
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशमधील कुर्नूल या ठिकाणी एका व्होल्वो बसला अचानक भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी रात्री घडली आहे. या घटनेत किमान २० जणांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. ही व्होल्वो बस ४० जणांना घेऊन हैदराबादवरून बंगळुरूकडे जात होती अशी माहिती सांगितली जात आहे.
या घटनेच्या प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी सांगितलं की, एक मोटरसायकल बसला येऊन धडकली आणि अचानक बसला भीषण आग लागली. त्यानंतर पुढच्या काही मिनिटांत बस जळून खाक झाली. जेव्हा मोटरसायकल आणि बसची धडक झाली तेव्हा बसच्या इंधनाची टाकी फुटली आणि त्यानंतर आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
|
Pune : वडील हयात नसल्याचा घेतला फायदा; मुलीवर विनयभंग,पीडितेच्या आईला धमकी |
आंध्र प्रदेशातील कुर्नूलमधील बसच्या या दुर्दैवी घटनेबाबत मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “कर्नूल जिल्ह्यातील चिन्ना टेकूर गावाजवळ झालेल्या भीषण बस आगीच्या दुर्घटनेबद्दल ऐकून मला धक्का बसला. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे, त्यांच्या कुटुंबियांबद्दल माझ्या मनापासून संवेदना आहेत. तसेच या घटनेत जखमी आणि बाधित कुटुंबांना सर्वतोपरी मदत सरकार करेल.”
टीडीपी आमदार लोकेश नारा यांनी म्हटलं की, “कर्नूल जिल्ह्यातील चिन्ना टेकूर गावाजवळ झालेल्या भीषण बस आगीच्या दुर्घटनेची बातमी हृदयद्रावक आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे त्यांच्या कुटुंबियांबद्दल मी माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो.”
कुर्नूल बस दुर्दैवी घटनेबाबत आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी म्हटलं की, “ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं त्यांच्या कुटुंबियांबद्दल मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. या दुर्दैवी घटनेत जखमी झालेल्यांना आवश्यक ती सर्व मदत आणि वैद्यकीय मदत मिळावी अशी मी सरकारला विनंती करतो.”
“आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनेमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल अत्यंत दुःख झालं आहे. या कठीण काळात माझ्या संवेदना बाधित लोक आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींना ते लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो. प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये दिले जातील आणि जखमींना ५०,००० रुपयांची मदत दिली जाईल”, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने एक्सवर (ट्विटर) दिली आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



