्फोट झाला असे दिसते आहे. विमान जमिनीवर उतरण्याआधीच स्फोट झाला असेल, तर विमानामध्ये बॉम्ब होता का? बॉम्बने विमान हवेत उडवले गेले का? नेमके काय घडले, ज्यामुळे विमानाचा स्फोट झाला, याची चौकशी झाली पाहिजे. तो घातपात की अपघात याचादेखील तपास झाला पाहिजे आणि सत्य बाहेर आले पाहिजे.’
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर



























Subscribe to my channel





1 thought on “Ajit Pawar : अजित दादांच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी नेमकं काय घडलं? जवळच्या व्यक्तीची 4 तास CID चौकशी, महत्त्वाचे धागेदोरे समोर”