माझ्या एका मित्रासाठी दिवाळीच्या सुट्ट्या डोळ्यांची पापणी लवावी तशा निघून गेल्या. त्या वाईट होत्या म्हणून नव्हे, तर त्या खूप छान गेल्या म्हणून. त्याची 18 वर्षांची मुलगी या दोन आठवड्यांत आयुष्याबद्दल खूप उत्साही होती. ती हसतमुख आणि आनंदी होती. मित्रांच्या ग्रुपसोबत वेगवेगळ्या रोमांचक कामांत व्यग्र होती. तीन कठीण महिन्यांनंतर ती पुन्हा सामान्य झाली होती. यापूर्वी ती ‘युनिव्हर्सिटी रिफ्यूजर’ झाली होती. तिला युनिव्हर्सिटी आवडत नव्हती. तिच्या मते, तिथे ‘अटेंडन्सबाबत खूप कडक नियम’ होते. शिक्षक, समुपदेशक, विभागप्रमुख आणि विषयप्रमुखही तिच्या पालकांना फोन करू लागले होते. परिस्थिती तेव्हा आणखी बिघडली, जेव्हा कुलगुरूंनी तिला कडक शब्दांत फटकारत काढून टाकण्याची धमकी दिली. तिने इतका धसका घेतला की, वडील युनिव्हर्सिटीत जा म्हणताच ती सुन्न होऊन रडू लागे. कधी थरथर कापत दूर पळून जात असे, तर कधी ओरडत असे. अनेक दिवस वडिलांनी तिला ऑफिसला जाताना युनिव्हर्सिटीत सोडले, खरे तर तिचा क्लास सकाळी 7.15 वाजता सुरू होत असे आणि ऑफिसची वेळ सकाळी 9 ची होती. मात्र तिने क्लास केला नाही, असा शिक्षकांचा फोन यायचा. कॅम्पसमध्येच ती कुठेतरी असायची. कदाचित कॅन्टीन, गार्डन किंवा एखाद्या एकांत कोपऱ्यात. तिच्या वडिलांनी कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी करून पाहिली, मेंटल-हेल्थ सपोर्ट घेतला आणि तिला आयर्नच्या गोळ्या तसेच प्रोबायोटिक्सही दिले. याचा थोड्या काळासाठी फायदा झाला, पण समस्या कायम राहिली. त्यांना समजले की मूळ अडचण अशी होती की, शिक्षक जे शिकवत होते ते तिला समजत नव्हते. तिने पुन्हा सांगण्याची विनंती केली, तर शिक्षक म्हणत की पहिल्यांदाच नीट ऐकायला हवे होते. ती बोलकी होती, त्यामुळे शिक्षकांनी तिला अन-अटेंटिव्ह मानले. त्या मुलीला वाटत होते की तिच्यासोबत चुकीचे घडत आहे. शाळेत कधीच तिच्यावर टीका झाली नव्हती, त्यामुळे युनिव्हर्सिटीच्या या वागणुकीने ती घाबरली होती. तिथे विद्यार्थ्यांना प्रौढ मानून त्यांनी स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी घ्यावी, अशी अपेक्षा केली जात होती. सिंगल पॅरेंट असल्यामुळे वडील नोकरी सोडू शकत नव्हते, म्हणून त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. सर्वात आधी मी त्यांना सांगितले की, त्यांनी कोणताही पूर्वग्रह न ठेवता मुलीचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि तिच्यावर दबाव टाकणे बंद करावे. जेव्हा ती म्हणेल की तिला एखादे काम विशिष्ट पद्धतीने करायचे आहे, तेव्हा तिला म्हणावे की ‘छान आहे, पण मला वाटते तू ही पद्धतही वापरून पाहावीस.’ मुलीच्या बोलण्याला विरोध न करता ‘मी हे करू शकत नाही’ याऐवजी ‘हो, मी करू शकतो’ किंवा ‘तू हे करू शकतेस, पण यात काही अडचणी येऊ शकतात,’ असे म्हणण्यास मी त्यांना शिकवले. सुदैवाने युनिव्हर्सिटीने वडिलांना साथ दिली. त्यांनी मुलीसाठी पर्सनल मेंटर नियुक्त केला, ज्यामुळे आईच्या नसण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यास मदत झाली. तिला समजले की युनिव्हर्सिटीत शिकवली जाणारी प्रत्येक गोष्ट शाळेप्रमाणे लिखित स्वरूपात दिली जाणार नाही. तोंडी स्पष्टीकरणही अभ्यासाचाच एक भाग आहे. तिने हे वास्तव स्वीकारले आणि नोट्स काढायला सुरुवात केली. हळूहळू काढून टाकले जाण्याची भीतीही कमी झाली आणि तिला निश्चिंत झोप लागू लागली. तिने तिच्या विषयांवर वडिलांशी चर्चा सुरू केली. शिकण्यातील तिची आवड पुन्हा निर्माण झाली. मी वडिलांना सल्ला दिला की, मुलगी ज्या विषयांवर चर्चा करत आहे, त्याबद्दलची काही अतिरिक्त माहिती तिला द्यावी, जेणेकरून ती वर्गात आपली गुणवत्ता दाखवू शकेल. मीही त्यांना काही माहिती दिली. नंतर ती मुलगी स्वतः माझ्याकडे आणखी माहिती घेण्यासाठी आली. खरेतर, तिची खरी गरज ही होती की आयुष्याच्या किमान एका तरी भागात तिला ओळख मिळावी. तिने नकार दिला होता, तो तिला शिक्षण सोडायचे होते म्हणून नव्हे, तर तिला युनिव्हर्सिटीच्या नव्या वातावरणाशी जुळवून घेता येत नव्हते. व्यग्र वडील, अनोळखी शिक्षक आणि युनिव्हर्सिटीच्या नियमांमुळे ती निराश झाली होती. दिवाळीनंतर तिची अटेंडन्स 100% आहे. फंडा असा आहे की, मुलांना हे समजणे गरजेचे आहे की आपल्याला त्यांच्या क्वालिफिकेशनपेक्षा जास्त त्यांची काळजी आहे. जेव्हा त्यांना मानसिकदृष्ट्या सुरक्षित वाटू लागते, तेव्हा त्यांच्यासाठी अभ्यासातही आपली जागा निर्माण करणे सोपे होते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: अहिल्यानगर महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात! दुभाजक ओलांडून कार पलटी आणि ट्रकला धडक; वाघोलीतील ३ तरुणांचा मृत्यू, २ जखमी!
- पुणे: पाईट–शिरोली मार्गावर हायवाची स्कूटरला भीषण धडक; दिंडी मंडळाचे अध्यक्ष पोपट रौंधळ यांचा जागीच मृत्यू!
- पुणे: 'एफडीए'चे २ दिवसांत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ९६ ठिकाणी छापे; १२ परवाने निलंबित, ५ आस्थापने बंद करण्याचे आदेश
- पुणे: महापालिकेचा सुट्टीच्या दिवशीही अतिक्रमणावर हातोडा; पुन्हा अतिक्रमण केल्यास दुकाने सील करण्याचा आयुक्तांचा इशारा!
महाराष्ट्र
- पुणे: अहिल्यानगर महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात! दुभाजक ओलांडून कार पलटी आणि ट्रकला धडक; वाघोलीतील ३ तरुणांचा मृत्यू, २ जखमी!
- पुणे: पाईट–शिरोली मार्गावर हायवाची स्कूटरला भीषण धडक; दिंडी मंडळाचे अध्यक्ष पोपट रौंधळ यांचा जागीच मृत्यू!
- कोल्हापूर: महायुतीची १२५ महामंडळे केवळ घोषणांसाठी; सतेज पाटलांचा हल्लाबोल, करवीर आणि कागल तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी!
- रत्नागिरी: गुहागरात शृंगारतळी-आबलोली रस्त्याकडेला आढळले बिबट्याचे मादी पिल्लू; वनविभागाच्या पथकाने केले सुरक्षित रेस्क्यू!
गुन्हा
- यवतमाळ: घाटंजी येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे टोकाचे पाऊल; भाड्याने राहत असलेल्या खोलीत घेतला गळफास, परिसरात खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर सावंगी जवळ भीषण अपघात: चालकाला डुलकी लागल्याने ट्रॅव्हल्स उलटली; दोघांचा मृत्यू, ३० प्रवासी जखमी!
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कोलकाता: 'पश्चिम बंगाल'चे नाव बदलून 'पश्चिम बंग' करण्याची तयारी; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा, विधानसभेत प्रस्ताव मांडणार!
- नवी दिल्ली: बालेन शाह १८ हजार कोटी मागायला आलेले, भारताने दिले २४ हजार कोटींचे पॅकेज; मोदींच्या भेटीनंतर ऐतिहासिक घोषणा आणि 'सरयू-कमल एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा!
- उत्तर प्रदेश: बुलंदशहरमध्ये धक्कादायक घटना! घरापासून ४० मीटर अंतरावरील बंद खोलीत चिमुकलीचा मृतदेह; जादूटोण्याच्या संशयाने खळबळ, संशयित महिला ताब्यात
- गोवा: पुढील वर्षापासून गोव्यात दुसरे मेडिकल कॉलेज, आयटीआयच्या दर्जावाढीसाठी २५० कोटींची तरतूद आणि मुख्यमंत्री चषक मॅरेथॉनचा शुभारंभ!



























Subscribe to my channel



