Mumbai : सिडकोच्या घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता; राज्य सरकार आज घेणार महत्वाचा निर्णय

Mumbai : नवी मुंबईत आपल्या हक्काचे घर असावे असे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आणि स्वस्त घर खरेदी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण सिडकोच्या घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासंदर्भात आज महत्वाची बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याबाबत मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सिडकोच्या घरांच्या किमती करण्यासंदर्भात मागणी केली जात आहे. विरोधकांनी आणि भाजपचे आमदार विक्रांत पाटील यांनी सुद्धा सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासंदर्भात सरकारला घेरले होते. तसेच पावसाळी अधिवेशनामध्ये घरांच्या किमती कमी केल्या जातील असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले.

Solapur : तब्बल 105 तासांनंतर सोलापुरातील आयकर विभागाची कारवाई संपली; रात्री पंचनामा पूर्ण, जप्त कागदपत्रांची सखोल पडताळणी सुरू होणार

मात्र चार वेळा सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासंदर्भामध्ये बैठक रद्द करण्यात आली होती. मात्र आता या बैठकीला मुहूर्त मिळाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज ही महत्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीला सिडकोचे अधिकारी आणि नगर विकास विभागाचे अधिकारी उपस्थित राहतील.

सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासंदर्भामध्ये या बैठकीत चर्चा होणार आहेत. मंत्रालयामध्ये आज बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेआणि भाजप आमदार विक्रांत पाटील यांना आमंत्रित करण्यात आला आहे. सिडकोने २६ हजार घरांची लॉटरी काढण्यात आली होती.

मात्र घरांच्या किमती भरमसाठ असल्यामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर जात असल्यामुळे जवळपास १८ हजारांपेक्षा अधिक लोकांनी घर रद्द करण्यात आली आहेत. तसेच अनेकांचे घर घेतल्यानंतर हप्ते सुद्धा सुरू झाले आहेत. या घरांच्या किमती कमी करण्यात याव्यात अशी मागणी केली जात आहे. आज याबाबत मोठा निर्णय होईल.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *