यवतमाळ: तालुक्यातील एरंडगाव व इंझाळा ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याने (ग्रामसेवक) घाटंजी शहरातील भाडेतत्त्वावर घेतलेल्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी दुपारी सुमारे ४ वाजताच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्याने प्रशासकीय वर्तुळात तसेच संपूर्ण परिसरात हळहळ आणि खळबळ व्यक्त केली जात आहे.
अमोल जंगमवार असे मृत अधिकाऱ्याचे नाव; मोबाईलला प्रतिसाद न मिळाल्याने प्रकार उघडकीस
अमोल रामदास जंगमवार (वय ३४) असे आत्महत्या केलेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे नाव आहे. ते मूळचे पाटणबोरी येथील रहिवासी होते आणि नोकरीनिमित्त घाटंजी येथील प्रोफेसर कॉलनी परिसरात भाड्याने खोली घेऊन राहत होते. रविवारी दुपारी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे कुटुंबीयांनी शंका येऊन घाटंजी येथील एका ओळखीच्या व्यक्तीला त्यांच्या खोलीवर जाऊन पाहण्यास सांगितले. संबंधित व्यक्ती खोलीवर पोहोचली असता, अमोल जंगमवार हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.
अमरावती येथील कार्यशाळेतून रात्री परतले होते; तपास सुरू
या घटनेची माहिती तात्काळ घाटंजी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सायंकाळी पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. प्राप्त माहितीनुसार, अमोल जंगमवार हे शनिवारी अमरावती येथे एका कार्यशाळेसाठी गेले होते आणि तेथून रात्री १० वाजताच्या सुमारास घाटंजी येथे परतले होते. मात्र, त्यांनी हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणास्तव उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि अवघ्या अडीच वर्षांचा लहान मुलगा असा परिवार आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
शहर
- नवी मुंबई: आगीचा तांडव! सानपाड्यातील सप्तशृंगी ऑइल कंपनीच्या गोदामाला भीषण आग; स्फोटांच्या आवाजाने परिसर हादरला
- छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर सावंगी जवळ भीषण अपघात: चालकाला डुलकी लागल्याने ट्रॅव्हल्स उलटली; दोघांचा मृत्यू, ३० प्रवासी जखमी!
- नागपूर: कापसावरील आयात शुल्क २० टक्के करा, अन्यथा लक्ष्यित आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचा नागपुरातून सरकारला १५ दिवसांचा इशारा
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: बस स्थानकातून एसटी पळवण्याचा प्रयत्न, कुंपण तोडून अर्धवट महामार्गावर आली बस; ४५ लिटर डिझेलही लंपास, दोडामार्गात खळबळ!
- धुळे: सोशल मीडियावर बदनामी, वैतागलेल्या धुळ्याच्या महापौरांकडून जीवन संपवण्याचा प्रयत्न; आमदार अनुप अग्रवाल यांची माहिती, धुळ्यात निषेध मोर्चा
- नवी मुंबई: आगीचा तांडव! सानपाड्यातील सप्तशृंगी ऑइल कंपनीच्या गोदामाला भीषण आग; स्फोटांच्या आवाजाने परिसर हादरला
- छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर सावंगी जवळ भीषण अपघात: चालकाला डुलकी लागल्याने ट्रॅव्हल्स उलटली; दोघांचा मृत्यू, ३० प्रवासी जखमी!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर सावंगी जवळ भीषण अपघात: चालकाला डुलकी लागल्याने ट्रॅव्हल्स उलटली; दोघांचा मृत्यू, ३० प्रवासी जखमी!
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: पुढील वर्षापासून गोव्यात दुसरे मेडिकल कॉलेज, आयटीआयच्या दर्जावाढीसाठी २५० कोटींची तरतूद आणि मुख्यमंत्री चषक मॅरेथॉनचा शुभारंभ!
- गोवा: 'एनीव्हेअर रजिस्ट्रेशन' मुळे नागरिकांना मोठा लाभ! म्हापशातील नूतनीकृत बार्देश उपनिबंधक कार्यालयाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन
- गोवा: विधानसभेचे १६ डिसेंबरला एकदिवसीय अधिवेशन; विरोधकांचा 'लोकशाहीचा अपमान' म्हणत हल्लाबोल
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू

























Subscribe to my channel



