
IPS Officer Death : पती-पत्नीमध्ये भांडण झाल्याच्या आणि त्यामधून हत्या झाल्याच्या अनेक बातम्या आपण वाचल्या असतील. पण आसाममधील एका आयपीएस अधिकाऱ्याने पत्नीच्या मृत्यूचं दु:ख सहन न झाल्यामुळे आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आयपीएस अधिकारी आणि आसामचे गृहसचिव शिलादित्य चेतिया यांनी आत्महत्या केली. आपल्याच सर्व्हिस रिव्हालव्हरने त्यांनी गोळ्या झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
|
|
शिलादित्य चेतिया यांचे पत्नीवर इतके प्रेम होते की त्यांना विभक्त होण्याचे दुःख सहन होत नव्हते.कॅन्सरमुळे त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. पत्नीच्या मृत्यूनंतर काही वेळातच शिलादित्य चेटिया यांनीही आत्महत्या केली. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला. आसाम सरकारमध्ये गृह आणि राजकीय विभागाचे सचिव म्हणून कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी शिलादित्य चेतिया यांनी मंगळवारी आत्महत्या केल्याची माहिती आसाम पोलिसांनी दिली. पत्नीचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांची पत्नी कॅन्सरने त्रस्त होती. पत्नीच्या निधनाचे वृत्त कळताच शिलादित्य यांनी स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केली.
आसामचे पोलिस महासंचालक जीपी सिंग यांनी आयपीएस अधिकारी शिलादित्य चेतिया यांच्या मृत्यूची माहिती जनतेला दिली. पत्नीचे कॅन्सरमुळे निधन झाल्यानंतर काही मिनिटांतच त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांनी सांगितले. शिलादित्य चेतिया २००९ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा म्हणजेच आयपीएस अधिकारी होते. त्यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वत: वर गोळी झाडली. राज्याचे गृहसचिव म्हणून पोस्टिंग करण्यापूर्वी चेतिया यांनी तिनसुकिया आणि सोनितपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक आणि आसाम पोलिसांच्या चौथ्या बटालियनचे कमांडंट म्हणून काम केले होते. चेतियाच्या पत्नीला ब्रेन ट्युमरचा त्रास होता आणि गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिलादित्य चेतिया यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले पण तिथे पोहोचताच त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्याच्या मृत्यूमागचा तपास पोलिस करत आहेत. या घटनेने आसाममध्येच नव्हे तर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर अनेक युजर्स शिलादित्य चेतियाच्या पत्नीवरील प्रेमाचे कौतुक करत आहेत. तर काही युजर्सनी या घटनेवर दु:ख व्यक्त करत शिलादित्य चेतियाने धैर्याने वागायला हवे होते, असे म्हटले आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


