
Accident News : अहिल्यानगरमध्ये पेट्रोलचा टँकर पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये टँकर चालक गंभीर जखमी झाला. हा अपघात झाल्यानंतर गावागावामध्ये वाऱ्यासारखी बातमी पसरली. मग काय पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांनी अपघातग्रस्त टँकरच्या बाजूने घोळका केला. मिळेल्या त्या भाड्यामध्ये पेट्रोल भरून गावकरी पसार झाले. याचा व्हिडीओ समोर आला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगरच्या करंजी घाटात २० हजार लिटर क्षमतेचा पेट्रोलचा टँकर पलटी होऊन अपघात झाला. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मुंबईवरून परभणीच्या दिशेने हा टँकर निघाला होता. पण वाटेतच घाटामध्ये हा टँकर पलटी झाला. टँकरचा ब्रेकफेल झाल्याने माणिकशहा पीरबाबा दर्ग्याजवळ टँकर पलटी झाला. या अपघातामध्ये टँकर चालक गंभीर जखमी झाला.
|
|
पेट्रोलच्या टँकरला अपघात झाल्याचे कळताच आसपासच्या गावातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. ज्याला जे शक्य होईल त्या वस्तू ते पेट्रोल भरून घेऊन जाण्यासाठी घेऊन आले. कुणी पाण्याच्या बाटल्या, कुणी पाण्याचे कँड तर कुणी दुधाच्या किटल्या घेऊन आले आणि त्यामध्ये पट्रोल भरून ते पसार देखील झाले. अपघातानंतर टँकरमधून पेट्रोलची मोठ्या प्रमाणात गळती सुरू होती त्यामुळे माणिकशहा पीरबाबा दर्ग्याजवळ रस्त्यावर सगळीकडे पेट्रोल पसरले होते.
घटनेची माहिती मिळताच पाथर्डी पोलीस स्टेशन आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अहिल्यानगर आणि पाथर्डीतून अग्निशमन दलाच्या दोन गाडयांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामुळे सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. या अपघातामध्ये मकबल पठाण हा टँकर चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




