
पुणे - शहरातील अर्धवट राहिलेले रस्ते वाहतुकीला खुले करण्यासाठी महापालिकेने अभ्यास केला. त्यात तब्बल ४०१.२२ किलोमीटरचे अविकसित रस्ते (मिसिंग लिंक) आढळून आले आहेत. त्यातील अत्यावश्यक आणि कमी अंतर असणारे ३८ रस्ते निश्चित झाले आहेत. त्यामुळे पुढील सहा महिन्यांत ११ उपनगरांमधील या रस्त्यांच्या जागा ताब्यात घेऊन, ६.५ किलोमीटरचे रस्ते एकमेकांना जोडून कोंडी फोडली जाणार आहे.
पुणे महापालिकेत आतापर्यंत १९९७, २०१७, २०२१ अशा तीन टप्प्यांत हद्दीलगतची ५८ गावे समाविष्ट झाली. त्यामुळे शहराचे क्षेत्रफळ ५१८ चौरस किलोमीटर इतके झाले आहे. ही गावे महापालिकेत आली असली, तरी तेथील रस्त्यांच्या प्रश्न गंभीर आहे. पर्यायी मार्ग नसल्याने लहान रस्ते अपुरे पडत आहेत. त्यामुळे महापालिकेने गेल्यावर्षीपासून अविकसित रस्ते शोधण्याचे काम हाती घेतले होते. त्यामध्ये ४०१.२२ किलोमीटरचे अविकसित रस्ते समोर आले आहेत.
१२८ किलोमीटरचे रस्ते हे ‘पीएमआरडीए’च्या रिंगरोडमध्ये समाविष्ट असल्याने हा भाग महापालिकेने वगळला आहे. उर्वरित २७३.२२ किलोमीटर लांबीचे ३९० रस्ते महापालिकेने शोधले आहेत. हे रस्ते एकाच वेळी विकसित करणे अशक्य आहे, त्यासाठी मोठ्याप्रमाणात निधी लागणार आहे.
|
Pune Fire News : पुण्यात येवलेवाडी येथे गोडाऊनला भीषण आग! अग्निशामक दलाच्या १० गाड्या घटनास्थळी |
महापालिकेने केलेल्या अभ्यासात धायरी, हडपसर, वारजे, कोथरूड, बाणेर, पाषाण, औंध या शहराच्या प्रवेशद्वारावरील भागातच सर्वाधिक रस्ते अविकसित असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये धायरीतील ४० किलोमीटरचे, तर हडपसरमध्ये ४५ किलोमीटरचे रस्ते अद्याप कागदावर आहेत.
स्वतंत्र अभियंते नेमणार
पहिल्या टप्प्यात कमी अंतराचे, पण महत्त्वाचे असलेले रस्ते विकसित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यातील ३८ रस्त्यांची निवड केली असून, २० मीटर ते ३०० मीटर लांबीचे रस्ते अर्धवट आहेत. त्यांना प्राधान्य देऊन जागा ताब्यात घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
प्रत्येक रस्त्यासाठी स्वतंत्र अभियंता, रस्ता ताब्यात न येण्याची कारणे निश्चित करून हे प्रश्न एक महिना ते सहा महिन्यांत मार्गी लावून रस्ते ताब्यात घेतले जाणार आहेत. या कामाची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्याकडे दिली आहे.
कामे रखडण्याची कारणे (कंसात रस्ते)
-
८ - रोख मोबदल्याचा आग्रह
-
१२ - टीडीआर, एफएसआय देणे प्रलंबित
-
६ - अनधिकृत बांधकाम
-
२ - शासकीय जमीन ताब्यात न येणे
-
५ - न्यायालयीन प्रकरणे
-
५ - जागा ताब्यात येण्याची लांबलेली प्रक्रिया
अविकसित रस्ते (किलोमीटरमध्ये)
४८.१८ - पुणे शहराची जुनी हद्द
९३.२१ - १९९७ ला समाविष्ट झालेली २३ गावे
१८०.० - २०११ ला समाविष्ट झालेली ११ गावे (आरपी)
८०.०५ - २०२१ ला समाविष्ट झालेली २३ गावे
या भागातील आहेत ३८ रस्ते
हडपसर, कोंढवा, कात्रज, आंबेगाव नऱ्हे, वडगाव, कर्वेनगर, कोथरूड, सुतारवाडी, लोहगाव, खराडी, येरवडा
महापालिकेने शहरातील रस्त्यांचे जाळे मजबूत करण्यासाठी ‘मिसिंग लिंक’चा अभ्यास केला आहे. त्यातील ३८ रस्त्यांची कामे पहिल्या टप्प्यात हाती घेतली आहेत. त्यामुळे पुढील काही महिन्यांत या जागा ताब्यात येतील. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जाणार आहे.
- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



