
Pune : 2026 मध्ये पार पडलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत नेत्यांनी दिलेल्या आश्वासनांनुसार नागरी प्रशासनाकडून कर सवलत मिळण्याची आशा बाळगून असलेल्या लहान मालमत्तेच्या मालकांना मात्र आणखीच वाट पाहावी लागणार आहे. अलीकडेच पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीने अर्थसंकल्प जाहीर करताना 500 चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्तांसाठी कोणत्याही प्रकारची सरसकट करमाफी जाहीर केली नाही, जी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) धोरणामध्ये लागू केलेली.
महिलांना मालमत्ताधारकांना पुणे पालिकेकडून टॅक्स भेट
याउलट महिलांच्या मालकी हक्काला प्रोत्साहन पुणे शहरात महानगपालिकेकडून 31 मार्च 2026 पर्यंत महिलांच्या नावावरील 500 चौरस फुटांपर्यंतच्या मिळकतींना 50% मिळकत करमाफी जाहीर केली आहे. अशाप्रकारे, महिलांच्या नावावर मालमत्ता नोंदणी करण्याचा चलन वाढू शकेल.
भारतीय जनता पक्षाने अलीकडेच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात अशा प्रकारच्या करमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र, आता पुणे महानगरपालिकेने केवळ लहान मालमत्ता आणि विशेषतः ज्या मालमत्तांची मालकी महिलांकडे आहे, केवळ त्यांच्यासाठीच 50% करसवलत जाहीर केली आहे.
श्रीनाथ भिमाले यांनी सादर पुणे महापालिकेच्या 2026- 27 अर्थसंकल्प केला, ज्यामध्ये यंदा सशक्त महिला -सक्षम समाज यावर भर दिला गेला आहे. PMC चा नेमका अर्थसंकल्प काय?
पुणे महानगरपालिकेच्या अधिकारक्षेत्रात सुमारे 14.92 लाख मालमत्तांचा समावेश असून 19 फेब्रुवारी 2026 पर्यंत सुमारे 11.10 लाख मालमत्तांच्या मालकांनी 2,713.60 कोटींचा कर भरला होता आणि आता 31 मार्च 2026 पर्यंत 3,250 कोटींचा महसूल उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
तसेच अर्थसंकल्पीय दस्तऐवजानुसार अनधिकृत बांधकामांवरील दंड करांच्या वसुलीसाठी ‘अभय योजना’ सुरू करण्याचेही नमूद केले असून दंड आणि व्याजावरील सवलतींच्या माध्यमातून मालमत्ता मालकांना प्रोत्साहन दिले जाईल. तसेच, प्रलंबित वाद मिटवण्यासाठी ‘लोक अदालती’चेही आयोजन केले जाईल. तसेच पीएमसीला मोबाईल टॉवर्सकडून सुमारे 4,770 कोटी रुपयांची थकबाकी वसूल करणेही अद्याप बाकी असल्याचे अर्थसंकल्पीय दस्तऐवजांमध्ये म्हटले आहे.
कर संकलन आणि महसूल निर्मितीबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी 15 प्रभाग कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात विशेष मासिक शिबिरे आयोजित करण्याचा महानगरपालिकेचा निर्धार असून मालमत्ता नोंदणी, मूल्यांकन आणि प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यावर या शिबिरांमध्ये विशेष भर दिला जाईल. तसेच, स्व-मूल्यांकन सुविधाही पुन्हा सुरू करण्याचे अर्थसंकल्पात आश्वासन दिले गेले.
शहर
- मुंबई: ज्ञानेश कुमारांनी कोणत्याही दबावाखाली येऊन राजीनामा देऊ नये: केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा विरोधकांना सणसणीत टोला व पूर्ण पाठिंबा
- नागपूर: "देशातील संविधान संपवून कम्युनिस्ट विचारसरणी लादण्याचा काँग्रेसचा डाव" राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर सत्ताधारी नेत्यांचा अत्यंत गंभीर व आक्रमक हल्लाबोल!
- मुंबई: पुन्हा भयानक दुर्घटना! उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका सफाई कामगाराचा जिवंत मृत्यू, दुसरा कामगार अतिरक्षक प्रकृतीत व्हेंटिलेटरवर
- छत्रपती संभाजीनगरः "मी मरेन, पण कधीही शरण जाणार नाही!"मनोज जरांगे यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल; दसऱ्यानंतर आंदोलनाची नवीन दिशा ठरवण्याचा इशारा
महाराष्ट्र
- सातारा: कृष्णा-कोयना काठच्या पिकांवर मोठे संकट; प्रशासनाकडून पीक पाहणीचा सविस्तर अहवाल सादर
- मुंबई: ज्ञानेश कुमारांनी कोणत्याही दबावाखाली येऊन राजीनामा देऊ नये: केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा विरोधकांना सणसणीत टोला व पूर्ण पाठिंबा
- सातारा: वयाच्या पंच्याहत्तरीतही विशीसारखा उत्साह! वाईच्या जिद्दी आजीने सलग ९ वेळा वाचन करून स्वहस्ताक्षरात संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहून काढली
- ठाणे: कोपरी पोलीस ठाण्यातच महिलांनी युट्युब भाई सिद्धू अभंगेला धुतले; पोलिसांसमोरच घडला राडा
गुन्हा
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
- पुणे: लॉजमध्ये प्रियकरासोबत वाद; तरुण रागाने निघून गेला अन् तरुणीने संपवलं आयुष्य, हडपसरमधील घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र OBC कॉलमसाठी काँग्रेसचा मोठा एल्गार; १ नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली' आंदोलनाची घोषणा!
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल



























Subscribe to my channel




