Mumbai : पाच वर्षांच्या चिमुकलीचा तब्बल ५० हजारांत सौदा; वाकोला पोलिसांनी केला बालविक्री रॅकेटचा पर्दाफाश

Mumbai : मुंबईतल्या अंधेरित असलेल्या वाकोला पोलिसांनी एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पाच वर्षांच्या चिमुकलीचं अपहरण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या मुलीचा ५० हजार रुपयांमध्ये सौदा करण्यात आला होता. या प्रकरणी चौघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

एका मुलीचे अपहरण करून विक्री करण्याचा बेत आखणाऱ्या ४ आरोपींना पोलिसांनी अटक केली. यामध्ये अब्दुल मनाफ शेख (52), लोरीन फर्नांडिस (42), मोहमद काशेम खान (28), तरुण नामदेव सावंत (26) या संशयित आरोपींचा समावेश आहे.

Hadapsar Traffic : सततची कोंडी, वाहनचालक त्रस्त; वाहतूक पोलीस आणि अतिक्रमण विभागाचे हडपसरकडे दुर्लक्ष

संशयितांनी मुलीचे अपहरण करून ५० हजार रुपयांना विक्रीचा सौदा ठरवला होता, अशी माहिती आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही, तांत्रिक तपास आणि माहितीदारांच्या मदतीने आरोपींचा माग काढला. ही चिमुकली रायगड जिल्ह्यातील न्हावेलीतून पोलिसांनी सुखरूप शोधून काढली.

आरोपी याआधीही अशा दुष्कृत्यात गुंतलेले असावेत, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून या पीडित मुलीला सुरक्षितपणे आईकडे सुपूर्द करण्यात आलेलं आहे. घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. सध्या चारही आरोपी वाकोला पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस कसून चौकशी करीत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *