
Pune : भूमिगत मेट्रो मार्गांच्या सुरक्षेला थेट धोका निर्माण करणाऱ्या बोअरवेलच्या घटनेनंतर महापालिकेने कठोर भूमिका घेतली असून, मेट्रो बोगद्यांवर आणि परिसरातील सर्व बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र व सविस्तर नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या नियमांद्वारे प्रत्येक बांधकामावर बारकाईने नजर ठेवली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिली.
संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल
शुक्रवार पेठेत खडक पोलिस ठाण्यासमोर बोअरवेल खोदताना मेट्रोच्या बोगद्याला भगदाड पडले. स्वारगेट-शिवाजीनगर मार्गावरील बोगद्यात पाण्याची गळती सुरू झाल्यानंतर मेट्रो प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून संबंधित घरमालक व ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल केला.
या घटनेनंतर महापालिका आणि मेट्रो प्रशासन अधिक सजग झाले असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी व्यापक उपाययोजना आखण्यात येत आहेत. पेठ भागांतील प्रलंबित पुनर्विकास प्रकल्प आणि सुरू असलेली बांधकामे लक्षात घेऊन मेट्रो बोगद्यांवर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या बांधकामांवर नियंत्रणासाठी नियमावली तयार करण्यात येत आहे. नव्या नियमावलीनुसार, मेट्रो बोगद्यांच्या वर किंवा परिसरातील प्रत्येक बांधकामासाठी स्वतंत्र तांत्रिक परवानगी अनिवार्य असेल. बोअरवेल खोदकामासाठी भूजल विभागाची स्वतंत्र मंजुरी बंधनकारक असेल. सुरक्षित अंतर, कंपन नियंत्रण, तांत्रिक निकष आणि मेट्रो संरचनेवरील परिणामांचा विचार या नियमावलीत केला जाईल.
शुक्रवार पेठेतील घटना अत्यंत गंभीर असून, भविष्यात मेट्रो प्रकल्पाला कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी लवकरच कठोर नियमावली जाही केली जाईल अशी माहिती पुण्याचे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिली आहे.
‘महामेट्रो’च्या नावाने बनावट वेबसाइट
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (महामेट्रो) नावाने बनावट वेबसाइट आणि फेसबुकवर खोटे पेज तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांना लक्ष्य करून भरतीच्या नावाखाली दिशाभूल करणाऱ्या जाहिराती त्यावर प्रसारित केल्या जात असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी महामेट्रोकडून सायबर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. मेट्रोच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या अधिकृत वेबसाइटसारखीच दुसरी वेबसाइट बनवल्याचे लक्षात आले. या फसव्या बनावट वेबसाइटसाठी ‘महामेट्रो’चा अधिकृत लोगो वापरून जाहिराती विश्वासार्ह भासवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे अनेक उमेदवार या जाळ्यात अडकण्याची भीती आहे
शहर
- नवी मुंबई: महापेमध्ये बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; ॲपल टेक सपोर्टच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांची लूट
- पुणे: अजितदादांचा विकासाचा वारसा अर्ध्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा ठाम निर्धार, महिलांसाठी 'दादा उद्योगिनी' ॲप लाँच
- मुंबई: 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरात मुंबईत बाप्पाचे आगमन; सार्वजनिक गणेशोत्सवाची लगबग सुरू
- पुणे: खर्च भागत नाही म्हणून तरुणाने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव; सुटकेसाठी कुटुंबीयांकडे मागितले ५ लाख रुपये
महाराष्ट्र
- नवी मुंबई: महापेमध्ये बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; ॲपल टेक सपोर्टच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांची लूट
- पुणे: अजितदादांचा विकासाचा वारसा अर्ध्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा ठाम निर्धार, महिलांसाठी 'दादा उद्योगिनी' ॲप लाँच
- मुंबई: 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरात मुंबईत बाप्पाचे आगमन; सार्वजनिक गणेशोत्सवाची लगबग सुरू
- पुणे: खर्च भागत नाही म्हणून तरुणाने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव; सुटकेसाठी कुटुंबीयांकडे मागितले ५ लाख रुपये
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोंदिया: स्वातंत्र्यदिनी काळाचा घाला! अंघोळीची हौस बेतली जिवावर, गोंदियातील ढासगड येथे दोन तरुण वाहून गेले
- लखनऊ: शिक्षणाचा खेळ; जेन-झीनंतर आता जेन-अल्फा आक्रमक; लखनऊमध्ये विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू

























Subscribe to my channel




