गोवा: राज्य सरकारने आयटीआयच्या (ITI) आधुनिकीकरणासाठी २५० कोटी रुपयांची तरतूद केल्याचे तसेच गोव्यातील दुसरे वैद्यकीय महाविद्यालय पुढील वर्षी सुरू होणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केले. रविवारी सकाळी नव्या झुआरी पुलावर सावंत यांच्या हस्ते मुख्यमंत्री चषक मॅरेथॉनला प्रारंभ करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. या मॅरेथॉनला ५,५०० हून अधिक युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भाजयुमोने आयोजित केलेल्या या मॅरेथॉनला प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि भाजयुमोचे प्रदेश प्रमुख तुषार केळकर उपस्थित होते.
मडगाव ईएसआय रुग्णालयात ५० एमबीबीएस जागांसह दुसरे वैद्यकीय महाविद्यालय
दुसऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाबाबत केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाने यापूर्वीच २०२७-२८ या शैक्षणिक वर्षापासून ५० एमबीबीएस जागांसह महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता दिली आहे. हे महाविद्यालय मडगाव येथील ईएसआय रुग्णालयाच्या परिसरात ईएसआयसीमार्फत चालविण्याचे नियोजन आहे. त्यातील ५० टक्के जागा गोमंतकीय विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचे याआधीच जाहीर झालेले आहे.
'फिट इंडिया', 'माय भारत' आणि युवकांच्या सक्षमीकरणावर भर
मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'फिट इंडिया' आणि 'माय भारत' उपक्रमांपासून प्रेरणा घेऊन गोव्याला अधिक निरोगी, सक्रिय आणि तंदुरुस्त बनविण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. केवळ स्पर्धात्मक खेळांपुरती क्रीडा चळवळ मर्यादित न ठेवता ती युवकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनली पाहिजे. मुख्यमंत्री चषकासारख्या उपक्रमांमधून राज्यातील नवोदित क्रीडापटूंना आपली क्षमता दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. गोव्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन आणि स्थानिक युवकांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यावर सरकार भर देत आहे.
मॅरेथॉनचे विविध टप्पे आणि सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा
आयोजकांनी मॅरेथॉनसाठी ५, १० आणि २१ किलोमीटर अशा तीन श्रेणी ठेवल्या होत्या. २१ किलोमीटरची स्पर्धा हाफ मॅरेथॉन म्हणून आयोजित करण्यात आली. पुरुष आणि महिला अशा स्वतंत्र गटांमध्ये स्पर्धा झाली. स्पर्धकांना पहाटे ५ वाजता उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. एकूण १२ क्रीडा व सांस्कृतिक प्रकारांमधून युवकांना आपली कला आणि कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली.
दुसऱ्या टप्प्यात एक लाखांहून अधिक युवकांना सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मतदारसंघ स्तरावर १ ते १० डिसेंबरदरम्यान स्पर्धा होतील, तर १० ते १३ डिसेंबरदरम्यान राज्यस्तरीय फेऱ्या पार पडणार आहेत. १३ डिसेंबरला या महोत्सवाचा समारोप होईल. भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनीही युवकांना क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
फिट इंडियात सहभागी व्हा; व्यसनमुक्त गोव्याचे आवाहन
मॅरेथॉनला मिळालेला प्रतिसाद पाहून मुख्यमंत्री सावंत यांनी ही स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्याची सूचना केली. युवकांमध्ये वाढत असलेली फिटनेसविषयक आवड आणि मोठ्या संख्येने मिळालेला सहभाग उत्साहवर्धक असल्याचे त्यांनी सांगितले. युवकांनी नियमितपणे 'फिट इंडिया' मोहिमेत सहभागी व्हावे, व्यसनमुक्त पिढी घडविण्यासाठी योगदान द्यावे आणि व्यसनमुक्त गोव्याच्या निर्मितीसाठी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहनही सावंत यांनी केले.
१३ डिसेंबरपर्यंत राज्यभर स्पर्धांचा धडाका
मुख्यमंत्री चषक २.० हा उपक्रम १३ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार असून राज्यातील १४ तालुक्यांमधील विविध ठिकाणी तसेच तीन 'खेलो इंडिया' केंद्रांवर क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील युवकांना आपली क्रीडाक्षमता दाखविण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमात क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन आणि कॅरम या पाच क्रीडा प्रकारांसह फुगडी, घुमट आरती, समूह नृत्य, पथनाट्य, एकल गायन, रांगोळी आणि चित्रकला अशा सांस्कृतिक स्पर्धांचाही समावेश आहे.
शहर
- नवी मुंबई: आगीचा तांडव! सानपाड्यातील सप्तशृंगी ऑइल कंपनीच्या गोदामाला भीषण आग; स्फोटांच्या आवाजाने परिसर हादरला
- छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर सावंगी जवळ भीषण अपघात: चालकाला डुलकी लागल्याने ट्रॅव्हल्स उलटली; दोघांचा मृत्यू, ३० प्रवासी जखमी!
- नागपूर: कापसावरील आयात शुल्क २० टक्के करा, अन्यथा लक्ष्यित आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचा नागपुरातून सरकारला १५ दिवसांचा इशारा
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: बस स्थानकातून एसटी पळवण्याचा प्रयत्न, कुंपण तोडून अर्धवट महामार्गावर आली बस; ४५ लिटर डिझेलही लंपास, दोडामार्गात खळबळ!
- यवतमाळ: घाटंजी येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे टोकाचे पाऊल; भाड्याने राहत असलेल्या खोलीत घेतला गळफास, परिसरात खळबळ
- धुळे: सोशल मीडियावर बदनामी, वैतागलेल्या धुळ्याच्या महापौरांकडून जीवन संपवण्याचा प्रयत्न; आमदार अनुप अग्रवाल यांची माहिती, धुळ्यात निषेध मोर्चा
- नवी मुंबई: आगीचा तांडव! सानपाड्यातील सप्तशृंगी ऑइल कंपनीच्या गोदामाला भीषण आग; स्फोटांच्या आवाजाने परिसर हादरला
गुन्हा
- यवतमाळ: घाटंजी येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे टोकाचे पाऊल; भाड्याने राहत असलेल्या खोलीत घेतला गळफास, परिसरात खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर सावंगी जवळ भीषण अपघात: चालकाला डुलकी लागल्याने ट्रॅव्हल्स उलटली; दोघांचा मृत्यू, ३० प्रवासी जखमी!
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: 'एनीव्हेअर रजिस्ट्रेशन' मुळे नागरिकांना मोठा लाभ! म्हापशातील नूतनीकृत बार्देश उपनिबंधक कार्यालयाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन
- गोवा: विधानसभेचे १६ डिसेंबरला एकदिवसीय अधिवेशन; विरोधकांचा 'लोकशाहीचा अपमान' म्हणत हल्लाबोल
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!

























Subscribe to my channel



