
Mumbai : पंतप्रधान घरकुल योजनेंतर्गत (पीएमएवाय) अत्यल्प (ईडब्ल्यूएस) व अल्प उत्पन्न गटातील (एलआयजी) नागरिकांसाठी परवडणाऱ्या घरांची सोडत असूनही त्यात 'एलआयजी' च्या उत्पन्नाची कमाल मर्यादा काढून टाकून कोट्यधीशांना पात्रतेच्या चौकटीत आणण्याचा निर्णय राज्य सरकार व सिडकोला भोवला आहे. 'सहा लाख रुपयांहून अधिक उत्पन्न असलेल्या कोणालाही एलआयजी घरांचे वितरण करू नका आणि अशा लाभार्थ्यांना वितरण पत्र पाठवले असेल त्यांना घरांचा ताबा देऊ नका', असा स्पष्ट अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी सिडकोला दिला.
माझी पहिली पसंती सिडकोचे घर या योजनेंतर्गत सिडकोच्या ऑक्टोबर-२०२४मधील सुमारे २६ हजार घरांच्या सोडतीबाबत न्या. रवींद्र घुगे व न्या. अभय मंत्री यांच्या खंडपीठाने हा अंतरिम आदेश दिला.
'ही योजना गरीब व अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी आहे. त्यांची चेष्टा करू नका. तुमच्या सुधारित नियमाप्रमाणे वर्षाला सहा लाखांचे उत्पन्न असलेल्या कुटुंबाबरोबरच अगदी तासाला सहा लाख रुपये मिळवणारी व्यक्तीही एलआयजीचे घर घेऊ शकते, हे कसे काय? याला काय तर्क आहे? हे तर पीएमएवाय योजनेतील अटींचे आणि त्याअनुषंगाने राज्य सरकारनेच प्रसिद्ध केलेल्या जीआरचेही उल्लंघन आहे. उत्पन्न मर्यादा हटवणारा नवा नियम आणण्यामागे गरीबांची घरे श्रीमंतांना जावी, असा हेतू आहे का? हे सर्व धक्कादायक व अनाकलनीय आणि नफेखोरीला चालना देणारे आहे', अशा तिखट शब्दांत खंडपीठाने सुनावणीदरम्यान तीव्र नाराजीही व्यक्त केली.
किंमती व चुकीच्या नियमांबाबत आक्षेप घेणारे सुमित साठे यांच्यासह अनेक लाभार्थीनी ज्येष्ठ वकील डॉ. अभिनव चंद्रचूड, अॅड. विनोद सांगवीकर व अॅड. साक्षी ठोंबरे यांच्यामार्फत याचिका करून हा विषय न्यायालयासमोर आणला. 'घरांच्या चढ्या किंमती व एलआयजीच्या अर्जासाठी उत्पन्न मर्यादा हटवणे, हे पीएमएवाय योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासणारे आणि मनमानी व जुलमी स्वरुपाचे आहे. शिवाय राज्य सरकारच्या जीआरचेही उल्लंघन करणारे आहे', असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. चंद्रचूड यांनी मांडला. त्यानंतर खंडपीठाने या साऱ्याची अत्यंत गंभीर दखल घेऊन वरील अंतरिम मनाई आदेश दिला आणि सिडको व राज्य सरकारला १० जूनपर्यंत प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करण्याचे निर्देश देऊन पुढील सुनावणी २५ जून रोजी ठेवली.
डॉ. आंबेडकरांच्या विधानांचा दाखला
'राज्यघटनेची संहिता कितीही उत्तम असली, तरी त्याची अंमलबजावणी करणारे लोक चांगले नसतील तर ती सरतेशवेटी वाईट ठरेल. तसेच घटनेची संहिता उत्तम नसली तरी ती राबवणारे उत्तम असल्यास ती उत्तम असल्याचेच सिद्ध होईल... असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या राज्यघटनेच्या बाबतीत भाषणात म्हटले होते. त्याचे स्मरण आम्हाला आजचे हे प्रकरण ऐकल्यानंतर झाले आहे. कारण सिडकोने पंतप्रधान घरकुल योजनेतील सोडतीच्या बाबतीत अनाकलनीय पावले उचलल्याचे समोर आले आहे', असे खंडपीठाने आपल्या आदेशाच्या सुरुवातीलाच आवर्जून नमूद केले.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

