होळीनंतर वाढत्या उष्णतेपासून काही आराम हवा असेल तर माझा एक सल्ला आहे. हॅरी स्टाइल्सची स्टाइल तुमच्या हृदयाला शांत करू शकते. मुंबईतील कमाल तापमान फक्त एका दिवसात 5 अंशांनी वाढले आणि या वर्षीच्या सर्वोच्च 38.7 अंश सेल्सियसवर पोहोचले. त्यामुळे बुधवारी होळीचा आनंद घेणाऱ्यांत सर्वाधिक चर्चेचा विषय होता दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये काय परिधान करून जायचे. हॅरी स्टाइल्सच्या स्टाइल स्टेटमेंटचे अनुसरण करणारे मिलेनियल्स या प्रश्नाचे उत्तर सहज देतात. ही व्यक्ती कोण आहे याबद्दल विचार करत आहात का? 32 वर्षीय हॅरी एडवर्ड स्टाइल्स हा एक इंग्लिश गायक, गीतकार व अभिनेता आहे. त्याची शोमनशिप, कलात्मकता आणि भडक फॅशनचा लोकप्रिय संस्कृतीवरील खोल परिणाम दर्शवतो. तो अनेक कारणांमुळे मिलेनियल्समध्ये लोकप्रिय आहे. गेल्या आठवड्याच्या शेवटी ब्रिट अवॉर्ड्समध्ये हॅरीने तीन वर्षांत पहिल्यांदाच रेड कार्पेटमध्ये दिसण्यासाठी टायसह एक क्रिस्प पांढरा शर्ट पिनस्ट्राइप सूट घातला होता. तो जवळून अजिबात पांढरा वाटत नव्हता. तो हलका मिंट ग्रीन होता. पण दूरवरून कॅमेऱ्यात मात्र तो पांढरा दिसत होता. टाय क्लासिक स्ट्राइप्ड होता आणि काळी हाय-वेस्टेड, रुंद पायांची पँट (थोडीशी बेल-बॉटम स्टाइलसारखी) व्यवस्थित बांधलेली होती. त्यात बारीक पांढरे पट्टे होते. तो पायऱ्या चढत असताना त्याच्या जॅकेटचा खालचा भाग आकर्षक वाटत होता. फॅशनच्या बाबतीत कमी उत्सुक असलेल्यांनाही दुर्लक्ष करणे कठीण होते. आजकाल तुम्ही टीव्हीवर युद्धाच्या बातम्या पाहत असाल तेव्हा तुम्हाला अनेक राजकारणी पांढऱ्या शर्टवर राखाडी, काळे किंवा निळे जॅकेट परिधान केलेले दिसतील. पण वाढत्या उन्हात तुमच्या आणि माझ्यासारखे लोक दररोज ऑफिसला जातात. ते फक्त एक साधा पांढरा शर्ट आणि खूप घट्ट नसलेला ट्राउझर्स घालू शकतात. मुंबई आणि दिल्लीतील आर्मी क्लब आणि यूएस क्लब देखील संध्याकाळी जॅकेटशिवाय पूर्ण बाह्यांचा पांढरा शर्ट घालण्याची परवानगी देतात. परंतु टी-शर्ट क्वचितच परवानगी आहेत. महिलांसाठी खिसा आणि आकर्षक वेस्टलाइनचे फ्रॉक लोकप्रिय होत आहेत. कारण अशा डिझाइन्स परिधान करणाऱ्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकतात. अशा वस्त्र प्रावरणामुळे व्यक्ती शिडशिडीत दिसते. अशा डिझाइन्सचा उद्देश बहुतेकदा संतुलन निर्माण करणे असतो. या ड्रेसेसचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे टेलर कटिंग कसे केले जाते किंवा कमरबंद आणि परिधान करणाऱ्याचा नैसर्गिक शरीराचा आकार वाढविण्यासाठी शिवण प्लेसमेंट यावर खूप काही अवलंबून आहे. या नवीन फॅशनमध्ये खिसे ही एक आवश्यक अॅक्सेसरी आहे. अनेक डिझायनर्सनी नफा वाढवण्यासाठी या छोट्या वैशिष्ट्याकडे दुर्लक्ष केले होते. परंतु आता त्यांना हे लक्षात आले आहे की महिलांना त्यांच्या वैयक्तिक वस्तू ठेवण्यासाठी खिसे आवश्यक आहेत. खरे तर जगभरातील डिझायनर्सना खिसे नसलेल्या कपड्यांपेक्षा खिसे असलेल्या कपड्यांनी जास्त नफा मिळवून दिला आहे. स्त्रीत्व आणि आधुनिकतेचे मिश्रण महिलांच्या उन्हाळी कपड्यांसाठी नवीन चर्चा बनली आहे. तुम्ही गेल्या आठवड्यात मिलान फॅशन वीक पाहिला असेल तर तुमच्या लक्षात आले असेल की अनेक फ्रंटबेंचर्सनी कधीही त्यांचे काळे चष्मे काढले नाहीत. हार्दिक पंड्यासारखे टी-20 खेळाडू दाखवून देतात की संध्याकाळी उशिरापर्यंतही काळे चष्मे घालणे ठीक आहे. 2025-26 मध्ये महिलांमध्ये सर्वात लोकप्रिय असलेले गडद चष्मे बोल्ड, ओव्हरसाइज्ड आणि रेट्रो-प्रेरित आहेत. ते कार्यक्षमता आणि उच्च-फॅशन सौंदर्यशास्त्र यांचे मिश्रण आहे. चौकोनी, फुलपाखरू आणि गोल आकार यासारख्या मोठ्या फ्रेम्स आज खूप लोकप्रिय आहेत. त्यामुले 1970 च्या दशकातील ग्लॅमरस लूक निर्माण होतो. पुरुषांसाठी हे बहुतेकदा जाड, जाड ॲसिटेट मटेरियलपासून बनवले जातात.
फंडा असा की- बदलत्या फॅशनला समजून घेणे आणि कामाच्या ठिकाणी त्याचा स्वीकार करणे तुम्हाला अधिक आत्मविश्वासू, उत्पादक आणि फॅशनेबल बनवते.
हे पण वाचा-
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




