
Nagpur : महिला कबड्डीपटूने कीटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना नागपूरच्या सावनेर तालुक्यातील माळेगाव टाऊन येथे राहणाऱ्या घडली आहे. आर्थिक अडचणी, नोकरीचे आमिष दाखवून केलेली फसवणूक आणि लग्नानंतर वाढलेला मानसिक छळ यामुळे कंटाळून तिने टोकाचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. २८ वर्षीय किरण सूरज दाढे असे आत्महत्या केलेल्या महिला कबड्डीपटूचे नाव आहे. या प्रकरणी सावनेर पोलिसांनी तिचा पती स्वप्निल जयदेव लांबघरे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून तो सध्या फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक परिस्थिती हलाखीचीअसल्याने कबड्डीपटू किरणला नोकरीचीआवश्यकता होती. याच संधीचा फायदा घेत स्वप्निलने तिला वेकोलीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. या विश्वासावर २०२० साली नोंदणी पद्धतीने दोघांचे लग्न झाले. मात्र लग्नानंतरही किरण माहेरीच राहत होती. नोकरी लावून देण्याबाबत स्वप्निल सतत टाळाटाळ करत होता. उलट नातेसंबंधासाठी दबाव, शिवीगाळ आणि धमक्यांमुळे तिचा मानसिक त्रास वाढत गेला.
|
Nagpur : ‘लाडकी बहीण’ योजनेवरून विधानसभेत चर्चेची खळबळ; फडणवीसांनी आमदारांना सुनावलं |
नोकरी तर दूरच, स्वप्निलकडून सतत होणाऱ्या त्रासामुळे किरणने कुटुंब न्यायालयात धाव घेत घटस्फोटासाठी याचिकाही दाखल केली होती. तरीही छळ थांबला नाही, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. वाढत्या मानसिक तणावाला कंटाळून ४ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास किरणने कीटकनाशक प्राशन केले. प्रकृती गंभीर झाल्याने तिला तत्काळ नागपूर मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच ७ डिसेंबर रोजी तिचा मृत्यू झाला.
किरणने मृत्यूपूर्वी स्वप्निलकडून होत असलेल्या त्रासासंबंधीचे मोबाईलवरील संदेश आणि चॅट्स पुराव्यासाठी जतन करून ठेवले होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. याच पुराव्यांच्या आधारे सावनेर पोलिसांनी स्वप्निल लांबघरे याच्याविरोधात फसवणूक, मानसिक छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच स्वप्निल फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.
या घटनेमुळे सावनेर परिसरात तसेच क्रीडा विश्वात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. एक हुशार कबड्डीपटू अशा प्रकारे आत्महत्येस प्रवृत्त होणे हे समाजासाठी चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे. पोलिस पुढील तपास करत असून आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!



























Subscribe to my channel

