
Worli Hit and Run Case : मुंबईतील वरळी अपघात प्रकरणातील प्रमुख आरोपी मिहीर शाह याला पोलिसांनी आज पुन्हा एकदा न्यायालयासमोर हजर केलं. न्यायालयाने सर्व पुरावे तपासून, मिहीरने पोलिसांना दिलेला कबुलीजबाब वाचून त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तो आता ३० जुलैपर्यंत कोठडीत राहील. मिहीर शाह याने ७ जुलै रोजी (रविवारी) पहाटे वरळी परिसरात मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे बीएमडब्ल्यू कार चालवत एका दाम्पत्याला उडवलं होतं. वरळीतील रहिवासी कावेरी नाखवा आणि प्रदीप नाखवा या दोघांना त्याच्या कारने उडवलं होतं. यात प्रदीप नाखवा हे एका बाजूला पडले. तर कावेरी नाखवांना मिहीरने कारबरोबर फरपटत नेलं. या भयंकर अपघातात कावेरी नाखवांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या अपघातानंतर मिहीर फरार होता. मात्र दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर (९ जुलै) मिहीरला अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केलं होतं. न्यायालयाने अधिक चौकशीसाठी त्याची १६ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. त्यानंतर आज पोलिसांनी पुन्हा एकदा त्याला न्यायालयासमोर हजर केलं. यावेळी पोलिसांनी मिहीरची आणखी १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी मागितली, न्यायालयाने ती मंजूर केली आहे.
|
Pune Crime : आधी केली दारू पार्टी, नंतर नशेत घेतला गळफास; अल्पवयीन तरुणीच्या आत्महत्येने पुणे हादरलं |
अपघात झाल्यानंतर मिहीरने पलायन केलं होतं. तीन दिवस पोलीस त्याच्या मागावर होते. दाढी व केस कापून मिहीर फरार झाला होता, त्याने फोनही बंद ठेवला होता. मात्र गुन्हे शाखेच्या पथकाने ६० तासांच्या शोधमोहिमेनंतर त्याला अटक केली. त्याची आई आणि दोन मोठ्या बहिणींनी त्याला फरार होण्यात व लपण्यासाठी मदत केली होती. पोलिसांनी मिहीरला अटक केल्यानंतर या तिघींनाही ताब्यात घेतलं होतं.
वरळीतील ॲट्रिया मॉलजवळ हा अपघात झाला होता. मॉलजवळच असलेल्या वरळी कोळीवाड्यात नाखवा दाम्पत्य राहत असून ते सकाळी ससून डॉकला मासे खरेदी करण्यासाठी गेले होते. मासे घेऊन घरी परतत असताना मिहीरच्या कारने त्यांना धडक दिली. कारच्या धडकेनंतर प्रदीप नाखवा हे एका बाजूला पडले तर मिहीर कावेरी नाखवांना कारबरोबर फरपटत घेऊन गेला. यात कावेरी नाखवांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मिहीर शाहला मद्यप्राशन करण्याचं व्यसन आहे. त्याने स्वतःच पोलीस चौकशीत याची कबुली दिली आहे. अटक केल्यानंतर त्याला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या दरम्यान त्याची जी चौकशी झाली त्या चौकशीत त्याने मद्यप्राशन करण्याच्या सवयीबद्दल सांगितलं होतं. अपघात केल्यानंतर मिहीर शाहने वरळीतून पळ काढला होता. त्यानंतर तो विरारला जाऊन लपून बसला. ओळख लपवण्यासाठी त्याने एका सलूनमध्ये जाऊन दाढी व केस कापले होते. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने हे पाऊल उचललं ही बाबही त्याने पोलीस चौकशीत मान्य केली. मिहीर शाह हा शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे नेते राजेश शाह यांचा मुलगा आहे.
शहर
- मोबाईलचे नेटवर्क अचानक गायब झालेय का? 'सिम स्वॅप फ्रॉड'चे असू शकते हे लक्षण; वेळीच व्हा सावध!
- एल निनोचे सावट: महाराष्ट्रात यंदा पावसाचा जोर कमी राहणार, पेरणीसाठी शेतकऱ्यांना हवामान तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
- पुणे: विकास लावंडे यांना अखेर मोबाईल परत; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
महाराष्ट्र
- एसटी कर्मचाऱ्यांचा एल्गार! १५ जूनपासून 'घंटा नाद' आंदोलन, तर २९ जूनपासून राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलन
- मोबाईलचे नेटवर्क अचानक गायब झालेय का? 'सिम स्वॅप फ्रॉड'चे असू शकते हे लक्षण; वेळीच व्हा सावध!
- एल निनोचे सावट: महाराष्ट्रात यंदा पावसाचा जोर कमी राहणार, पेरणीसाठी शेतकऱ्यांना हवामान तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
- पुणे: विकास लावंडे यांना अखेर मोबाईल परत; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
गुन्हा
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या
- मुंबई: पोलीस दाम्पत्याचा वाद पोहोचला पोलीस ठाण्यात; मानसिक छळ करणाऱ्या पतीविरुद्ध अखेर गुन्हा दाखल!
- बार्शी हादरले! शेअर मार्केटच्या नादात उद्ध्वस्त झाला संसार; १.८० कोटींच्या कर्जापायी मुख्याध्यापकाने पत्नी आणि दोन मुलांचा जीव घेतला; त्यानंतर स्वतःही संपवले आयुष्य.
- पुण्यात 'फेक' कॉल सेंटरचा पर्दाफाश! ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली दररोज शेकडो लोकांची लाखो रुपयांची लूट; टोळी गजाआड.
राजकीय
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
- राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे विलीनीकरण होणार? नाना पटोलेंच्या दिल्ली दौऱ्याने राजकीय वर्तुळात खळबळ; मोठ्या निर्णयाचे संकेत!
- मध्य प्रदेश राज्यसभा निवडणूक: काँग्रेसचा उमेदवारी अर्ज बाद; भाजपच्या उमेदवाराचा बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा!
इतर
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
मनोरंजन
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या
- NEET-UG २०२६ परीक्षेसाठी NTA चा महत्त्वाचा निर्णय; वेळ आणि प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यात दिलासा!
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
- गोरखपूर: माणुसकीला काळीमा! आईच्या तेराव्याच्या खर्चावरून मोठ्या भावाने लहान भावावर झाडल्या गोळ्या; तरुणाचा मृत्यू.

























Subscribe to my channel


