Vladimir Putin India Tour : ज्या विमानाने पुतिन भारतात दाखल झाले, त्यावर लिहिलेल्या ‘Poccия’ चा नेमका अर्थ काय?

New Delhi : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. व्लादिमीर पुतिन यांचे विशेष विमान दिल्लीच्या पालम विमानतळावर उतरले, जिथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. पंतप्रधान मोदींनी प्रथम पुतिन यांच्याशी हस्तांदोलन केले, त्यांनी मित्राला मिठी मारली. त्यानंतर मोदी आणि पुतिन हे एकाच वाहनातून विमानतळावरून निघाले.

पुतिन यांचे विमान दिल्लीत उतरल्यानंतर,त्यांच्या विमानाबद्दल चर्चा सुरू झाली आहे. पुतिन हे त्यांच्या खास विमानाने भारत दौऱ्यावर आले आहेत. पुतिन यांच्या विमानावर एक शब्द लिहिलेला आहे. आता लोक त्या शब्दाचा अर्थ शोधत आहेत. पुतिन यांच्या विमानावर काय लिहिले आहे आणि त्याचा नेमका अर्थ काय आहे?

Mumbai : महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाहतुकीत मोठे बदल; काही मुख्य रस्ते बंद, तर काही मार्ग वन-वेवर सुरू

 
त्यावेळी विमान क्षेत्रातील उत्साही तज्ज्ञांनी डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांच्या विमानाची तुलना केली होती. पुतिन ज्या विमानात अलास्काला गेले त्याच विमानातून ते भारतात आले आहे. हे विमान विशेषतः निर्माण केलेले इल्युशिन IL-96 आहे, जे रशियन राष्ट्राध्यक्षांच्या ताफ्यातील मुख्य विमान आहे.

या विमानावर लाल अक्षरात "Россия" हा शब्द लिहिलेला दिसत आहे. ज्याचे भाषांतर "रशिया" असे होते. ही अक्षरे सिरमिलिक वर्णमालेतून घेतली गेली आहेत. जेव्हा त्यांचे विमान भारतात आले तेव्हा त्यावरही लाल रंगाने हाच शब्द लिहिलेला होता. रशियन राष्ट्राध्यक्षांचे विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले, कडक सुरक्षा व्यवस्थेत नरेंद्र मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं. पुतिन हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *