पुणे: शहरातील गजबजलेल्या कॅम्प परिसरातील १५ ऑगस्ट चौकाजवळ असलेल्या एका बँकेबाहेर शुक्रवार (दि. २७ नोव्हेंबर) रोजी बेवारस व संशयित बॅग आढळून आल्याने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली. संभाव्य धोक्याच्या आणि भीतीच्या वातावरणामुळे पोलिसांनी तातडीने पावले उचलत काही काळासाठी हा संपूर्ण परिसर रिकामा केला होता. मात्र, स्थानिक पोलीस आणि बॉम्बशोधक व नाशक पथकाने (BDDS - बॉम्ब स्कॉड) बॅगेची अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने कसून तपासणी केल्यानंतर त्यामध्ये कोणतीही स्फोटक किंवा धोकादायक वस्तू आढळली नाही. त्यामुळे ही केवळ अफवा आणि घबराट असल्याचे समोर आल्याने नागरिकांसह पोलीस प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला.
बँक कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे तपासणी सुरू
१५ ऑगस्ट चौकाजवळील एका बँकेच्या बाहेर एक बेवारस आणि संशयास्पद बॅग पडून असल्याचे बँक कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. आजूबाजूला बॅगेचा कोणीही मालक दिसत नसल्याने कर्मचाऱ्यांनी तात्काळ याबाबत नियंत्रण कक्ष आणि स्थानिक पोलिसांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकारी, स्थानिक पोलीस पथक आणि बॉम्बशोधक व नाशक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
सुरक्षेच्या कारणास्तव आणि परिसरात पसरलेल्या भीतीमुळे पोलिसांनी आजूबाजूची वाहतूक व नागरिकांना बाजूला सारून संपूर्ण परिसर काही काळासाठी रिकामा केला. त्यानंतर बॉम्बशोधक पथकाने या बॅगेची बारकाईने तपासणी केली असता, त्यात कोणतीही आक्षेपार्ह किंवा धोकादायक वस्तू आढळून आली नाही. तपासणी पूर्ण झाल्यानंतर परिसरातील वाहतूक आणि व्यवहार पूर्ववत करण्यात आले.
सलग धमक्यांमुळे पुणे पोलीस यंत्रणा हायअलर्टवर
सध्या पुणे शहरात सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच ही घटना घडल्याने मोठी धावपळ उडाली होती. यापूर्वी शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारे ई-मेल नोव्हेंबर महिन्यात तीन वेळा (२ नोव्हेंबर, २३ नोव्हेंबर आणि गुरुवारी २६ नोव्हेंबर) प्राप्त झाले होते. तसेच, पुणे महानगरपालिका मुख्यालयालाही ई-मेलद्वारे धमक्या मिळाल्या होत्या आणि जिल्हा न्यायालयाच्या आवारात नुकत्याच झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे शहर हादरले आहे.
या पार्श्वभूमीवर गुरुवारीच पुणे जिल्हा प्रमुख न्यायाधीश अंजू शेंडे, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संजय दराडे, पुणे बार असोसिएशनचे पदाधिकारी आणि न्यायालय प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. विशेष म्हणजे या बैठकीदरम्यानच न्यायालयाला धमकीचा ई-मेल आला होता. या सर्व गंभीर पार्श्वभूमीवर १५ ऑगस्ट चौकात आढळलेल्या बेवारस बॅगेची पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने दखल घेत तत्काळ शोधमोहीम राबवली.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: संविधान जिवंत ठेवण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू; छत्रपती संभाजीनगरमधून कन्हैयाकुमार यांचा सरकारवर हल्लाबोल!
- पुणे: बहिणीला भेटण्यासाठी आला अन् काळाने घातला घाला; मोशीतील शेततळ्यात बुडून मामा-भाच्याचा मृत्यू!
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
- मुंबई: ७ कोटी फ्लॅटधारकांसाठी मोठा निर्णय! आता प्रत्येक सदनिकेला मिळणार स्वतंत्र 'व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड' महसूल विभागाचा मसुदा जाहीर
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: संविधान जिवंत ठेवण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू; छत्रपती संभाजीनगरमधून कन्हैयाकुमार यांचा सरकारवर हल्लाबोल!
- पुणे: बहिणीला भेटण्यासाठी आला अन् काळाने घातला घाला; मोशीतील शेततळ्यात बुडून मामा-भाच्याचा मृत्यू!
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
- परभणी: २ वर्षे अनैतिक संबंध, महिलेनं २ अल्पवयीन मुलांच्या मदतीने प्रियकराला संपवलं; परभणीत मध्यरात्री रिक्षाचालकाच्या हत्येचा थरार!
गुन्हा
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
- परभणी: २ वर्षे अनैतिक संबंध, महिलेनं २ अल्पवयीन मुलांच्या मदतीने प्रियकराला संपवलं; परभणीत मध्यरात्री रिक्षाचालकाच्या हत्येचा थरार!
- पुणे: नंबरप्लेट नसलेली मोपेड, एका गाडीवर तिघे अन् कात्रज ते शिवाजीनगर थेट प्रवास! वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह
- पुणे: पुण्यातील गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणातील आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी; पोलिसांनी कोर्टात दिली धक्कादायक माहिती!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गुरुवार राशिभविष्य २६ नोव्हेंबर २०२६: दत्तगुरु व स्वामींच्या कृपेने करिअर, पैसा आणि प्रगतीचे शुभ योग!
- केंद्र योग आणि मंगळाची कृपा: २५ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींना मिळणार आर्थिक लाभ आणि प्रगतीची सुवर्णसंधी? वाचा सविस्तर राशिभविष्य!
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोंदिया: दांडेगाव बसस्थानकाजवळ पोलीस वाहनाची पल्सर दुचाकीला भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, संतप्त ग्रामस्थांकडून रस्त्यावर टायर जाळून निषेध!
- गोवा: दोन नेत्यांचे मनोमीलन आणि रंगली लंच पे चर्चा; २०२७ च्या निवडणुकीसाठी भाजपची मोठी रणनीती, केंद्रीय नेतेही होते उपस्थित!
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!























Subscribe to my channel




