
Entertainment : सध्या छोट्या पडद्यावर टीआरपी हा अत्यंत महत्त्वाचा झाला आहे. टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी सातत्याने वाहिन्यांकडून नवनवीन प्रयोग केले जात आहेत. गेल्या काही महिन्यांपासून वाहिन्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. काही दिवसांपूर्वी ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम आणि ओंकार भोजने या तीन प्रसिद्ध विनोदवीरांचा नवा कार्यक्रम ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ सुरू झाला. अल्पावधीत या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
दर आठवड्याला टीआरपी रिपोर्ट येत असतो. मागील आठवड्याच्या टीआरपी रिपोर्ट नुकताच समोर आला आहे. ‘मराठी टीआरपी तडका’ इन्स्टाग्राम पेजवर टीआरपी रिपोर्ट शेअर करण्यात आला आहे. यामध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमावर डॉ. निलेश साबळेचा नवा कार्यक्रम ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ वरचढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
|
Border 2 Movie Updates : 'बॉर्डर 2' ची रिलीज डेट आली समोर; सनी देओलसोबत दिसणार हा स्टार अभिनेता |
मागील आठवड्याच्या टीआरपी रिपोर्टमध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पेक्षा जास्त टीआरपी ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ कार्यक्रमाला मिळालेला दिसत आहे. गेल्या साडेपाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करणाऱ्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीआरपीच्या यादीत ३७व्या स्थानावर आहे. ०.६ रेटिंग या कार्यक्रमाला मिळाले आहेत. तर निलेश साबळेचा नवा कार्यक्रम ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ ३२व्या स्थानावर असून १.० रेटिंग मिळालं आहे.
याशिवाय ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाला देखील ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ पेक्षा कमी टीआरपी आहे. आदेश बांदेकरांचा ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम ३३व्या स्थानावर असून ०.८ रेटिंग मिळालं आहे.
दरम्यान, ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या नव्या कार्यक्रमाची लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी संपूर्ण धुरा डॉ. निलेश साबळे सांभाळत आहे. या कार्यक्रमात भाऊ कदम व ओंकार भोजने व्यतिरिक्त अभिनेत्री सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण असे अनेक कलाकार पाहायला मिळत आहेत. तसंच या कार्यक्रमात महाराष्ट्राचे विनोदाचे बादशहा, अत्यंत संवेदनशील गुणी अभिनेते भरत जाधव आणि चार दशकं सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या अलका कुबल आठल्ये हे दोन महान कलाकार दर भागामध्ये सेलिब्रिटी पाहुणे म्हणून दिसत आहेत.
शहर
- मोठी दुर्घटना: जोरहाट एअरबेसवर लँडिंगदरम्यान भारतीय हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; ५ जवानांना वीरमरण!
- बांगलादेशच्या क्रिकेटपटूला पोलिसांकडून मारहाण! नॅशनल प्लेयर नईम हसनच्या तक्रारीने खळबळ, तीन पोलीस अधिकारी निलंबित
- शिर्डीला देवदर्शनाला जाताना काळाचा घाला! कंटेनरने दुचाकीला पाऊण किलोमीटर फरफटत नेले, ३० वर्षीय डॉक्टरसह तिघांचा दुर्दैवी अंत
- रायगड हादरले! आईने चार मुलांना विष पाजून स्वतःही संपवले आयुष्य; दोन मुलींचा मृत्यू, तर दोन मुलांची प्रकृती गंभीर!
महाराष्ट्र
- नंदुरबार: हातात 'मन में है विश्वास' पुस्तक आणि थेट विश्वास नांगरे-पाटलांशी संवाद; विकास खारगेंनी पूर्ण केले तरुणाचे स्वप्न
- हैदराबादमध्ये धक्कादायक घटना: प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि युट्युबर 'मसूद चांदी'ची मेहुण्याकडून निर्घृण हत्या!
- मोठी दुर्घटना: जोरहाट एअरबेसवर लँडिंगदरम्यान भारतीय हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; ५ जवानांना वीरमरण!
- बांगलादेशच्या क्रिकेटपटूला पोलिसांकडून मारहाण! नॅशनल प्लेयर नईम हसनच्या तक्रारीने खळबळ, तीन पोलीस अधिकारी निलंबित
गुन्हा
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- रायगड हादरले! आईने चार मुलांना विष पाजून स्वतःही संपवले आयुष्य; दोन मुलींचा मृत्यू, तर दोन मुलांची प्रकृती गंभीर!
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
- मोबाईलचे नेटवर्क अचानक गायब झालेय का? 'सिम स्वॅप फ्रॉड'चे असू शकते हे लक्षण; वेळीच व्हा सावध!
राजकीय
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
- राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे विलीनीकरण होणार? नाना पटोलेंच्या दिल्ली दौऱ्याने राजकीय वर्तुळात खळबळ; मोठ्या निर्णयाचे संकेत!
इतर
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
- आसाम: जोरहाट एअरबेसवर लँडिंगवेळी भारतीय वायुसेनेचे एएन-३२ विमान कोसळले; आग लागल्याने खळबळ
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या

























Subscribe to my channel


