CET Exam Paper Leak : सारथी, बार्टी, महाज्योतीचा पेपर फुटला, विद्यार्थी एकवटले; पुण्यात परीक्षेवर बहिष्कार

 

CET Exam Paper Leak : सारथी , बार्टी , महाज्योती  सीईटी परीक्षेचा पुन्हा पेपर फुटल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेट विभागाचा गलथान कारभाराचा नमुना आज (बुधवार) समाेर आला. दरम्यान विद्यार्थ्यांनी या प्रकाराचा निषेध नाेंदवत परीक्षेवर बहिष्कार टाकला.

आज (बुधवार) पुणे येथील श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय वडगाव येथील परीक्षा केंद्रावर सारथी, बार्टी, महाज्योती संशोधन संस्थांसाठी घेण्यात येत असलेल्या पात्रता  परीक्षेत झेरॉक्स प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. यामुळे विद्यार्थी गाेंधळून गेले.

Auto Rickshaw Drivers Strike : संभाजीनगरमध्ये सामान्यांचे हाल; रिक्षाचालकांचा संप, शहर बससेवा राेखून धरली

याबराेबरच प्रश्न पत्रिकेतील सी आणि डी प्रश्न पत्रिकेला सील नसल्याचे विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आले. यामुळे विद्यार्थ्यांनी सार्वत्रिकरित्या बहिष्कार टाकत या प्रकाराचा निषेध नोंदवला. त्याशिवाय परीक्षेवर बहिष्कार टाकण्यात आला.

दरम्यान परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी घाेषणाबाजी केली. सर्व विद्यार्थी परीक्षा केंद्राच्या बाहेर आले. सध्या परीक्षा केंद्रावर पोलीस बोलावण्यात आले आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *