
Pune : आखाती देशांमधील संघर्षाचा चटका हॉटेलमधील नाश्ता-जेवणाच्या ताटाला बसला असून, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या टंचाईमुळे रेस्तराँ-हॉटेलचालकांनी आपल्या मेन्यूमधून खमंग डोसा-उत्तपा, वड्यांसारखे तळणीचे पदार्थ अन् मंद आचेवर शिजवावे लागणारे दाल मखनी, दम बिर्याणीसह चायनीज खाद्यपदार्थ कमी केले आहेत. त्याऐवजी पोहे, उपमा, सँडविचसारखा नाश्ता, मिसळ - पावभाजी, भेळ-शेवपुरीसारखे ‘चाट’ पदार्थ, झटपट होणाऱ्या भाज्यांचा समावेश असलेल्या थाळ्या खवय्यांना ‘सर्व्ह’ केल्या जात आहेत.
गॅसटंचाईची परिस्थिती निर्माण झाल्याने, शहरातील हॉटेलांनी आपला ‘मेन्यू’ बदलला आहे. सतत गॅस पेटता ठेवावा लागेल, अशा खाद्यपदार्थांना ‘मेन्यू’मधून कात्री लावण्यात आली आहे. गरम तव्यावर होणारे जाळीदार डोसा-उत्तपा, वडे, भजी, सामोश्यासारखे तळणीचे चमचमीत पदार्थ, मंद आचेवर शिजवली जाणारी दाल मखनी, ‘दम’ प्रक्रियेतून तयार केली जाणारी बिर्याणी, उकळाव्या लागणाऱ्या ग्रेवी-सूप असे गॅसचा जास्त वापर करणारे पदार्थ बंद करण्याचा निर्णय रेस्टॉरंटचालकांनी घेतला आहे.
भाकरीचा ‘तवा’ थंड
जेवणाच्या थाळीतील भाकरीलाही गॅसटंचाईची धग बसली आहे. काही शाकाहारी-मांसाहारी हॉटेलांनी गॅस वाचविण्यासाठी गरमागरम भाकरी देणे बंद केले आहे. त्यामुळे भाकरप्रेमींना चपाती किंवा फुलक्यावर समाधान मानावे लागत आहे.
काळ्या बाजारातही टंचाइ
गॅसटंचाईमुळे शहरात तीन दिवस व्यावसायिक सिलिंडरचा काळाबाजार सुरू होता. त्यासाठी तीन दिवसांपूर्वी अतिरिक्त २०० रुपये घेतले जात होते, ते कालपर्यंत हजार रुपयांवर गेले होते. मात्र, आता काळ्या बाजारातही सिलिंडर मिळत नसल्याचे एका हॉटेल व्यावसायिकाने सांगितले.
खाणावळींच्या भटारखान्याची चूल विझणार ?
व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा पुरवठा बंद झाल्याने शहरातील खाणावळींना फटका बसू लागला आहे. 'अनेक खाणावळींतील एलपीजी गॅस संपत चालला आहे. जागेअभावी चूल किंवा इंडक्शनसारख्या महागड्या पर्यायांचा खाणावळींमध्ये वापर शक्य नाही. त्यामुळे खाणावळी बंद करावी लागतील, असे चालकांकडून सांगितले जात आहे. त्याचा फटका खाणावळीवर क्षुधाशांतीसाठी अवलंबून असलेल्या विद्यार्थ्यांना बसेल. मेसचे दर वाढण्याची भीती असून, विद्यार्थ्यांना एकवेळ जेवावे लागेल, किंवा एक डबा दोघांमध्ये शेअर करावा लागेल. त्यामुळे सरकारने सार्वजनिक पोळी-भाजी केंद्र सुरू करावे,' अशी प्रतिक्रिया स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या नितीन आंदळे याने दिली.
शेगड्या-इंडक्शनचा जुगाड
स्वयंपाकासाठी चुलीसह कोळसा-डिझेलवरील शेगड्या, इलेक्ट्रिक इंडक्शन, मायक्रोव्हेव्ह या पर्यायी साधनांचा वापर हॉटेलचालक करीत आहेत. व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरचा तुटवड्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी खाद्यपदार्थ बनविण्यासाठी हा पर्यायी 'जुगाड' सुरू केला आहे.
व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने व्यावसायिक सिलिंडरचा तटाली आहे. सिलिंडर उपलब्ध नसल्याचे पुरवठादार सांगत आहेत. हॉटेल व्यावसायिक एकमेकांकडे सिलिंडर आहे का, अशी विचारणा करीत आहेत. आमच्याकडे एक सिलिंडर असून, ते केवळ एक दिवस पुरेल. - सतीश शेट्टी, पालखी हॉटेल
कोणतीही पूर्वसूचना न देता पुरवठादाराने सोमवारपासून अचानक गॅस सिलिंडर देणे बंद केले. रेस्टॉरंट उद्योगाकडून सर्वाधिक महसूल प्राप्त होतो. त्या प्रमाणात सुविधा मिळत नाहीत. दोन सिलिंडर देण्यास अडचणी असतील, तर किमान एक सिलिंडर द्यावा. हॉटेलमधील कामगारांचे हातावर पोट असते. त्यामुळे हॉटेल बंद करणे हा पर्याय नाही. परिणामी, बुधवारपासून कोळशाच्या शेगडीवर हॉटेल चालविले जात आहे. लोकप्रतिनिधींनी यात हस्तक्षेप करून हॉटेलचा गॅसपुरवठा सुरळीत करावा. - समीरा जांगिरा, हॉटेलचालक
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.























Subscribe to my channel




