Pune : पुणेकरांसाठी खुशखबर! ४५ किमीचा ‘ट्विन टनेल’ अंडरग्राउंड रस्ता प्रस्तावित; चारही महामार्ग होणार थेट जोडले

Pune : शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अहिल्यानगर, सोलापूर, सातारा आणि पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग अशा चारही महामार्गांना जोडणारा सुमारे ४५ किलोमीटर लांबीचा भूमिगत रस्त्याचा पर्याय पुढे आला आहे. या संदर्भात सल्लागार कंपनीने पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) त्याचा आराखडा सादर केला आहे. हा मार्ग सहापदरी असून शहराच्या तीन भागांत तीन ठिकाणच्या रस्त्यांना तो जोडला जाणार आहे. तीन टप्प्यांत हा रस्ता प्रस्तावित आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत 'पीएमआरडीए'ने कात्रज ते येरवडा रस्ता भूमिगत करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली होती. तसेच या प्रकल्पाचा आराखडा तयार करावा, तो 'द्विन टनेल' असावा, यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. त्यादृष्टीने प्राधिकरणाने या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासणीसाठी निविदा मागविल्या होत्या. तीन कंपन्यांनी एका कंपनीला हे काम दिले असून त्यांनी सर्वेक्षण पूर्ण करून प्रारूप आराखडा प्राधिकरणाला सादर केला आहे.

Ahilyanagar Crime : संतापजनक संपत्तीच्या लालसेत नातवाने आजीचा जीव घेतला; नातसूनचीही सहभाग

आराखड्यात काय आहे?

महापालिकेच्या विकास आराखड्यात तळजाई टेकडी आणि वेताळ टेकडी या दोन्ही ठिकाणी भूमिगत रस्त्यांचा समावेश केला आहे. प्रारूप आराखड्यात या दोन्ही ठिकाणच्या रस्त्यांच्या विचार केला आहे. त्यामुळे हे दोन्ही टेकडीखालील रस्ते याच रस्त्यांचा भाग असतील. तर स्वारगेट, जगताप डेअरी आणि कात्रज या तीन ठिकाणी बोगद्यातून जाण्याचे आणि बाहेर पडण्याचे पर्याय देण्यात आले आहेत. हा प्रस्तावित रस्ता झाल्यानंतर येरवडा, लष्कर भाग, कात्रज, सेनापती बापट रस्ता, कोथरूडसह शहराच्या मध्यवस्तीतील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होईल.

सुमारे ४५ किलोमीटर सुचविण्यात आलेले पर्याय

येरवडा ते खडीमशिन चौक

शिवाजीनगर ते येरवडा

जगताप डेअरी ते कोथरूड

महत्त्वाचे

या आराखड्यात पुणे शहरात येणाऱ्या सर्व महामार्गांना जोडणारा आणि तीन ठिकाणावरून ये-जा करणे शक्य हाईल, असा सुमारे ४५ किलोमीटर लांबीच्या भूमिगत रस्त्याचा पर्याय मांडला आहे

भूमिगत रस्ता प्रस्तावित करताना भूमिगत मेट्रोला कुठेही बाधा येणार नाही, अशा पद्धतीने त्यांची रचना

जमिनीखाली ३० मीटर अंतरावरून हा रस्ता प्रस्तावित

हा सहापदरी रस्ता असेल. त्यासाठी तीन टप्पे प्रस्तावित

प्राथमिक अंदाजानुसार रस्त्यासाठी सुमारे २० ते २२ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित

यात काही बदलही सुचविण्यात

येणार आहेत

प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर राज्य सरकारकडे हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी सादर होणार



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *