पुणे: प्रेयसीने दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध जुळवल्याने पूर्वीच्या प्रियकराने प्रेयसीसह तिच्या प्रियकरावर लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात प्रियकराचा मृत्यू झाला. तर प्रेयसी गंभीर जखमी झाली. ही घटना पुणे जिल्ह्यात मुळशी तालुक्यातील मारुंजी येथे गुरुवारी (६ ऑगस्ट) दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, पळून गेलेल्या आरोपीला उरुळी कांचन पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान जेरबंद केले.
विशीतील प्रेमसंबंधांचा थरार
सागर साहेबराव गायकवाड (वय २२, रा. मारुंजी, मूळ रा. येवला, नाशिक) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. २१ वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिनेश महादेव झांबरे (वय २३, रा. पळशी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर, सध्या रा. मारुंजी, हिंजवडी) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिनेश याचे जखमी तरुणीसोबत शालेय जीवनापासून प्रेमसंबंध होते. तरुणी बीसीएचे शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आली होती.
पीजी मॅनेजरसोबत प्रेम जुळलं
शिक्षणादरम्यान संबंधित तरुणी मारुंजी येथे पेइंग गेस्ट म्हणून राहत होती. तेथे व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या सागर याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध जुळले. याचा राग आरोपीच्या मनात होता. याच कारणावरून गुरुवारी दुपारी दिनेश हा सागर व तरुणी राहत असलेल्या पीजी इमारतीत आला. त्याने दोघांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केले. या हल्ल्यात सागरचा जागीच मृत्यू झाला, तर तरुणी गंभीर जखमी झाली.
पोलिसांच्या नाकाबंदीत आरोपी जाळ्यात
त्यानंतर आरोपी कारमधून पुणे-सोलापूर मार्गे पंढरपूरकडे पळून जात होता. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी उरुळी कांचन पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयमाला पवार यांच्याशी संपर्क साधून आरोपीच्या वाहनाची माहिती दिली. उरुळी कांचन पोलिसांनी तातडीने नाकाबंदी करून आरोपीला जेरबंद केले. चौकशीत त्याने हिंजवडी येथे खून केल्याची कबुली दिली.
घटना घडल्यानंतर तत्काळ आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयाने १२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती हिंजवडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिली.
Disclaimer: या पोस्टमधील माहिती उपलब्ध वृत्तस्रोत व अधिकृत माहितीनुसार प्रकाशित करण्यात आली आहे. तपास किंवा अधिकृत प्रक्रियेनुसार तथ्यांमध्ये बदल होऊ शकतो.
या पोस्टचा उद्देश केवळ माहिती देणे असून अंतिम सत्यता संबंधित शासकीय यंत्रणा व न्यायालयीन प्रक्रियेवर अवलंबून आहे.
शहर
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- पुणे: सोनकिरणांनी घेतले भुलेश्वराचे अलौकिक दर्शन! सूर्यकिरण थेट शिवलिंगावर पडताच मंदिर परिसरात दुमदुमले 'हर हर महादेव'चे गजर!
- बीड: पुणे कनेक्शन अखेर सुरू! बीड ते थेट पुणे रेल्वे सेवा सुरू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पूर्ण केला अजितदादांचा शब्द!
- पुणे: लाडक्या बाप्पा आणि दुर्गादेवीच्या सन्मानपूर्वक पुनर्विसर्जनासाठी महापालिका घेणार खाण भाडेतत्त्वावर!
महाराष्ट्र
- नाशिक: निवेदनांना केराची टोपली दाखवल्याने संताप! निफाडमध्ये तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने चक्क नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलवरच सोडले मोकाट कुत्रे!
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- पुणे: सोनकिरणांनी घेतले भुलेश्वराचे अलौकिक दर्शन! सूर्यकिरण थेट शिवलिंगावर पडताच मंदिर परिसरात दुमदुमले 'हर हर महादेव'चे गजर!
- मुंबई: आता बास झालं, नाहीतर आम्हालाही कायदेशीर पावले उचलावी लागतील; दिशा सालियन प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा विरोधकांना सज्जड दम!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- बिहार: गोड खाण्याचा आनंद ठरला शेवटचा! घशात रसगुल्ला अडकल्याने ८ वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू; हळहळ व्यक्त!
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान


























Subscribe to my channel




