
Mumbai : शीव कोळीवाडा, जीटीबीनगरमधील सिंधी निर्वासितांच्या २५ इमारतींच्या पुनर्विकासासाठीच्या तांत्रिक-आर्थिक निविदा खुल्या करण्यात आल्या असून येत्या काही दिवसांतच निविदा अंतिम करण्यात येणार होती. मात्र आता ही प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निविदा प्रक्रियेस स्थगिती दिली आहे. म्हाडाच्या निविदा प्रक्रियेवर आक्षेप घेणारी एका खासगी विकासकाची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच म्हाडाला या पुनर्विकासासंबंधी कोणतीही पुढील कार्यवाही न करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार निविदेची प्रक्रिया थांबविण्यात आली आहे.
सिंधी निर्वासितांच्या २५ इमारतींचा रखडलेला पुनर्विकास राज्य सरकारने म्हाडाच्या माध्यमातून मार्गी लावण्याचा निर्णय घेतला. या पुनर्विकासाची जबाबदारी आपल्याकडे आल्यानंतर मंडळाने मोतीलालनगरच्या धर्तीवर खासगी विकासकाची नियुक्ती करून (कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी) पुनर्विकास मार्गी लावण्यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला होता. या प्रस्तावाला मंत्रिमंडळाच्या मार्चमधील बैठकीत हिरवा कंदील दाखविण्यात आला. यासंबंधीचा शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला. एकूणच पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाल्याने मुंबई मंडळाने पुनर्विकासासाठी निविदा काढण्याचा निर्णय घेतला.
|
|
त्यानुसार लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्यापूर्वीच यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली. ही निविदा प्रक्रिया सुरू असतानाच एका खासगी विकासकाने या पुनर्विकासावर, निविदा प्रक्रियेवर आक्षेप घेत उच्च न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाने एप्रिलमध्ये निविदेला स्थगिती दिली. मात्र नोव्हेंबरमध्ये उच्च न्यायालयाने विकासकाची याचिका फेटाळून लावत म्हाडाला दिलासा दिला.
उच्च न्यायालयाचा दिलासा मिळाल्यानंतर मंडळाने तात्काळ निविदा प्रक्रियेस सुरुवात करून गेल्या आठवड्यात पुनर्विकासासाठीच्या तांत्रिक निविदा खुल्या केल्या. रुणवाल डेव्हलपर्स आणि कीस्टोन रिलेटर्स या दोन कंपन्यांच्या निविदा सादर झाल्या. या निविदांची छाननी करून मंडळाने नुकतीच आर्थिक निविदाही खुली केली असून येत्या काही दिवसांतच निविदेला अंतिम स्वरूप दिले जाणार होते. मात्र निविदा प्रक्रिया पुन्हा रखडली आहे. संबंधित विकासकाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने निविदा प्रक्रियेला तूर्तास स्थगिती दिल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. सर्वोच्च न्यायालयात यासंबंधी पुढील सुनावणी २० जानेवारी रोजी होईल.
शहर
- मुंबई: रात्री जेवणानंतर शतपावली करताना मंत्री अदिती तटकरे यांचे पीआरओ आशिष मेटे यांचे आकस्मिक निधन
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- मुंबई: महायुतीत अंतर्गत वाद पेटला; मुंबई बँकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना थेट आमनेसामने येण्याची दाट शक्यता
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
महाराष्ट्र
- मुंबई: रात्री जेवणानंतर शतपावली करताना मंत्री अदिती तटकरे यांचे पीआरओ आशिष मेटे यांचे आकस्मिक निधन
- मुंबई: महायुतीत अंतर्गत वाद पेटला; मुंबई बँकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना थेट आमनेसामने येण्याची दाट शक्यता
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
- मुंबई: एक देश, एक निवडणूक'मुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि विकासकामांना वेग मिळेल; नेत्यांचे स्पष्ट प्रतिपादन
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- चेन्नई: २०२९ला राहुल गांधीच पंतप्रधान, विजय यांनी समर्थन न दिल्यास मंत्रिपदाचे राजीनामे देऊ ;काँग्रेसचा तामिळनाडू सरकारला थेट इशारा
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!



























Subscribe to my channel


