बीड: समाजात केवळ जातीपातीचे राजकारण करून आणि लोकांमध्ये तेढ निर्माण करून स्वतः मोठे होऊ पाहणाऱ्या किंवा सत्तेवर येऊ इच्छिणाऱ्या नेत्यांना भविष्यात कधीही राजकीय स्थैर्य लाभणार नाही, असा जोरदार व स्पष्ट इशारा भाजप नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे यांनी दिला आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने आयोजित भव्य जाहीर सभेत बोलताना त्यांनी राजकारणातील जातपातीवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. कुठल्याही एका विशिष्ट जातीच्या किंवा धर्माच्या जोरावर राजकारण करणाऱ्यांचे आयुष्य फार काळ टिकत नाही, असे सांगत त्यांनी विकासात्मक आणि सर्वसमावेशक राजकारणाचा जोरदार पुरस्कार केला.
दुष्काळ आणि जातीच्या भिंती:
सध्या महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात असलेल्या दुष्काळी परिस्थितीवर बोलताना पंकजा मुंडे यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण भाष्य केले. त्या म्हणाल्या की, जेव्हा राज्यावर किंवा जनतेवर एखादे मोठे नैसर्गिक संकट ओढवते, तेव्हा सर्व जाती-धर्मांच्या भिंती एका क्षणात आणि एका टिचकीमध्ये तुटून जातात. दुष्काळ हा कधीही श्रीमंत किंवा गरीब असा भेद करून येत नाही. कडक ऊन गरिबावर आणि श्रीमंतावर वेगवेगळे पडत नाही, तसेच तहान आणि जनावरांचा चारा हा देखील सर्वसामान्यांसाठी समान असतो. या कठीण काळात आपल्याला जाती-धर्माच्या सर्व भिंती पूर्णपणे तोडून टाकायच्या आहेत आणि आपण त्या प्रत्यक्ष कृरून दाखवल्या आहेत, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. अंतरवाली सराटीचा उल्लेख करत त्यांनी आपण तेथील विकासाची जबाबदारी घेतल्याचे जाहीर केले.
'जेन झी' (Gen Z) आणि तरुण पिढीविषयी भाष्य:
परदेशातील आंदोलनांचे आणि सध्याच्या जागतिक घडामोडींचे दाखले देत पंकजा मुंडे यांनी आजच्या तरुण पिढीवर (Gen Z) विशेष भाष्य केले. त्या म्हणाल्या, "तुम्ही टीव्ही आणि सोशल मीडियावर रिल्स बघत असता. पॅरिस आणि फ्रान्समध्ये हिंसाचार सुरू आहे, इराण आणि रशियामध्ये युद्ध सुरू आहे; मात्र आपल्या देशात अशी तरुण पिढी असायला हवी जिच्या रक्तात निखळ देशभक्ती भिनलेली असेल. स्वतःचे देश आणि घरे जाळून आंदोलन करणारी तरुण पिढी देशाला नको आहे. जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात जसे देशभक्तीने झपाटलेले सैनिक होते, तशी आजच्या तरुण पिढीला गरज आहे. तुम्ही 'जेन झी' आहात आणि तुमचे नेतृत्व केवळ गुद्द्याने किंवा दहशतीने होणार नाही, तर ते केवळ आणि केवळ ठोस मुद्द्यांच्या आधारेच होईल."
विखारी दिशा देणाऱ्या राजकारणावर टीका:
पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, ज्या नेत्यांकडे किंवा व्यक्तींकडे लोकांच्या कल्याणाचा कोणताही ठोस विकासात्मक अजेंडा नसतो, ते केवळ समाजाला दिशाभूल करणारी आणि विखारी दिशा दाखवण्याचे काम करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सीएसआर (CSR) फंड आणि विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून गावागावांत पाणी पोहोचवणे, जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देणे आणि शेतकर्यांना सक्षम बनवणे यासाठी आपण त्यांची बनून सातत्याने काम करत राहू, अशी ग्वाही त्यांनी उपस्थितांना दिली.
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




