Baramati : निवडणूक आणि सहानुभूती वेगळे मुद्दे; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीत उमेदवार देण्याचे काँग्रेसचे संकेत

Pune : ‘राज्यात या अगोदर झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने काँग्रेसविरोधात उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्याठिकाणी काँग्रेस विजयी झाले असून निवडणुका आणि सहानुभूती हे दोन वेगळे मुद्दे आहेत. अजित पवार यांचे अकाली व अपघाती निधन ही दुख:द घटना आहे. बारामती आणि राहुरी या दोन्ही जागांवर आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकांसदर्भात त्यांच्याशी चर्चा करू आणि त्यानंतर उमेदवार उभा करायचा की नाही, याचा निर्णय घेऊ’, अशी भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी घेतली.

महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी यांसह देशभरातील आठ ठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे असून ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनानंतर बारामतीत, तर शिवाजी कर्डिले यांच्या मृत्यूमुळे राहुरीत पोटनिवडणूक होत आहे.

‘बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक एकाचवेळी होणार आहे. दोन्ही जागा नेत्यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या आहेत. सामंजस्याने दोन्ही ठिकाणची उमेदवारी बिनविरोध करावी,’ असे आवाहन याआधीच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले होते. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित आहे. राहुरीत दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांचे नाव चर्चेत आहे.



शहर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *