
Pune Ink Attack : कल्याणीनगर अपघातप्रकरणातील विधीसंघर्ष आरोपीचा वडील विशाल अग्रवालला आज पुणे कोर्टात दाखल करण्यात आलं. मात्र त्याआधीच पुण्यात भावनांचा उद्रेक पाहायला मिळाला. कोर्ट परिसरात पोहोचताचविशाल अग्रवालवर शाई फेकीचा प्रयत्न करण्यात आला. विशाल अग्रवालला घेऊन आलेल्या पोलीस व्हॅनवरती शाई फेकण्यात आली. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे विशाल अग्रवाल बचावला. वंदे मातरम संघटनेने हे पाऊल उचललं. याप्रकरणी वंदे मातरम संघटनेच्या पाच ते आठ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
या हल्ल्यानंतर वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी या सगळ्यांचे हात काळ्या शाईने बरबटले होते. त्यांनी सांगितली की, आम्ही विशाल अग्रवालच्या तोंडावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. त्याच्या अंगावर शाई पडली. पण नंतर तो पोलिसांमुळे बचावला. कल्याणीनगर येथे झालेल्या अपघातासाठी विशाल अग्रवाल हा त्याच्या मुलापेक्षा अधिक जबाबदार आहे. पुण्यातील पबवर कारवाई झाली पाहिजे, त्यांचा परवाना रद्द झाला पाहिजे. आम्ही याठिकाणी विशाल अगरवालला धडा शिकवण्यासाठी आलो होतो. त्याच्या मुलाने दोन निष्पापांचे जीव घेतले आहेत. विशाल अग्रवाल याच्यावर आधीपासून गुन्हे दाखल आहेत, त्याच्यावर मोकातंर्गत कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली.
विशाल अग्रवालसाठी कोर्टात वकिलांची फौज
पुणे अपघात प्रकरणातील आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांना कोर्टात हजर केले आहे. अग्रवाल यांना छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली होती . विशाल अग्रवाल यांना पुणे न्यायालयात हजर करण्यात आले आहे. विशाल अग्रवाल यांच्याकडून त्यांचे वकील प्रशांत पाटील युक्तिवाद करणार आहेत. त्यांच्यासह वकिलांचा मोठी फौज कोर्टात दाखल झाली आहे. विशाल अग्रवाल यांच्यासह नितेश शेवानी आणि जयेश बोनकर यांच्या विरोधात सुनावणी होणार आहे.
शहर
- मुंबई: लोकलच्या छतावर झोपला माणूस; आपत्कालीन साखळी ओढल्याने लोकल खोळंबली, प्रवाशांना मनःस्ताप!
- मुंबई: गोरेगावमधील संतापजनक घटना: घरखर्चावरून झालेल्या वादातून दारूच्या नशेत असलेल्या मुलाकडून वृद्ध आईची हत्या; बांगुरनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या
- पुणे: आदिवासी विद्यार्थ्यांच्या डीबीटी प्रक्रियेत मोठे सुधारणा निर्णय; आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अर्ज करताना आता अनावश्यक कागदपत्रांपासून सुटका
- पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दोन दिवसांचा पुणे दौरा; विविध प्रकल्पांचे उद्घाटन, सहकार क्षेत्राचे भूमिपूजन आणि दिवंगत अजित पवार यांच्या पुतळ्याचे होणार अनावरण
महाराष्ट्र
- मुंबई: लोकलच्या छतावर झोपला माणूस; आपत्कालीन साखळी ओढल्याने लोकल खोळंबली, प्रवाशांना मनःस्ताप!
- सांगली: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सांगलीच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट; अजितदादांनी स्वतः माझ्याशी चर्चा केली होती, दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ!
- मुंबई: गोरेगावमधील संतापजनक घटना: घरखर्चावरून झालेल्या वादातून दारूच्या नशेत असलेल्या मुलाकडून वृद्ध आईची हत्या; बांगुरनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या
- पुणे: आदिवासी विद्यार्थ्यांच्या डीबीटी प्रक्रियेत मोठे सुधारणा निर्णय; आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अर्ज करताना आता अनावश्यक कागदपत्रांपासून सुटका
गुन्हा
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
- पुणे: भाऊबीजेच्या दिवशीच नात्याला काळीमा! दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या बहिणींना भावाची बेदम मारहाण; बेसबॉल स्टिकने डोक्यावर केले वार
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाल्या, हे पुस्तक म्हणजे अत्यंत मनापासून आणि प्रामाणिकपणे...
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!
- भोपाल: दारू पिण्यावरून झालेल्या वादानंतर तरुण चढला पाण्याच्या टाकीवर, भावांसमोरच खाली उडी मारत संपवले जीवन
- गोवा: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण! शिरगाव-पणजी कदंब बससेवा प्रथमच सुरू, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण!


























Subscribe to my channel




