
Pune : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून सर्वच राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते प्रचारात सहभागी होत एकमेकांवर टीकेची झोड उठवत आहेत. पुण्यात महायुतीत मित्रपक्ष म्हणून सहभागी असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या काही पदाधिकाऱ्यांनी घेतलेली भूमिका महायुतीला अडचणीची ठरत आहे. ‘रिपाइं’च्या पदाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे महायुतीची डोकेदुखी वाढणार आहे.
भारतीय जनता पक्षाबरोबर मित्रपक्ष म्हणून महायुतीत समाविष्ट असतानाही ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’च्या (रिपाइं) शहरातील पदाधिकाऱ्यांना सन्मान मिळत नसल्याने ‘रिपाइं’च्या गटातील पदाधिकाऱ्यांची नाराजी अद्यापही कायम आहे. भाजपकडून सन्मान मिळत नसल्याने विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मतदान न करण्याची शपथ या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यामध्ये कोणताही बदल झालेला नसल्याने महायुतीची डोकेदुखी वाढणार आहे.
मित्रपक्ष असतानाही ‘रिपाइं’ला सन्मान मिळत नसल्याचा आरोप करून माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या नेतृत्वाखाली काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या निवडणुकीत महायुतीला मतदान न करण्याची शपथ या पदाधिकाऱ्यांनी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ घेतली आहे. ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे महायुतीकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, अद्यापही ही नाराजी दूर झालेली नाही.
|
Pune : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…! |
‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’चे (आठवले गट) प्रमुख खासदार रामदास आठवले यांनी यामध्ये पुढाकार घेऊन पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला यश आले नाही. आठवले यांनी फोनवरून समजूत काढण्याचा प्रयत्न केल्यानंतरही पदाधिकारी मतदान न करण्याच्या निर्धारावर ठाम असल्याने महायुतीसमोरील अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. पक्षाचे नेते आठवले हे केंद्रात मंत्री आहेत. भाजप नेत्यांकडे ते वारंवार रिपाइंला विधानसभा निवडणुकीत किमान १२ जागा द्याव्यात, असे म्हणत होते. पण भाजपने किंवा महायुतीमधील अन्य पक्षांनाही या मागणीकडे लक्ष दिले नाही. जागावाटपात आठवले यांना सामावून घेतले नाही. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मतदान न करण्याची शपथ घेतल्याचे डॉ. धेंडे यांनी सांगितले.
भाजपला आंबेडकरी विचारांची मते चालतात. मात्र, त्यांना सत्तेत वाटा द्यायचा नाही, हे धोरण योग्य नाही. त्यामुळे महायुतीला मतदान करायचे नाही, हा निर्णय घेतला आहे. त्याला आंबेडकरी चळवळीतील अनेकांचा पाठिंबा मिळाला.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




