
Pune : पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेत. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचकच राहिला नसल्याचे चित्र वारंवार पुण्यात समोर येत आहेत. अशामध्ये नुकताच झालेल्या दर्शना पवार हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता राहिली. पुण्यामध्ये एका तरुणीवर पोलीस ठाण्यासमोरच कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमपीएससीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर तिच्याच मित्राने कोयत्याने हल्ला केला आहे. या हल्ल्यात या तरुणीसोबत तिचा आणखी एक मित्र जखमी झाला आहे. तरुणीवर हल्ला करणारा तरुण आणि तिचा मित्र हे देखील एमपीएससीचे शिक्षण घेत आहेत.पुण्यातील सदाशिव पेठेत या तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. सदाशिव पेठेतील पेरुगेट पोलीस चौकीजवळ ही घटना घडली.
|
Pune Crime : राजगडाच्या पायथ्याशी अढळला तरुणीचा मृतदेह; MPSC परीक्षेत राज्यात आली होती सहावी! |
पीडित तरुणी कॉलेजला निघाली होती. तिच्यासोबत तिचा मित्र देखील होता. तिच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. यावेळी आरोपीने तिच्या मित्रावर देखील हल्ला केला. हल्ल्यानंतर ही तरुणी आपला जीव वाचवण्यासाठी रस्त्यावरुन पळू लागली. तिच्या मागे आरोपी कोयता घेऊन लागला होता तरी देखील कुणीच तिच्या मदतीला धावून आले नाही.
जखमी अवस्थेत तरुणीला धावताना पाहून एक तरुण तिच्या मदतीला धावून आला. कोयता हातात असलेला तरुण मुलीच्या डोक्यात वार करणार तेवढ्यात लेशपाल जवळगे नावाचा तरुणाने आरोपीच्या हातातील कोयता पकडला आणि त्याला रोखले. त्यानंतर इतर लोकं पुढे आले आणि हल्लेखोर तरुणाला त्यांनी चोप दिला. त्यानंतर पोलीसांनी हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतलं.
जुन्या प्रेम प्रकरणाचा राग मनात धरुन या तरुणाने तरुणीवर कोयता हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यात तरुणी आणि तिचा मित्र जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




