
Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना राष्ट्र्वादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. येत्या काळात प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असं शरद पवार म्हणाले आहेत. इंडियन एक्स्प्रेसने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
“पुढील दोन वर्षांत अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी अधिक जवळीक साधतील. किंवा काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय त्यांच्या पक्षासाठी सर्वोत्तम आहे असे त्यांना वाटेल”, असंशरद पवार म्हणाले. तसंच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही काँग्रेसमध्ये विलीन होणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “मला काँग्रेस आणि आमच्यात काही फरक दिसत नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरू विचारसरणीचे आहोत. मी आता काहीही बोलत नाही. सहकाऱ्यांचा सल्ला घेतल्याशिवाय मी काहीही बोलणार नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही त्यांच्या (काँग्रेसच्या) जवळ आहोत. पक्षाबाबतचे पुढील सर्व निर्णय सामूहिकपणे घेतले जातील.
|
|
उद्धव ठाकरेंची विचारसरणी आमच्यासारखीच
मित्रपक्ष शिवसेना ठाकरे गटाबद्दल बोलताना पवार म्हणाले, “उद्धव ठाकरे देखील समविचारी पक्षांबरोबर एकत्र काम करण्याबद्दल सकारात्मक आहेत. मी त्यांची विचारसरणी पाहिली आहे, ती आमच्यासारखीच आहे.
“राजकीय पक्षांच्या एका मोठ्या वर्गाला भाजप आणि (नरेंद्र) मोदी आवडत नाहीत. आणि हे विरोधक एकत्र येऊ लागले आहेत. देश का मूड मोदी के खिलाफ हो रहा है (देशातील मूड नरेंद्र मोदींच्या विरोधात वळत आहे), आणि आम्ही गांधी आणि नेहरूंच्या विचारांना अनुसरून सकारात्मक दिशेने वाटचाल करत आहोत”, असंही शरद पवार म्हणाले.
गेल्यावेळच्या निवडणुकीपेक्षा यंदाची लढत वेगळी
२०१९ आणि २०२४ च्या निवडणुकीत एक फरक आहे. गेल्यावेळेच्या तुलनेत यंदा तरुण विरोधी पक्षांशी जुळवून घेत आहेत. पवार म्हणाले की, परिस्थिती १९७७ मधील जनता पक्षासारखी होऊ शकते. निवडणुका जाहीर झाल्यानंतर विविध पक्ष एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली होती आणि त्यांनी सरकार स्थापन केले.
तेव्हाही विरोधकांनी निवडणुकीपूर्वी पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता. मोरारजी देसाई यांची नंतर पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली. जयप्रकाश नारायण आणि जे.बी. कृपलानी यांनी जनता पक्ष स्थापन करण्यासाठी विलीन झालेल्या विविध पक्षांच्या खासदारांशी बोलून हा निर्णय घेतला होता.
राहुल गांधींना मोरारजी देसाईंपेक्षा जास्त समर्थन
१९७७ मधील मोरारजी देसाईंपेक्षा आज राहुल गांधींना पक्षांतर्गत सर्वाधिक समर्थन आहे. देसाईंपेक्षा त्यांना त्यांच्याच पक्षात मोठा पाठिंबा आहे. राहुल गांधी यांचे आपल्या सर्वांशी प्रादेशिक पक्षांमध्ये संबंध निर्माण होत आहेत”, असं शरद पवार म्हणाले.
“सध्याच्या परिस्थितीनुसार सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. सर्व विरोधी पक्षांची सर्वसाधारण विचारसरणी आहे. त्यामुळे आपण निवडून आलो तर स्थिर सरकार दिले पाहिजे.” गेल्या दोन वर्षात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत झालेल्या फाटाफुटीचा संदर्भ देत पवार म्हणाले की, “जे मोदींबरोबर गेले आहेत, लोकांना असे नेते आवडत नाहीत.”
दरम्यान, बारामतीत आम्ही जिंकणार आहोत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसंच अजित पवारांना राजकीयकृष्ट्या परत यायचं असेल तर आम्ही त्यांना स्वीकारणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
शहर
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- महिला T20 विश्वचषक: भारत उपांत्य फेरीत कसा पोहोचणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण!
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
महाराष्ट्र
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
- पुण्याच्या 'सारथी' कार्यक्रमात खुर्चीवरून राडा! पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी आमनेसामने; मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या!
गुन्हा
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!


























Subscribe to my channel




