
Akola News : 'सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय' हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. पोलीस हे नागरिकांच्या रक्षणासाठी असतात, त्यांचं संरक्षण करणं हे त्यांच प्रथम कर्तव्य असतं. हाच विश्वास दर्शवत सर्वसामान्य नागरिक प्रथम न्याय मागण्यासाठी पोलिसांकडे धाव घेत असतात. मात्र, अकोला शहर पोलिसांना नेमकं झालंय तरी काय, असा प्रश्न उपस्थित करण्यामागे कारण ठरतय ते सतत घडणारे धक्कादायक प्रकार. काही दिवसांपूर्वीच शहरातील एका बड्या डॉक्टरविरुद्ध तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेला अकोला पोलिसांनी तब्बल चार दिवस तक्रार न घेता रात्री उशिरापर्यंत ताटकळत ठेवलंय. असा आरोप एका महिलेने केला होता. हे प्रकरण ताजे असताना अकोला शहरातील एका पोलीस हवालदाराने तक्रार करण्यास आलेल्या एका महिलेला शरीरसुखाची मागणी केल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे.
तक्रारदार महिलेकडे चक्क शरीरसुखाची मागणी
अकोला जिल्ह्यातल्या चान्नी पोलीस स्टेशनचे हवालदार बाळकृष्ण येवले (ब.नं.1636) यांनी एका गावातील महिलेला शरीर सुखाची मागणी करून तिचा विनयभंग केला आहे, अशी तक्रार संबंधित महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केलीय. या घटनेनंतर कुंपणानेच शेत खाल्ले तर दाद मागावी तरी कुणाकडे, असा प्रश्न सर्वसामान्यकडून उपस्थित केला जातोय. इतकेच नव्हे तर हवालदार येवले यांनी महिलेच्या मोबाईलवर सतत फोन करुन त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास देत असल्याचा आरोपही या महिलेकडून करण्यात आलाय. पोलीस हवालदार येवले आणि महिलेच्या संभाषणाच्या अनेक ऑडिओ क्लिप देखील 'माझा' च्या हाती लागल्या आहेत. त्यामुळे या तक्रारीची दखल घेऊन पोलीस नेमकं काय कारवाई करतात, हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
|
|
ऑडिओ क्लिप'मधील संभाषण नेमकं काय?
तक्रार दार महिला- हॅलो
पोलिस हवालदार - पोचली का?
महिला - हो पोचली.
पोलिस - अरे.. ते वाट पाहत आहे तुझी, नंबर लाव.
महिला- हा.. लावला सर, प्रोसिजर सुरू आहे.
पोलिस - चालू आहे ना.
महिला - चालू आहे.
पोलिस - मी तर 2 ते 3 फोन लावले तुला.
महिला - फोन सायलेंटवर होता.
पोलिस - काय हेंबा... आहे तू.
महिला - सायलेंट होता.
पोलिस - तू भीत कोणाला, चोर आहेस का? तू.
महिला - चोर नाही, फोन सायलेंट करून ठेव.
पोलिस - तू भीत असणार तर मला सांग, मी तर नाही भीत.
महिला- नाही ... भीत नाही सर. भ्यायचं कशाला.
पोलिस - तू माझे शब्द लक्षात ठेव, भीत का?
महिला - नाही भीत नाही.
पोलिस - ठीक आहे ते आटोपूनं ये, उद्या मी तुझ्या घरी येतो.
महिला - बर..
पोलिस - जेवण काय बनवते.
महिला - तुम्ही सांगा ते करतो.
पोलिस - मटन, दारु, मच्छी, अंडे हे काहीच चालत नाहीये.
महिला - साध जेवण.
पोलिस- नाही.. उडीद दाळ आणि भाकर.
महिला- ओके.
पोलिस - उद्या येतो मी..
महिला - हो
शहर
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- महिला T20 विश्वचषक: भारत उपांत्य फेरीत कसा पोहोचणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण!
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
महाराष्ट्र
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
- पुण्याच्या 'सारथी' कार्यक्रमात खुर्चीवरून राडा! पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी आमनेसामने; मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या!
गुन्हा
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!


























Subscribe to my channel




