
Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणे प्रकरणात नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैष्णवीचा नवरा शशांक आणि दीर सुशील यांनी खोटा पत्ता दाखवून शस्त्र परवाना मिळवाला. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हे तर दाखल करण्यात आले आहेत. या दोघांना शस्त्रपरवाना मिळवून देण्यासाठी विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी मदत केल्याचा आरोप करण्यात आला. त्यावर आता जालिंदर सुपेकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 'हगवणे यांना शस्त्र परवाना मीच दिला आहे हे म्हणणे चुकीचे आहे.' असे त्यांनी सांगितले. तर खोटे पत्ते दाखवून हगवणे यांना शस्त्र परवाना दिल्याप्रकरणी तत्कालीन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता अडचणीत आले आहेत.
हगवणे यांना शस्त्र परवाना मीच दिला आहे हे म्हणणे चुकीचे असल्याचे स्पष्टिकरण जालिंदर सुपेकर यांनी दिले आहे. व्हॉट्सॲपवरून स्पष्टीकरण देत त्यांनी याबाबतची माहिती दिली. शस्त्र परवाना देण्याचे अधिकार संबंधित पोलिस आयुक्तांना असतात असे सुपेकर यांनी सांगितले. गैरसमजातून प्रसिद्ध होत असलेल्या बातम्यांमुळे मानसिक त्रास होत असल्याचं सुपेकर यांचे म्हणणे आहे. विनाकारण बदनामी थांबवावी, अशी विनंती देखील त्यांनी केली आहे. पेकर हे सध्या कारागृह सेवा सुधार विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत.
|
Ladki Bahin Yojana : २६५२ सरकारी कर्मचाऱ्यांनी लाटले लाडक्या बहिणीचे पैसे; सरकार करणार कारवाई |
जालिंदर सुपेकर यांनी केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, 'शस्त्र परवाना देण्याचे अधिकार संबंधित पोलिस आयुक्तांना असतात. तत्पुर्वी सदर अर्जदाराच्या अर्जावर स्थानिक पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनुकूल अथवा प्रतिकूल अहवाल संबंधित पोलिस उपयुक्तांना देतात. त्यांनी पडताळणी केल्यावर सदरचा परवाना पोलिस आयुक्त यांच्याच अंतिम मान्यतेने दिला जातो. त्यानंतर त्याचे आदेश हे अप्पर पोलिस आयुक्त प्रशासन हे काढत असतात. त्यामुळे संबंधित शस्त्र परवाना देण्याच्या अंतिम निर्णय प्रक्रियेमध्ये माझा कुठलाही सहभाग नसतो. त्यामुळे सदरचा परवाना मीच दिला आहे हे म्हणणे चुकीचे आहे.'
तर दुसरीकडे, खोटे पत्ते दाखवून हगवणे यांना शस्त्र परवाना दिल्याप्रकरणी तत्कालीन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता अडचणीत आले आहेत. हगवणे यांच्या शस्त्र परवाना अर्जावर सही अमिताभ गुप्ता यांनी पडताळणी न करता दिली. अमिताभ गुप्ता २०२२ मध्ये पुणे शहराचे पोलिस आयुक्त होते. नियमाप्रमाणे शस्त्र परवाना देताना अंतिम सही पोलिस आयुक्त यांचीच असते. मूळ पत्ता हा पुणे जिल्ह्यातला असून खोटा रहिवासी पुरावा देत पुणे शहर पोलिस आयुक्तालयात शस्त्र परवानासाठी हगवणे यांनी अर्ज केला होता. स्थानिक पोलिस निरीक्षक, पोलिस उपायुक्त, अप्पर पोलिस आयुक्त प्रशासन यांच्या पडताळणीनंतर पोलिस आयुक्त शस्त्र परवाना अर्जावर सही करतात. त्यामुळे हगवणे यांना शस्त्र परवाना दिल्याप्रकरणी अमिताभ गुप्ता यांचे पण नाव पुढे येत आहे.
शहर
- छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि पराक्रम अनुभवा! गोव्यातील ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शनाला भेट देण्याचे शिक्षण संचालनालयाचे विद्यार्थ्यांना आवाहन.
- भारताच्या समुद्री सुरक्षेत मोठी भर! गोवा शिपयार्डमध्ये निर्मित 'ICGS अक्षय' फास्ट पेट्रोल वेसल भारतीय तटरक्षक दलात दाखल.
- मलकापुरातील उड्डाणपुलावरून वाहतूक पुन्हा सुसाट! हलक्या वाहनांची चाचणी यशस्वी; पुढील आठवड्यात कोल्हापूर-पुणे लेनवर होणार ट्रायल रन.
- तुमचा मोबाईल गुपचूप तुमचे बोलणे ऐकतोय का? हॅकर्सपासून वाचण्यासाठी आणि प्रायव्हसी जपण्यासाठी 'या' ५ सेटिंग्ज त्वरित बदला!
महाराष्ट्र
- मलकापुरातील उड्डाणपुलावरून वाहतूक पुन्हा सुसाट! हलक्या वाहनांची चाचणी यशस्वी; पुढील आठवड्यात कोल्हापूर-पुणे लेनवर होणार ट्रायल रन.
- लातूरमध्ये महिलांचा संताप! शिरूर अनंतपाळमध्ये महामार्गावरील अवैध दारू अड्ड्यावर महिलांचा हल्ला; दारू अड्ड्याची केली तोडफोड.
- राज्यातील १२ दुय्यम निबंधक कार्यालये संशयाच्या भोवऱ्यात; कागदपत्रांची छाननी न करताच दस्त नोंदणीचा 'धडाका'!
- चिपळुणात फ्रँचायझीचे आमिष दाखवून १० लाखांची फसवणूक; स्पेअर पार्ट व्यावसायिकाला गंडा, दोन संशयितांवर गुन्हा दाखल.
गुन्हा
- माणुसकीला काळीमा! ६ महिन्यांच्या गरोदर पत्नीची पतीने केली निर्घृण हत्या; बादलीत तोंड बुडवून संपवला जीव.
- लग्नाचे आमिष दाखवून १५ लाखांना गंडा! नवरी मुलगी आणि मध्यस्थाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; मोठ्या टोळीचा पर्दाफाश.
- 'गॅस कनेक्शन बंद होईल' असा मेसेज आलाय? सावधान! एका क्लिकवर तुमचे बँक खाते होऊ शकते रिकामे.
- पुणे: केतन अग्रवाल हत्याकांड, सिया गोयलच्या भावाची १० तास चौकशी; चेतन चौधरीसोबतचे 'क्रिकेट' कनेक्शन उघड!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारताच्या समुद्री सुरक्षेत मोठी भर! गोवा शिपयार्डमध्ये निर्मित 'ICGS अक्षय' फास्ट पेट्रोल वेसल भारतीय तटरक्षक दलात दाखल.
- तुमचा मोबाईल गुपचूप तुमचे बोलणे ऐकतोय का? हॅकर्सपासून वाचण्यासाठी आणि प्रायव्हसी जपण्यासाठी 'या' ५ सेटिंग्ज त्वरित बदला!
- भारतीय नौदलात भरतीची सुवर्णसंधी! २७५ एसएससी (SSC) अधिकारी पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; २७ जुलैपर्यंत आहे शेवटची मुदत.
- रिटायरमेंटनंतर पूर्ण पेन्शन हवंय? नोकरी सोडताना 'या' EPFO डॉक्युमेंटला बिलकुल विसरू नका!




























Subscribe to my channel

