
Devendra Fadnavis on Maratha Andolan : जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर शुक्रवारी पोलिसांकडून लाठीहल्ला करण्यात आला. त्यामुळे या लाठीहल्ल्यात अनेक आंदोलक जखमी झाले. तसेच काही पोलीसही जखमी झाले. त्यानंतर शिंदे सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागत दोषींवर कारवाई करणार असल्याची ग्वाही दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणासाठी बैठक झाली. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद झाली.
या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीला खासदार उदयनराजे भोसले होते. तसेच माजी खासदार संभाजीराजे देखील फोनवर होते. यावेळी राज्यातील परिस्थितीवर चर्चा झाली. मागण्यांच्या संदर्भात ही चर्चा झाली'.
'जालन्यात जे काही झालं ते दुर्दैवी होतं. त्याचं समर्थन होऊ शकत नाही. मी मुख्यमंत्री असताना अनेक आंदोलने झाली, पण बळाचा वापर झाला नाही. या लाठीहल्ला प्रकरणात ज्यांना त्रास झाला, त्यांची माफी मागतो. दोषींवर कारवाई होणार, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
|
|
'या प्रकरणाचं राजकारण योग्य नाही. काही पक्ष तसेच करत आहेत. लाठीचार्ज करण्यासाठी आदेश एसपी, डीएसपी यांच्या स्तरावर होतो. मावळ येथे काही झालं, त्याला तेव्हाचे मुख्यमंत्री जबाबदार होते का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
'लोकांना यातील राजकारण दिसतं. मराठा आरक्षण २०१८ साली आलं. उच्च न्यायालयाने मान्य देखील केलं. आमचं सरकार असताना देखील सर्वोच्च न्यायालयाने त्यावर बंदी आणली नव्हती. मात्र सरकार बदलल्या नंतर हे झालं. उद्धव ठाकरे म्हणतात वटहुकूम काढा, मग त्यांनी का केलं नाही. आमच्या काळात ओबीसीप्रमाणे सगळ्या सुविधा मराठा समाजाला मिळाल्या, असे ते म्हणाले.
'अनेक योजना सुरू केल्या. विद्यार्थ्यांना रहिवाशी भत्ता सुरू केला, यूपीएससी आणि एमपीएससी च्या शिक्षणासाठी सोय केली. परदेशी शिष्यवृती योजना सुरू केली. सर्व निर्णय महायुतीच्या काळातच झाले. आम्ही मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकवण्याचं काम केलं. आज पुळका आल्यासारखे वागत आहेत, त्यांनी घालवण्याचं काम केलं, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अजित पवारांची मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया
अजित पवार यावेळी म्हणाले, ' मी दोन दिवस आजारी होतो, त्यामुळे बाहेर पडू शकलो नाही. जालन्यात जे झाले ते व्हायला नको होतं, ही सगळ्यांचीच मागणी आहे. काही लोक त्याची राजकीय पोळी भाजत आहेत'.
'अनेक समाज आरक्षणाची मागणी करतात, पण तो कायद्याच्या कसोटीत बसायला हवा. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं. कोणत्या कारणाने टिकलं नाही, याचा अभ्यास गरजेचा आहे, असे ते म्हणाले.
शहर
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
महाराष्ट्र
- ठाणे महापालिकेचा अजब कारभार: मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना शिकवतायत गुजराती शिक्षक; माजी नगरसेवक अनिल भोर यांनी फोडले भांडं
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- धाराशिव जिल्हा परिषदेत दोन तास काळजाचा ठोका चुकला! लिफ्टमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्याची दोन तासांच्या थरारानंतर सुटका
गुन्हा
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
- छत्रपती संभाजीनगरमध्ये थरार: सासूसमोर सुनेची हत्या करणाऱ्या महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी; आर्थिक वादातून हत्या झाल्याचा संशय
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




