
Harbhajan Singh on Hardik Pandya IPL 2024 : हार्दिक पंड्याला पुन्हा संघात घेऊन त्याच्याकडे नेतृत्व देण्याचा मुंबई इंडियन्सचा निर्णय त्यांच्यावर उलटला. एकसंध संघ म्हणून त्यांची कामगिरी यंदा झाली नाही, असे थेट मत मुंबई इंडियन्स संघाचा माजी कर्णधार आणि खेळाडू हरभजन सिंगने व्यक्त केले आहे.पाच वेळा आयपीएल करंडक उंचावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघासाठी यंदाची ही स्पर्धा फारच निराशाजनक ठरली. १० संघांत त्यांना दहाव्या क्रमांकावर राहावे लागले. मूळचा मुंबई संघातील खेळाडू; पण गेल्या दोन वर्षांत गुजरात संघातून खेळलेल्या हार्दिकला मुंबई संघ व्यवस्थापनाने आपल्या संघात तर आणलेच; पण रोहित शर्माला दूर करून त्याच्याकडे कर्णधारपद दिले. सोशल मीडियावर या निर्णयाविरुद्ध रान उठले होते. आणि मुंबईच्या प्रत्येक सामन्याच्या वेळी याचे पडसाद स्टेडियममध्ये उमटत होते.
यंदाच्या मोसमातील मुंबई इंडियन्स संघाच्या कामगिरीचे विश्लेषण करताना हरभजन म्हणतो. मुंबईचा संघ एकसंध वाटला नाही. हार्दिकला कर्णधारपद देण्याचा निर्णय पुढच्या वर्षीही घेता आला असता; परंतु या सर्व बदलात हार्दिकचा दोष नव्हता.मुंबई संघातून मी १० वर्षे खेळलो आहे. हा संघ मोठा आहे. संघ व्यवस्थापनही फार मोठे आहे आणि ते संघालाही तेवढ्याच सक्षमपणे तयार करत असतात; परंतु यावेळी त्यांनी कदाचित जास्त पुढचा विचार केला असेल आणि तोच त्यांच्या मुळावर आला असेल. संघ जेव्हा एकसंध नसतो तेव्हा अशा अपयशाचा सामना करावा लागणे हे अपेक्षित असते; पण मुंबईसारख्या संघाची अशाप्रकारे अवस्था होते हे पाहून मला फार दुःख झाले, अशी भावना हरभजनने व्यक्त केली.
|
T20 World Cup 2024 : ICCची मोठी घोषणा! टीम इंडिया 'या' नव्या मैदानावर खेळणार सराव सामना |
गुजरात संघात दोन्ही वर्षांत अंतिम फेरी गाठून देणाऱ्या हार्दिकला स्वतः फलंदाजी आणि गोलंदाजीतही अपयश आले. मुळात तो दुखापतीनंतर प्रदीर्घ काळानंतर खेळत होता. १४ सामन्यांत मिळून त्याला १८.०० च्या सरासरीने केवळ २१६ धावाच करता आल्या आणि गोलंदाजीत ३५.१८ च्या सरासरीने केवळ ११ विकेटच मिळवता आल्या. प्रत्येक षटकात त्याने १०.७५ च्या इकॉनॉमीने धावा दिल्या.
वेगळा हार्दिक दिसून येईल
आयपीएलमध्ये अपयश आले तरी येत्या काही दिवसांत सुरू होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत वेगळा हार्दिक पंड्या दिसून येईल, हार्दिक हा चांगला अष्टपैलू आहे. भारतीय संघाची जर्सी परिधान केल्यावर एक वेगळी ऊर्जा असलेला हार्दिक मैदानावर उतरतो, असे हरभजन म्हणाला.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



