पुण्यात कला, सर्जनशीलता आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम पाहायला मिळणार आहे.

Pune : सर्जनशीलतेचा उत्सव, पुण्यात रंगणार‘क्रिएटिव्ह आर्ट अफेअर्स’चा ‘क्रिएटिव्ह लीव्ह्ज XII’ कला महोत्सव

Pune :  क्रिएटिव्ह आर्ट अफेअर्स आपल्या चाहत्यांसमोर पुन्हा एकदा कलाक्षेत्रातील नव्या आणि अनुभवी कलाकारांचे प्रदर्शन सादर करत आहे. या वर्षी ‘क्रिएटिव्ह लिव्हज XII’ समूह प्रदर्शन आणि बहुविध प्रतिभा असलेल्या अम्ब. डॉ. (एच.सी.) संजय मौर्य यांचे चौथे एकल प्रदर्शन ‘रिफ्लेक्शन्स ऑफ लाईफ ऑन कॅनव्हास’ आयोजित केले जात आहे.

कार्यक्रमात पाहुण्या कलाकार रंजना कश्यप आणि अमिता चक्रवर्ती यांच्या उत्कृष्ट कलाकृती तसेच C.A.A. टीम चे सदस्य डॉ. स्मिता बागवाडे, संध्या साळुंके, राजिंदर कुमार पोन्ना आणि अनिंदिता रे यांच्या कलाकृतींचे दर्शन घडणार आहे.

सामाजिक मुद्द्यांवर आधारित कलाकृतींचा सादरीकरण हा कलाकारांचा महत्त्वाचा संदेश असून, ‘क्रिएटिव्ह आर्ट अफेअर्स’ या माध्यमातून संस्कृतीबद्दल जागरूकता निर्माण करण्याबरोबर शांततेवर, प्राण्यांवरील प्रेमावर, महिलांवरील गुन्हेगारी विरोधात आणि कृतीसाठी प्रेक्षकांना प्रेरणा देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन ९ एप्रिल रोजी दुपारी ४.०० वाजता जेष्ठ कलाकार आणि पुण्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत होईल.

स्थळ: बालगंधर्व कला दालन, शिवाजी नगर, पुणे
दिनांक: ०९–११ एप्रिल, २०२६
संध्याकाळ: सकाळी ११.०० ते सायंकाळी ७.००



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *