
Ram Mandir Darshan : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी मोठी घोषणा केली. येत्या ८ महिन्यात राज्यातील १५ लाख भाविकांना अयोध्येतील श्री राम मंदिरात दर्शनासाठी घेऊन जायचे आहे. देशातील सर्वात मोठी दिवाळी २२ जानेवारी २०२४ रोजी साजरी होईल, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मेरी माटी, मेरा देश’ अंतर्गत ‘सेल्फी विथ मेरी माटी’ या उपक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नुकतीच नोंद झाली. हा विश्वविक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्यांचा कृतज्ञता सन्मान सोहळा रविवारी आयोजित करण्यात आला.
|
|
यावेळी बावनकुळे बोलत होते. कार्यक्रमात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. विजय खरे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आदी मान्यवर उपस्थित होते.
येत्या ८ महिन्यात राज्यातील १५ लाख भाविकांना अयोध्येतील श्री राम मंदिरात दर्शनासाठी नेण्याची जबाबदारी राजेश पांडे यांना दिल्याचे बावनकुळे यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, ‘‘देशात राबविलेला ‘मेरी माटी, मेरा देश’ हा उपक्रम देशासाठी बलिदान दिलेल्यांना समर्पित आहे".
"या उपक्रमात देशातील एक कोटी ४० लाख नागरिक सहभागी झाले. तर या उपक्रमातंर्गत राज्यात झालेला ‘सेल्फी विथ मेरी माटी’चा विश्वविक्रम कौतुकास्पद आहे.’’, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. यावेळी पाटील यांनी ‘सेल्फी विथ मेरी माटी’ उपक्रमाच्या विश्वविक्रमाद्वारे आपण चीनला मागे टाकल्याचा आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमात विश्वविक्रम नोंदविण्यासाठी योगदान देणाऱ्यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. ‘‘या विश्वविक्रमासाठी जवळपास २५ लाख नागरिकांनी सेल्फी पाठविले होते. त्यातील जवळपास १० लाख ४२ हजार सेल्फी विश्वविक्रमासाठी ग्राह्य धरण्यात आले’’, अशी माहिती पांडे यांनी प्रास्ताविकात दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय चाकणे यांनी केले.
शहर
- कोठडीतील मृत्यूला जबाबदार कोण? वाशिममधील धक्कादायक प्रकरणात ९ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा!
- मुंबई: मुसळधार पावसाचा तडाखा! सांताक्रूझ कार्यशाळेत 238 मिमी पावसाची नोंद; अनेक भागांत जोरदार पाऊस
- शिक्षण विभागाची धडक कारवाई! मराठवाड्यातील २२ अधिकाऱ्यांची एकाच दिवशी उचलबांगडी; वर्षानुवर्षांची मक्तेदारी अखेर मोडीत!
- तुम्हीही खाताय का 'डर्टी' पाणीपुरी? कल्याणमध्ये अस्वच्छ कारखान्यावर केडीएमसीचा धडक छापा, कारखाना सील!
महाराष्ट्र
- मुंबई: मुसळधार पावसाचा तडाखा! सांताक्रूझ कार्यशाळेत 238 मिमी पावसाची नोंद; अनेक भागांत जोरदार पाऊस
- शिक्षण विभागाची धडक कारवाई! मराठवाड्यातील २२ अधिकाऱ्यांची एकाच दिवशी उचलबांगडी; वर्षानुवर्षांची मक्तेदारी अखेर मोडीत!
- तुम्हीही खाताय का 'डर्टी' पाणीपुरी? कल्याणमध्ये अस्वच्छ कारखान्यावर केडीएमसीचा धडक छापा, कारखाना सील!
- मुंबईत मोठी दुर्घटना: साकीनाक्यात २५ फूट खोल मॅनहोलमध्ये तरुण कोसळला; शोधमोहीम सुरू!
गुन्हा
- कोठडीतील मृत्यूला जबाबदार कोण? वाशिममधील धक्कादायक प्रकरणात ९ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा!
- केतन अग्रवाल हत्या प्रकरण: सिया आणि चेतनच्या कटात आणखी एकाचा सहभाग? पोलिसांची तपासाची नवी दिशा!
- पुणे: चाकणमध्ये मोबाईलवरून वाद; लाकडी बॅटने ठेचून २४ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या!
- व्हेनेझुएलातून मृतदेह आला, पण अवयव गायब! भारतीय खलाशाच्या मृत्यूचे गूढ वाढले; कुटुंबियांची सीबीआय चौकशीची मागणी!
राजकीय
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
इतर
- आजचे राशिभविष्य २ जुलै २०२६: या राशींच्या आयुष्यात येणार 'टर्निंग पॉईंट', गुरू देणार पाठबळ!
- आजचे राशिभविष्य (१ जुलै २०२६): 'या' राशींवर बरसणार गणपती बाप्पाची कृपा, करिअरमध्ये मिळेल मोठे यश!
- आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही कफ सिरप; आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय!
- आजचे राशिभविष्य ३० जून २०२६: 'या' राशींचे नशीब फळफळणार, मिळेल अमाप यश आणि संपत्ती!
मनोरंजन
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कोलकात्यात मन सुन्न करणारी घटना! उकळता चहा प्यायल्याने १२वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; शाळा व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणाचा वडिलांचा आरोप!
- राम मंदिर देणगी घोटाळा: आरोपींकडून लाखो रुपयांची रोख रक्कम आणि अमेरिकन डॉलर्स जप्त; एसआयटीच्या तपासात मोठा खुलासा!
- दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळेत येण्या-जाण्यासाठी मिळणार ६,००० रुपयांचा सरकारी भत्ता; योगी सरकारचे संवेदनशील पाऊल!
- नवी दिल्ली: रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! आता एका मिनिटात बुक होणार १.२५ लाख तिकीट; रेल्वेची क्षमता ५ पटींनी वाढली!
























Subscribe to my channel




