मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोरेगाव परिसरात सार्वजनिक शौचालयातील विषारी वायूमुळे दोन तरुणांचा गुदमरून झालेल्या दयनीय मृत्यूनंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) अत्यंत कठोर आणि धडक पावले उचलली आहेत. या दुर्घटनेला कारणीभूत ठरलेल्या आणि कोणत्याही कायदेशीर परवानग्याशिवाय विनापरवाना सुरू असलेल्या गोरेगावमधील 'साई इलेक्ट्रोप्लेटर्स' या बेकायदा कारखान्याला पूर्णपणे बंद करण्याचे आणि त्याला टाळे ठोकण्याचे अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत.
गोरेगाव पूर्वेकडील राम मंदिर रेल्वे स्थानक परिसरातील मृणालताई गोरे उड्डाणपुलाजवळ असलेल्या एका सार्वजनिक शौचालयात ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली होती. या दुर्घटनेत प्रभाकर धनीवार (२४) आणि भावीन देसाई (१८) अशी तरुण मृत पावलेल्यांची नावे आहेत. हे तरुण मध्यरात्रीच्या सुमारास परिसरामध्ये एकत्र आले होते आणि फ्रेश होण्यासाठी सार्वजनिक शौचालयात गेले होते. मात्र, बराच वेळ उलटूनही ते बाहेर न आल्यामुळे त्यांच्या मित्रांनी आत जाऊन पाहिले असता, शौचालयाच्या वेगवेगळ्या क्युबिकलमध्ये दोन्ही तरुण अन्समत आणि अचेतन अवस्थेत पडल्याचे आढळून आले. त्यांना तत्काळ गोरेगावच्या जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
प्राथमिक तपासात समोर आले की, शौचालयाच्या अगदी जवळच असलेल्या एका बेकायदा इलेक्ट्रोप्लेटिंग युनिटमधून (साई इलेक्ट्रोप्लेटर्स) सोडण्यात आलेले रासायनिक सांडपाणी आणि घातक रसायनांच्या प्रक्रियेमुळे निर्माण झालेले तीव्र व विषारी वायू ड्रेनेज लाइनवाटे शौचालयात साचले होते. या विषारी वायूच्या संपर्कात आल्यामुळे आणि श्वास गुदमरल्यामुळेच या दोन्ही निष्पाप तरुणांना प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये आणि मृतांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत वनराई पोलिसांनी सुरुवातीलाच या प्रकरणी कारवाई करत जागेच्या मालकाला आणि संबंधितांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) या प्रकरणाची गंभीर दखल घेत मानवी जीविताशी खेळणाऱ्या आणि बेकायदेशीरपणे चालविल्या जाणाऱ्या या कारखान्यावर दंडात्मक व कठोर कारवाई करत कारखाना तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या कठोर कारवाईमुळे अनधिकृतपणे आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या इतर फॅक्टरी चालकांचेही धाबे दणाणले आहेत.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




