या महिन्याच्या सुरुवातीला मणिपूरमध्ये सामूहिक अत्याचाराची शिकार झालेल्या 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये पीडितेच्या बहिणीचे शब्द कधीही विसरता येणार नाहीत-‘तिला कुणीही न्याय देऊ शकले नाही.’भारतामध्ये महिलांसाठी न्यायाचा नेमका अर्थ काय आहे? आपली कायदेशीर यंत्रणाच महिलांची बाजू कशी दुर्बल करते, हे पाहूया- 1. भारतीय दंड संहिता, 1860 मध्ये संहिताबद्ध आणि भारतीय न्याय संहिता, 2023 मधील कलम 63 मधील तरतुदीनुसार पतीने पत्नीच्या संमतीशिवाय केलेले लैंगिक संबंध बलात्कार मानले जात नाहीत. हा कायदा विवाहातील स्त्रीच्या संमतीच्या तत्त्वालाच नाकारतो आणि पत्नीच्या निर्णयाऐवजी पतीच्या लैंगिक अधिकारांना प्राधान्य देतो.
महिलांना कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा,2005 अंतर्गत नागरी उपाय उपलब्ध असले तरी वैवाहिक बलात्कारावर फौजदारी कारवाई नाकारणे म्हणजे स्त्रीचा शरीरावरचा अधिकार तिच्या वैवाहिक स्थितीपुढे नगण्य ठरतो, असे मानणाऱ्या व्यवस्थेला बळ देणे होय.
1971 मध्ये 42 व्या विधी आयोगाने वैवाहिक अत्याचार गुन्हा ठरवण्याची शिफारस केली होती; मात्र ती आजवर अमलात आणलेली नाही.
2. बालविवाह प्रतिबंधक कायदा, 2006 नुसार महिलांसाठी किमान विवाह वय 18 आणि पुरुषांसाठी 21 वर्षे आहे. या फरकाला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. उद्देश बालविवाह रोखण्याचा असेल तर तो सर्व लिंगांसाठी समान असायला हवा. आणि महिलांचे संरक्षण हाच उद्देश असेल तर त्यांच्यासाठी कमी वय ठेवल्याने तो उद्देश कसा साध्य होतो? उलट स्त्री-पुरुष वयातील फरक आवश्यक आहे. हीच धारणा कायदेशीर ठरवली जाते. यामुळे स्त्रियांचे पुरुषांवर अवलंबित्व वाढते आणि शिक्षण मर्यादित होते. कायदा असमानतेला संस्थात्मक स्वरूप देतो, तो गौरवाचा दावा करू शकत नाही.
3. दाम्पत्य सहवास पुनर्स्थापना (आरसीआर) ही तरतूद हिंदू विवाह अधिनियम कलम 9 आणि विशेष विवाह अधिनियम कलम 22 अंतर्गत आहे. यानुसार कोणताही जोडीदार योग्य कारणांशिवाय वेगळा राहत असल्यास त्याला पुन्हा सहवासासाठी बाध्य करता येते.
हा कायदा विवाहाला संमतीवर आधारित नातेसंबंध न मानता कायदेशीर बंधन ठरवतो. याचा भार प्रामुख्याने महिलांवर पडतो. त्यांना मानसिक, भावनिक किंवा लैंगिक अत्याचार असूनही वेगळे राहण्याचे कारण सिद्ध करावे लागते. वैवाहिक बलात्कार गुन्हा नसल्यामुळे ही तरतूद महिलांना पुन्हा अपमानास्पद आणि असुरक्षित परिस्थितीत परत जाण्यास भाग पाडू शकते.
4. पोक्सो कायदा 2012 अंतर्गत लैंगिक गुन्ह्यांमध्ये असहमतीचा पुरावा आवश्यक मानला जात नाही. म्हणजेच 18 वर्षांखालील दोन किशोरवयीन परस्पर संमतीने संबंधात असले तरी त्यांची संमती कायदेशीरदृष्ट्या अप्रासंगिक ठरते.
पोक्सो अंतर्गत दाखल होणाऱ्या अनेक प्रकरणांचा संबंध सहमतीवर आधारित किशोरवयीन प्रेमसंबंधांशी असतो. विशेषतः आंतरजातीय, आंतरधार्मिक किंवा सामाजिकदृष्ट्या अस्वीकार्य संबंधांमध्ये पालकच अशा तक्रारी दाखल करतात.
लैंगिक शोषण आणि संमतीने झालेले संबंध यामधील फरक न केल्यामुळे हा कायदा किशोरांची स्वायत्तता मर्यादित करतो. पण त्यांना प्रत्यक्ष संरक्षण देण्यात अपयशी ठरतो.
5. भारतीय न्याय संहिता, 2023 मधील कलम 69 नुसार विवाहाच्या खोट्या आश्वासनावर आधारित लैंगिक संबंध गुन्हा ठरवण्यात आला आहे. ही तरतूद या गृहितकावर आधारित आहे की स्त्रीची लैंगिक संमती केवळ विवाहाच्या अपेक्षेशीच जोडलेली असते. नात्यांमध्ये इरादे बदलू शकतात; मात्र स्पष्ट कायदेशीर निकष नसल्यामुळे या तरतुदीचा गैरवापर होण्याची शक्यता वाढते. कायद्यातील संमती सशर्त आहे, तोपर्यंत महिलांसाठी न्यायही सशर्तच राहील — राज्यघटनेतील सन्मान, समानता आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या मूल्यांशी विसंगत आहे.
( लेखकाचे हे वैयक्तिक मत आहे. लेख संशोधन साहाय्य चाहत मंगतानी यांनी केले.) वैवाहिक अत्याचाराच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास नकार देणारी व्यवस्था स्त्रीला आपल्या शरीरावरील अधिकाराला तिच्या वैवाहिक दर्जापेक्षा गौण ठरवते. मग वैवाहिक अत्याचार आजही गुन्हा का मानला जात नाही?
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel


Sign up now and access top-converting affiliate offers!