Tukaram Munde Transfer: ‘सिंघम’ पुन्हा ऑन मिशन! 21 वर्षांत 25 वी बदली; आता आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी

Mumbai :प्रशासनातील ‘सिंघम’ म्हणून ओळख असलेले Tukaram Munde यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. राज्य सरकारने बुधवारी 10 सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले असून त्यात मुंढे यांचाही समावेश आहे. 21 वर्षांच्या कारकिर्दीत ही त्यांची तब्बल 25 वी बदली ठरली आहे.

आता मुंढे यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिवपद सोपवण्यात आले आहे. त्यांच्या बदलीनंतर संबंधित विभागात आधीच चर्चा आणि कुजबुज सुरू झाली असून, “मुंढे येणार म्हणजे मोठे ऑपरेशन होणार” अशीच प्रतिक्रिया अधिकाऱ्यांमध्ये पाहायला मिळत आहे.

 

‘ऑन मिशन’ अधिकारी म्हणून ओळख

तुकाराम मुंढे हे कोणत्याही खात्यात गेले तरी तिथे शिस्त, पारदर्शकता आणि कडक कारवाई यासाठी ओळखले जातात. त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक बदलीकडे केवळ प्रशासकीय निर्णय म्हणून नाही, तर “मोठ्या बदलांची नांदी” म्हणून पाहिले जाते.

 दिव्यांग विभागातील धडाकेबाज कारवाई

यापूर्वी त्यांनी दिव्यांग विभागाची जबाबदारी सांभाळताना मोठ्या प्रमाणात गैरव्यवहारांवर कारवाई केली होती.

बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांवर लगाम

बनावट संस्थांची नोंदणी रद्द

संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई

या धडक कारवाईमुळे संपूर्ण विभागात खळबळ उडाली होती. काहींनी दबावामुळेच त्यांची बदली झाल्याचा आरोपही केला होता.

21 वर्षांत 25 बदली; तरीही धडाडी कायम

2005 बॅचचे आयएएस अधिकारी असलेले मुंढे यांनी सोलापूर येथे उपजिल्हाधिकारी म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि सचिव अशा विविध पदांवर काम करत ठसा उमटवला.

“बदली हा त्यांच्या कामाचा भाग आहे, पण प्रत्येक ठिकाणी ते परिणाम करूनच बाहेर पडतात,” अशीच त्यांची प्रतिमा प्रशासनात तयार झाली आहे.

पुढे काय?

आता आपत्ती व्यवस्थापन विभागात ते कोणते निर्णय घेतात, कोणत्या पातळीवर सुधारणा करतात आणि कोणावर कारवाईचा ‘धडाका’ लावतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *