
Pimpri : मागील आठ वर्षांपासून राज्याची सूत्रे भाजपकडे आहेत. भाजपने सत्तेचे केंद्रीकरण केले. केंद्रित झालेली सत्ता भ्रष्ट आहे. त्यामुळे महायुती सरकारला उलथवून टाका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. तसेच, लोकसभेला महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीचे ३१ खासदार निवडून दिल्याने भाजपचा राज्यघटनेवर हल्ला करण्याचा दृष्टिकोन आम्ही थांबवू शकलो, असेही ते म्हणाले.
भोसरी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारासाठी गावजत्रा मैदानावर पवार यांची सभा झाली, त्या वेळी ते बोलत होते. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे संपर्क प्रमुख, आमदार सचिन अहिर, माजी आमदार विलास लांडे, जयदेव गायकवाड, जगन्नाथ शेवाळे यावेळी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीवेळी भाजपने चारशे पारचा नारा दिला. बहुमतासाठी चारशे जागांची आवश्यकता नसतानाही हा नारा दिला होता. कारण, राज्यघटना बदलण्यासाठी भाजपला चारशे खासदार हवे होते. घटनेत सुधारणा करून सामान्य नागरिकांच्या अधिकारांवर गदा आणण्याचा उद्देश भाजपचा होता. लोकशाही, घटनेवर होणारा हल्ला राज्यातील जनतेने हाणून पाडला. महाविकास आघाडीचे ३१ खासदार निवडून दिले. त्यामुळे राज्यघटनेवर हल्ला करण्याचा दृष्टिकोन थांबल्याचे सांगून शरद पवार म्हणाले, की यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून पिंपरी-चिंचवडमध्ये उद्योग आले. त्यामुळे हजारो लोकांच्या हाताला काम मिळाले.
|
Pimpri : बालेकिल्ल्यात दोन्ही ‘राष्ट्रवादी’साठी प्रतिष्ठेची लढाई |
देशाच्या बाहेर पिंपरी-चिंचवडचे नाव मोठे झाले. हिंजवडीत माहिती तंत्रज्ञाननगरी आणली. हिंजवडीत गेल्यावर परदेशात गेल्यासारखे वाटते. कोट्यवधी रुपयांची निर्यात हिंजवडीतून होते. परदेशातील कंपन्यांची मुख्य कार्यालये हिंजवडीत आहेत. शिक्षणानंतर उद्योग आणि आयटीचे माहेरघर म्हणून आता पुण्याची ओळख निर्माण झाली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये गर्दी वाढल्याने चाकण, रांजणगाव, शिरवळ, तळेगाव दाभाडे या भागात नवीन कारखानदारी उभी केली.
एकीकडे राज्य शासन लाडकी बहीण योजना राबवत आहे. दुसरीकडे मात्र, राज्यातील महिला, मुली सुरक्षित नाहीत. महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातील एका शाळेतील दोन मुलींवर अत्याचार झाले, या घटनेमुळे राज्याचे नाव खराब झाले. गेल्या वर्षभरात ८८६ मुली बेपत्ता आहेत. मग, शासन बहिणींची काय काळजी घेत आहे, असा सवालही पवार यांनी केला.
शहर
- पुणे: गणेश विसर्जन मिरवणूक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून तब्बल २६ ठिकाणी वाहन पार्किंगची जय्यत व्यवस्था!
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- पुणे: अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा निश्चित; २४ ऑक्टोबरला करणार 'प्रेरणास्थळा'चे उद्घाटन, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा!
महाराष्ट्र
- नंदुरबार: प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या आणि नियम मोडणाऱ्या दोन खासगी बसेसवर मोठी कारवाई; आरटीओच्या वायुवेग पथकाकडून दंड वसूल!
- जालना: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी अन् हेक्टरी भरपाई द्या; मागण्या मान्य न झाल्यास पाटोद्यावरून मुंबईकडे कूच करण्याचा मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा
- गोवा:राजकारणात खळबळ मंत्री विश्वजित राणे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व इतर नेत्यांची भेट, दिल्लीत महत्त्वपूर्ण चर्चा!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांना मोठा दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!































Subscribe to my channel




