बोरिया मजुमदार यांचा कॉलम:खेळांत वाढत्या राजकारणाचा लाभ कुणाला?

भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंडर-19 आशिया‎चषकाचा अंतिम सामना झाला. हा सामना अत्यंत रोमहर्षक‎होता. या विजयानंतर भारतीय खेळाडूंनी खूप उत्साहात‎जल्लोष साजरा केला. या वेळी दोन्ही संघांमध्ये जोरदार‎बाचाबाचीही झाली. आता यावर एक चर्चा सुरू झाली आहे.‎भारतीय खेळाडूंनी आपला जल्लोष थोडा संयमित‎ठेवायला हवा होता का? की आता हे सगळे खेळाचा एक‎सामान्य भाग बनले आहे?‎ या प्रश्नाचे उत्तर शोधायचे असेल, तर आपल्याला‎अलीकडच्या घटनांवर नजर टाकावी लागेल.‎भारत-पाकिस्तान यांच्यातील अलीकडच्या संघर्षाच्या‎घटना पाहाव्या लागतील. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या‎पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी‎हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. तो मूक विरोधाचा‎एक मार्ग होता. पण यानंतर पाकिस्तानने या वादाला वेगळेच‎वळण दिले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन‎नक्वी यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेला राजकीय रंग दिला‎गेला. त्यांनी ही प्रक्रिया वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवली.‎ नक्वी हे पाकिस्तानचे गृहमंत्रीदेखील आहेत. भारताकडून‎सलग सहाव्यांदा पराभव झाल्यानंतर त्यांनी ‘6-0’ असे‎ट्वीट केले. त्यांचा रोख ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान झालेल्या‎लष्करी कारवाईकडे होता. पाकिस्तानी खेळाडू साहिबजादा‎फरहान आणि हारिस रौफ यांनी हीच मालिका पुढे नेली.‎अर्धशतक झळकावल्यानंतर फरहानने बंदूक‎चालवल्यासारखा जल्लोष केला. तर रौफने लढाऊ विमान‎कोसळल्याची कृती करून भारतीय चाहत्यांना डिवचले.‎ परिस्थिती तेव्हा अधिकच बिघडली, जेव्हा भारतीयांनी‎मोहसीन नक्वी यांच्या हातून आशिया चषकाची ट्रॉफी‎घेण्यास नकार दिला. यानंतर नक्वी ती ट्रॉफी घेऊन निघून‎गेले. एका जबाबदार मंत्र्याच्या अशा वागणुकीचा परिणामही ‎‎दिसून आला. पाकिस्तानचे युवा फुटबॉल खेळाडूदेखील‎असेच सेलिब्रेशन करू लागले. यात 16 वर्षांपेक्षा कमी‎वयाच्या मुलांचाही समावेश होता. त्यांच्या जल्लोषातही ‎‎राजकीय संकेत लपलेले होते. हे स्पष्ट आहे की, शाळेत ‎‎जाणाऱ्या या तरुण खेळाडूंच्या मनातही विष कालवले गेले‎होते. परिस्थिती अशा वळणावर पोहोचली होती, जिथून‎मागे फिरणे कठीण होते.‎ याच सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर आपल्याला‎ओमानमधील भारतीय खेळाडूंचा जल्लोष समजून घेणे‎गरजेचे आहे. काही दिवसांपूर्वी यशवीर गौडने माझ्याशी ‎‎मनमोकळी चर्चा केली. त्याने सामन्यानंतर अत्यंत‎आक्रमक प्रतिक्रिया दिली होती. यशवीरने सांगितले की, ग्रुप ‎‎सामन्यादरम्यान पाकिस्तानी खेळाडूंनी त्यांना शिवीगाळ‎केली होती. तो सामना पाकिस्तानने जिंकला होता. यशवीर ‎‎म्हणाला, “सुरुवात त्यांनीच केली होती. मी फक्त त्याचे उत्तर ‎‎दिले. कारण, हा विजय माझ्यासाठी खूप भावुक करणारा ‎‎होता.” अंतिम सामन्याचा हिरो काव्या पटेलनेही याच भावना ‎‎व्यक्त केल्या. तो म्हणाला, “मैदानावर आमच्या खेळाडूंना‎बरंच काही ऐकवण्यात आलं होतं. आमचा तो जोशपूर्ण‎जल्लोष त्याच सर्व गोष्टींचा परिणाम होता.”‎ रविवारी दोहा येथे ‘रायझिंग स्टार्स’ क्रिकेट स्पर्धेअंतर्गत‎भारत आणि पाकिस्तान यांच्यात आणखी एक सामना‎खेळवला जाणार आहे. अशा परिस्थितीत क्रिकेटच्या‎मैदानावर उग्र-राष्ट्रवादाचा हा सिलसिला आताच थांबणार‎नाही, हे स्पष्ट आहे. यात कुणाचीही बाजू न घेता, मला‎एवढे नक्की सांगायचे आहे की, गेल्या काही वर्षांत‎भारत-पाकिस्तान सामन्यांमध्ये भारताचे पारडे नेहमीच जड‎राहिले आहे. अशा वेळी आपल्या खेळाडूंनी हे बघायला‎हवे की, त्यांचे लक्ष खेळावरून विचलित होणार नाही.‎ विजयानंतर अशा प्रकारचा जल्लोष कदाचित योग्य वाटू‎शकतो. पण पराभवानंतर परिस्थिती बिघडू शकते. लोक‎खेळाडूंवर गरजेपेक्षा जास्त आक्रमक वागल्याचा आरोप‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎करू लागतात. ही एक अत्यंत पुसट आणि नाजूक रेषा आहे.‎शेवटी, व्यावसायिक खेळांमध्ये संपूर्ण खेळ एकाच‎गोष्टीवर अवलंबून असतो. तो म्हणजे, कोण दबाव अधिक‎चांगल्या प्रकारे हाताळतो आणि शेवटी सामना जिंकण्यात‎यशस्वी होतो. यशवीरने जर कोणतीही प्रतिक्रिया दिली‎नसती, तरीही मैदानावर केलेल्या खेळावरून संदेश स्पष्ट‎होता. अंतिम सामन्यात भारतच उत्तम संघ ठरला होता.‎भारताने दबावाच्या क्षणी आपला संयम राखला. विजयाची‎चव गोड होती आणि पाकिस्तान पुन्हा एकदा हरला होता.‎अशा परिस्थितीत तो जोशपूर्ण जल्लोष हा स्पष्टपणे अत्यंत‎तणावपूर्ण आणि भावनांनी भरलेल्या सामन्याचा परिणाम‎होता. तो जल्लोष विजयाच्या आनंदात फक्त एक जास्तीचा‎रंग भरल्यासारखा होता.‎ माझे असे मानणे आहे की, दोन्ही बाजूंसाठी एक मर्यादा‎निश्चित असली पाहिजे. संयम आणि शांतता राखण्याची‎गरज आहे. शेवटी हा एक खेळ आहे. स्वतःला सिद्ध‎करण्यासाठी मर्यादा ओलांडणे आवश्यक नाही. भूतकाळात‎सेंच्युरियनमध्ये पाकिस्तानविरुद्ध शानदार खेळी‎करण्यासाठी सचिन तेंडुलकरला आक्रमक प्रतिक्रिया‎देण्याची गरज भासली नव्हती. त्याने आपल्या बॅटनेच‎स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध केले होते. तेव्हापासून आतापर्यंत‎काळ बदलला आहे, हे समजण्यासारखे आहे. पाकिस्तानी‎राजकारण्यांनीच आपल्याला डिवचण्याची सुरुवात केली‎आहे. पण मला असे वाटते की, भारतीय खेळाडूंनी‎मैदानाबाहेर नाही, तर मैदानावरच पाकिस्तानचा पराभव‎करत राहावे. खेळात खरा विजय असाच मिळवला जातो‎आणि आपली बाजूही अशाच प्रकारे सिद्ध केली जाते.‎ यशवीर, काव्या किंवा लक्ष्य हे त्यांच्या जल्लोषाच्या जोरावर‎चांगले क्रिकेटपटू बनणार नाहीत. ते मैदानावर त्यांच्या‎खेळानेच खरे स्टार बनतील. येणाऱ्या सामन्यांमध्ये यावरच‎लक्ष केंद्रित केले पाहिजे. नक्कीच, असे जल्लोष सोशल‎मीडियावर खूप बातम्या मिळवून देऊ शकतात. प्रक्षेपणाच्या‎दृष्टीनेही ते आकर्षक ठरू शकतात. पण खेळाडूंना याचा‎काहीही विशेष फायदा होत नाही. एका मर्यादेनंतर या गोष्टी‎विनाकारण लक्ष विचलित करू लागतात.‎ खेळ कोणताही असो, तो तुम्हाला संयम राखायला‎शिकवतो. कठीण परिस्थितीत खंबीरपणे उभे राहण्याचा‎धडा देतो. तो आपल्याला दबावाचा सामना करणे आणि‎जिंकण्याचे महत्त्व सांगतो. अलीकडच्या काळात भारतीय‎खेळाडूंनी हेच करून दाखवले आहे. पाकिस्तानसाठी‎यापेक्षा चांगला दुसरा संदेश असूच शकत नाही. येणाऱ्या‎काळातही हीच पद्धत असायला हवी. मैदानाबाहेरच्या‎गोष्टींऐवजी मैदानावर केलेल्या खेळानेच उत्तर दिले जावे.‎ (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎ विजयाच्या आनंदाची अभिव्यक्ती‎यशवीरने सामन्यानंतर आक्रमक प्रतिक्रिया दिली‎नसती, तरीही मैदानावरील खेळावरून संदेश‎स्पष्ट होता. अंतिम सामन्यात भारतच उत्तम संघ‎ठरला होता. भारताने दबावाच्या क्षणी आपला‎संयम राखला. विजयाची चव गोड होती. अशा‎परिस्थितीत तो जोशपूर्ण जल्लोष विजयाच्या‎आनंदात फक्त जास्तीचा रंग भरल्यासारखा होता.‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *