एन. रघुरामन यांचा कॉलम:कॅशलेस जगात रोख रक्कम बाळगणे गरजेचे

गेल्या आठवड्यात मायक्रोसॉफ्ट, जेपी मॉर्गन चेस, अमेरिकन फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन व नॅशनल सिक्युरिटी एजन्सीच्या कॉम्प्युटर सिस्टीम व ऑनलाइन सेवांत बिघाड झाल्याने लोकांना मोठा त्रास सहन करावा लागला. हा सायबर हल्ला नव्हता. सॉफ्टवेअरमधील बग, चुकीचे अपडेट आणि देखभालीच्या समस्या ही या आउटेजची कारणे ठरली. तज्ज्ञांना चिंता आहे की, एआयच्या मदतीने शोधलेल्या सॉफ्टवेअरमधील कमकुवत बाबी घाईघाईने दुरुस्त करण्याची स्पर्धा सिस्टीमवर दबाव आणतेय. घाईघाईत केलेले पॅच आणि अपग्रेड कधी कधी नवी समस्या निर्माण करतात. यामुळे महत्त्वाची पायाभूत सुविधा अधिकच कमकुवत होते. आपण डिजिटल पेमेंटच्या इतके अधीन झालोत की रोख रक्कम जवळ ठेवणे विसरलो. स्मार्टफोन, ॲप आणि नेट बँकिंगमुळेच किराणा सामान खरेदी करणे, कॅब बुक करणे, रेस्टॉरंटचे बिल भरणे सोपे झाले. पण जेव्हा तंत्रज्ञान अचानक काम करणे बंद करेल तेव्हा काय होईल? तुमच्या बँक खात्यात पैसे तर असतील, पण तुम्ही ते काढू शकणार नाही. एकमेकांशी जोडलेल्या डिजिटल सिस्टीमवरील वाढत्या अवलंबित्वाने एक नवीन कमकुवतपणा निर्माण केलाय. इंटरनेटमधील अडथळा, क्लाउड सेवांतील बिघाड आणि पेमेंट नेटवर्क ठप्प होण्याचा अनेक देशांवर, उद्योगांवर परिणाम होऊ शकतो. महत्त्वाच्या सिस्टीम फेलमुळे विमानसेवासुद्धा ठप्प झाली होती, तेव्हा सावध व्हा. यातून घेण्यासारखा धडा हा नाही की डिजिटल पेमेंट विश्वासार्ह नाहीत किंवा आपण ही सुविधा सोडावी. धडा असा की, सुविधा हा आपला एकमेव पर्याय असू नये. बँक बॅलन्स उपयुक्त आहे, पण गरजेच्या वेळी जेव्हा पैसा वापरता येत नाही तेव्हा तात्काळ दिलासा मिळत नाही. त्यामुळे काही रोख रक्कम जवळ ठेवणे ही एक शहाणपणाची सवय आहे, तंत्रज्ञानावर संशय घेतल्याचे ते लक्षण नाही. याचा अर्थ असा नाही की सर्व बचत गादीखाली लपवावी. तंत्रज्ञानाने आपले जीवन वेगवान, सोपे व कार्यक्षम बनवले. पण बॅकअपशिवाय कार्यक्षमता स्वतःच एक कमकुवतपणा बनते. आपण मुलांना सीट बेल्ट लावायला शिकवतो, जरी आपल्याला ब्रेक काम करतील असा विश्वास असला तरीही. मग पैशांना यापेक्षा वेगळे का समजावे? मॅनेजमेंट टिप : डिजिटल युगात आर्थिक तयारीचा अर्थ असा की, इमर्जन्सी कॅश नेहमी बाळगा. सुविधेसाठी तंत्रज्ञानावर व सातत्यासाठी रोख रकमेवर विश्वास ठेवा. इंटरनेट नसतानाही पैसा तुमच्याकडे असावा.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *