
Sanjay Raut : निवडणूक आयोग आणि ईडी हे केंद्र सरकारचे पोपट आहे, अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली आहे. जिथे पराभव होतो, तिथे ईडी कारवाई करते,असा आरोप खासदार संजय राऊतांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले, निवडणूक आयोग आणि ईडी दोन्ही केंद्र सरकारचे पोपट आहे. आम्हाला त्याचा अनुभव आहे. 2024 पर्यंत देशात अशीच परिस्थिती राहणार आहे. जिथे भाजपचे सरकार नाही. जिथे भाजपचा पराभव होतो तिथे ईडीची कारवाई सुरु होते. निवडणूक आयोग हे ईडी आणि सीबीआयप्रमाणे भारतीय जनता पार्टीचा पिंजऱ्यातला पोपट आहे. ज्या पद्धतीने शिवसेनेच्या बाबतीत महाराष्ट्रात इलेक्शन कमिशनरने निर्णय घेतला हा पूर्णपणे तसरकारच्या दबावाखाली घेतला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आहे. शिवसेनेचे वीस पंचवीस आमदार इकडे तिकडे गेले म्हणून संपूर्ण शिवसेना एका फुटीर गटाच्या हातात ठेवावी. त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशनची नियत आणि बिघडलेले चरित्र दिसते अशा कमिशनकडे जाऊन काय न्याय मिळणार आहे. शरद पवार हयात आहेत. पक्षाचे संस्थापक आणि त्यांचा पक्ष अजित पवार यांना दिला जातो असे इलेक्शन कमिशनर आपल्याला लाभले आहे.
|
|
महाराष्ट्रामध्ये कमजोर अस्थिर सरकार
कॅबिनेटमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा गँगवॉरसारखी स्थिती निर्माण झाली आहे. मंत्री ऐकमेकांच्या अंगावर धावून जात आहे.अशी परिस्थिती महाराष्ट्रात कधी नव्हती. महाराष्ट्रामध्ये कमजोर अस्थिर सरकार बसले आहे. मुख्यमंत्र्यांना कोणी जुमानत नाही भाजप यांना जुमानत नाही. मुख्यमंत्री जर आपल्या मंत्र्यांवरती नियंत्रण मिळू शकत नाही तर मंत्र्यांमध्ये प्रमुख म्हणून बसण्याचा त्यांना अधिकार नाही.भुजबळ एक बोलतात शंभुराज देसाई दुसरेच बोलतात, असे संजय राऊत म्हणाले.
24 डिसेंबरनंतर महाराष्ट्रात काय होईल सांगता येणार नाही
मनोज जरांगे पाटील यांनी 24 डिसेंबर ही डेडलाईन दिली आहे. 24 डिसेंबरनंतर या महाराष्ट्रात काय होईल हे कोणी सांगू शकत नाही. जरांगे पाटील यांनी मुंबईचा नाक बंद करण्याचा इशारा दिला आहे जर मुख्यमंत्र्यांनी एक गांभीर्याने घेतलं नाही तर या देशात महाराष्ट्राची बेअब्रू होईल. बिहार आणि तामिळनाडू करु शकतो तर महाराष्ट्र देखील करू शकतो. जरांगे पाटील यांनी मुंबई चा नाक बंद करण्याचा इशारा दिला आहे जर मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेतलं नाही तर या देशात महाराष्ट्राची बेअब्रू होईल, असे संजय राऊत म्हणाले.
मुख्यमंत्री आणि त्यांच्या लोकांची माफियागिरी सुरू
मुख्यमंत्री आणि त्यांच्या लोकांची जी माफियागिरी सुरू आहे.बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात निर्माण केलेल्या शाखा या तुम्ही ताब्यात घेत आहे आणि बुलडोजर फिरवत आहात आणि ही मस्ती फार काळ राहणार नाही. पोलिसांना मी काल इशारा दिला आहे. मुंब्य्रातील शाखा बाळासाहेब ठाकरेंपासूनआहे. तुम्ही सत्तेच्या जोरावर शाखा ताब्यात घेत आहे. त्या शाखेत बाळासाहेबांचा फोटो छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे आणि त्या शाखेवर तुम्ही फिरवत आहात ही मोगलाई सुरू आहे, असे देखील संजय राऊत म्हणाले.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!



























Subscribe to my channel

