
Pune : गेल्या काही वर्षांचा विचार करता पुणे विमानतळावरून हवाई प्रवास हे प्रवाशांसाठी एक दिव्य ठरत आहे. विमानतळावरील नवीन टर्मिनल सुरू होऊनही प्रवाशांच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. विमानतळावर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली; मात्र पायाभूत सुविधांचा विस्तार तेवढ्या प्रमाणात झाला नाही. त्यातच विमान कंपन्यांकडून वारंवार विमानांना होणारा विलंब प्रवाशांच्या अडचणींत भर घालणारा ठरत आहे.
पुणे विमानतळावरून प्रवास केलेल्या प्रवाशांमध्ये अगदी अपवाद वगळता सर्वांचेच मत नकारात्मक दिसून येते. विमानतळावर प्रवाशांना प्रवास सुसह्य होण्याऐवजी तो असह्य होईल, या पद्धतीने सगळे सुरू आहे. समाजमाध्यमांवर हवाई प्रवाशांच्या तक्रारींचा पाऊस रोज सुरू आहे. विमान प्रवासात वारंवार अडचणी निर्माण होत आहेत. प्रवाशांनी वारंवार ओरड करूनही या परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. उलट परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिघडताना दिसत आहे.
पुणे विमानतळाचे नवीन टर्मिनल कधी सुरू होणार याची चर्चा गेली दोन वर्षे सुरू होती. टर्मिनलचे काम पूर्ण झाल्यानंतरही त्याच्या उद्घाटनाचा मुहूर्त लागत नव्हता. उद्घाटनाला मुहूर्त लागल्यानंतर ते सुरू कधी होणार याची प्रतीक्षा होती. उद्घाटनानंतर सहा महिन्यांनी नवीन टर्मिनल सुरू झाले. या कालावधीत पुणेकर हवाई प्रवाशांचे हाल सुरूच होते. आणि आता टर्मिनल सुरू होऊनही हाल सुरूच आहेत. प्रवाशांना नवीन टर्मिनलवरून पायपीट करीत एरोमॉल गाठावा लागत आहे. या एरोमॉलमध्ये पार्किंग असून, ओला आणि उबर तिथूनच घ्याव्या लागतात. नवीन टर्मिनलपासून एरोमॉल दूर आहे. या ठिकाणी जाण्यासाठी विमानतळ प्रशासनाने दोन ई-बस सुरू केल्या आहेत. तरीही प्रवाशांची ही समस्या पूर्णपणे सुटलेली नाही.
|
|
पुणे विमानतळ हे हवाई दलाच्या मालकीचे आहे. त्यामुळे विमानांच्या उड्डाणांवर मर्यादा आहेत. विमानतळाची धावपट्टी सकाळी ८ ते १०.३० या वेळेत बंद असते. या कालावधीत हवाई दलाचा सराव सुरू असतो. काही दिवसांपूर्वी हवाई दलाने धावपट्टी आणखी अर्ध्या तासासाठी ताब्यात घेतल्याने तीन विमाने दुसरीकडे वळविण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. हाच प्रकार विमानांच्या विलंबाचा आहे. काही विमानांना पाच ते सहा तास विलंब होत असून, विमान कंपन्यांकडून विमानतळावर पोहोचल्यानंतर याची माहिती प्रवाशांना दिली जाते. त्यामुळे प्रवाशांचे प्रवास नियोजन कोलमडून जाण्याबरोबरच त्यांची मोठी गैरसोय होते.
पुण्यातून केवळ दोन आंतरराष्ट्रीय विमाने आहेत. त्यात वाढ करण्यासाठी पुणे विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार करावा लागणार आहे. याबाबतचे सर्वेक्षण नुकतेच झाले आहे. धावपट्टीसोबत विमानतळातील पार्किंग बेचाही विस्तार करावा लागणार आहे. हवाई दलाची मालकी आणि विमानतळावरील जागेची मर्यादा लक्षात घेता, हे कितपत शक्य आहे, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. त्यामुळे हा गुंता सुटेपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांची संख्या वाढणार नाही. त्यामुळे हवाई दलाच्या विमानतळावर विसंबून राहण्याऐवजी नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी व्हायला हवी. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्रिपद मुरलीधर मोहोळ यांच्याकडे असल्याने पुणेकर हवाई प्रवाशांच्या अडचणी सुटतील, अशी आशा प्रवाशांना आहे.
नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदरमध्ये होणार, असे राज्यकर्ते वारंवार उच्चरवाने सांगत असले, तरी त्यासाठी पावले मात्र उचलली गेली नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून प्राथमिक चर्चा आणि प्रस्तावाच्या पलीकडे काहीही झालेले नाही. त्यामुळे पुण्यात खरेच आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुण्याचा भविष्यातील विस्तार आणि उद्योग-व्यवसायांसाठी आंतरराष्ट्रीय विमानतळाची मागणी सातत्याने केली जात आहे. भविष्यातील पुण्यासाठी आवश्यक असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ अद्याप हवेतच असल्याचे चित्र आहे. पुण्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मुद्दा लावून धरण्याची गरज निर्माण झाली आहे.
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर



























Subscribe to my channel




