
Assam: आसामच्या होजाईमध्ये शनिवारी मध्यरात्री राजधानी एक्सप्रेसचा भयंकर अपघात झाला. हत्तींच्या कळपाने राजधानी एक्सप्रेसला जोरात धडक दिल्यामुळे इंजिन आणि ५ डब्बे रूळावरून खाली घसरले. या दुर्घटनेत ८ जंगली हत्तींचा मृत्यू झाला तर एक हत्ती गंभीर जखमी झाला आहे. येथील वन विभागाच्या अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
सैरांग-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस ट्रेनला शनिवारी मध्यरात्री २.१७ वाजता जंगली हत्तीच्या कळपाने जोरात धडक दिली. या दुर्घटनेत ८ हत्तींचा जागेवरच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की अनेक रेल्वे डबे रुळावरून घसरले. काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याचे समजतेय. घटनास्थळावर तात्काळ मदतकार्य करण्यात येत आहे.
|
|
जमुनामुख-कामपूर विभागातील चांगजुराई परिसरात शनिवारी २:१७ वाजता हत्तीच्या कळपाने धडक दिल्याची घटना घडली. सुदैवाने ट्रेनमधील कोणत्याही प्रवाशांना गंभीर दुखापत झाली नाही. काही जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. नागाव विभागीय वन अधिकारी सुहास कदम यांनी सांगितले की, वन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे आणि परिस्थितीचा आढावा घेत आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कळपात आठ ते दहा हत्ती होते. त्यामधील ८ हत्तीचा मृत्यू झालाय, तर एक जखमी आहे.
सैरांग-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस ट्रेन चांगजुराई परिसरात २ वाजण्याच्या आसपास पोहचली. त्यावेळी लोको पायलटला रूळावर हत्तीचा कळप दिसला. रेल्वे लोको पायलटने रुळांवर हत्तींना पाहिल्यानंतर आपत्कालीन ब्रेक लावले. पण हत्तीच्या कळपाने ट्रेनला जोरात धडक दिल्याने ही दुर्घटना घडली, असे रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले. हे ठिकाण हत्तींसाठी नियुक्त केलेले कॉरिडॉर मानले जात नाही.
या अपघातानंतर बाधित भागातून जाणाऱ्या गाड्या अप लाईनवर वळवण्यात आल्या. दुर्घटनेच्या ठिकाणी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रुळांवर हत्तीचे अवशेष विखुरल्यामुळे अप्पर आसाम आणि ईशान्येकडील इतर भागात रेल्वे सेवा प्रभावित झाली आहे
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ





























Subscribe to my channel




